Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

गणेशोत्सवात डीजे बंदी बाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांचे आदेश

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र         ज्या अर्थी, दि. 27/08/2025 ते दि. 06/09/2025 रोजीच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यामध्ये गणेश उत्सव हा सण पारंपारिक पध्दतीने व मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते. सदर मिरवणुकीमध्ये गणेश उत्सव मंडळाकडून डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गणेश मुर्ती आगमन मिरवणुकीवेळी मिरवणुक बघण्याकरीता आलेल्या भाविकांना डॉल्बी सिस्टीममुळे काही व्यक्तींना कानाचा व छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व अथवा जिवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आलेली आहे. तसेच लेझर लाईट डोळयावर पडल्यामुळे मुख्यत्वे वयोवृद्ध व लहान मुलांच्या डोळयाच्या पडद्याला तसेच बुबळाला इजा झालेल्या घटना घडलेल्या आहेत. याबाबत जेष्ठ नागरिक संघटनांनी त्यांना व इतर नागरिकांना डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटच्या जिवितास धोका तसेच इतर शारिरिक दुष्परीणाम होत असल्याचे निवेदन या कार्यालयाकडे सादर केले आहे. ज्या अर्थी, गणेश उत्सव कालावधीत गणेश ...

नातेपुते पोलीस ठाणेच्या वतीने गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद २०२५ उत्सवाच्या अनुषंगाने रूट मार्च

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र        दिनांक 25/08/2025 रोजी 16:00 वाजता ते 19:45 वाजता चे दरम्यान नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद 2025 या सण उत्सवाच्या अनुषंगाने नातेपुते शहरातील प्रमुख बाजारपेठ, ST स्टँड, संमिश्र वस्ती इत्यादी भागात रूट मार्च काढण्यात आला.       सदर वेळी नातेपुते शहरातील एसटी स्टँड येथे दंगा काबू योजनेचे  प्रात्यक्षिक घेण्यात आले सदर वेळी प्रात्यक्षिक मध्ये लाठी चार्ज,ढाल व रायफल, गॅस गन, याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील मोजे फोंडशिरस या गावात घेण्यात आला सदर वेळी नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे, PSI धनाजी ओमासे तसेच नातेपुते पोलीस ठाणे कडील १५ पोलीस अंमलदार, एक RCP पथक व 24 होमगार्ड हजर होते. सदर वेळी नागरिकांना गणेशोत्सव 2025 शांततेत पार पडणे बाबत अवाहन व सूचना करण्यात आल्या. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक...

शिवसेनेमध्ये आजी-माजी सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य यांचा प्रवेश हिवरकर पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र    शिवसेना सोलापूर जिल्हा ओबीसी विभागाची जबाबदारी घेतल्यापासून ओबीसी समाजामध्ये नवचैतन्य वातावरण निर्माण झालेल आहे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या पक्ष्याचा कारभार हिंदुरुदय सम्राट बाळासाहेबांच्या व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या विचारधारेवर चालू आहे शिंदे साहेबांनी केलेल्या मुख्यमंत्री काळातल्या कामामुळे महाराष्ट्रातील जनता प्रचंड समाधानीआहे.      इतर पक्ष प्रमाणे ओबीसी समाज आपल्याही पक्ष सोबत राहिला पाहिजे त्यासाठी मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना ओबीसी विभागच स्वतंत्ररित्या चालू केला निर्माण केला त्यामुळे लहान लहान घटकाचे लोकप्रतिनिधी आपणहुन शिंदे साहेबाची जोडून जावं यासाठी शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करीत असल्याचे दिसत आहे   म्हणून आज शिवसेना भवनावर शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख ओबीसी राजकुमार हिवरकर पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.       यामध्ये बांगर्डे गावचे सरपंच भाऊ दडस. ...

मा.ना.भरत शेठ गोगावले, रोजगार हमी पणन फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शिवसेना जिल्हा कार्यालयाचे लोकार्पण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र   रोजगार हमी पणन फलोत्पादन मंत्री मा.ना.भरत शेठ गोगावले व सामाजिक न्याय मंत्री मा.ना. संजयजी शिरसाट साहेब  माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी आवर्जून शिवसेना भवन येथे  राजकुमार हिवरकर-पाटील यांची सोलापूर जिल्हा प्रमुख ओबीसी पदी निवड झाल्याने नव्याने निर्माण झालेल्या कार्यालयाचे यावेळी आवर्जून मा.ना.भरत जाधव यांनी शिवसेना भवनास भेट देऊन या कार्यालयाच्या नामफलकाचे अनावर केल.  यावेळी माळशिरस तालुक्याचे आरोग्यदूत माजी आमदार रामजी सातपुते साहेब, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरण राज चवरे साहेब, तालुकाप्रमुख सतीशची सपकाळ, राष्ट्रवादीचे रियाज शेख, भाजपचे मनोज जाधव, भाजपाचे तेजस गोरे, सुनील बनकर, विनोद रणदिवे, बादल सोरटे इ. ठीक चार वाजता शेकडो शिवसैनिकांच्या साक्षीन नामपलकाचा नातेपुते येथे अनावरण सन्माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री मा.ना.भरत शेठ गोगावले यांनी शुभेच्छा दिल्या व हे कार्यालय राज्याचे मुख्य नेते मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांना अभिप्रेत अस कामकाज इथून घडावे अशी इच्छा व्यक्त के...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...

नातेपुते पोलिसांची दमदार कामगिरी चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने मूळ मालकास परत

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणेमध्ये वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण गोपनीय बातमीदार, cctv बाबत तपास करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे तब्बल 10,80,800/- रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने फिर्यादीस व मूळ मालकास परत केले त्याचे वर्णन खालील प्रमाणे...! 1)गुरनं- 114/2025 BNS कलम 205,318(4) - 1,50,000/- रोख रक्कम 2)गुरनं- 218/2025 BNS कलम 304(2)-60,000/- रुपये किमतीचे 15 ग्रॅम वजनाचे एक सोन्याचा लक्ष्मी हार. 3)गुरनं- 251/2025 BNS कलम 303(2)- 1)1,36,000/- रुपये किमतीचे 17 ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील चैन 2)1,60,000/- रुपये किमतीची 19.5 ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील चैन 4)गुरनं- 254/2025 BNS कलम 304(2)- 79,800/- रुपये किमतीची 9.80 ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याचे बदाम.  5)गुरनं- 255/2025 BNS कलम 304(2) - 1,60,000/- रुपये किमतीची 20 ग्रॅम वजनाची गळ्यातील स...

वाखरी ग्रामपंचायतकडून आषाढी वारी २०२५ च्या अनुषंगाने जय्यत तयारी

  संपादक: अभिमन्यू आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      या वर्षीच्या आषाढी वारीच्या निमित्ताने वाखरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व इतर शेकडो संतांच्या पालख्या वाखरी तळावर गाठीभेटी घेऊनच पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्त होत असतात.     वाखरी या गावी संत लक्ष्मणदास महाराज होऊन गेले आहेत. त्यांचा दगडी रेखीव, कोरीव असा मठ आहे, भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या वर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने वाखरी ग्रामपंचायतने येणाऱ्या भाविकांसाठी बाजीराव विहीर येथील रिंगण स्थळ स्वच्छ केला आहे.       त्या ठिकाणी हिरकणी कक्ष, आरोग्य केंद्र, पिण्याचे पाणी पुरवठा नियोजन केले आहे. तसेच वाडी वस्तीवर वीज पुरवठा, फॉशिंग करणे, महिला स्नान गृह, सार्वजनिक स्वच्छता, तात्पुरते शौचालय, जिल्हा परिषद अंतर्गत दिशादर्शक फलक, हिरकणी कक्ष, इस्त्री कक्ष, पाय दाबन्यासाठी मशीन व्यवस्था, तात्पुरता दवाखाना, कटिंग, दाढी कक्ष, इत्यादी विविध सुविधा वाखरी ग्रामपंचायतकडून राबविण्यात आल्या आहेत.       यासाठी वाखरी ग्रामपंचायत चे सरपंच, उपस...