Skip to main content

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

नातेपुते पोलिसांची दमदार कामगिरी चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने मूळ मालकास परत

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार

     नातेपुते पोलीस ठाणेमध्ये वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण गोपनीय बातमीदार, cctv बाबत तपास करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे तब्बल 10,80,800/- रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने फिर्यादीस व मूळ मालकास परत केले त्याचे वर्णन खालील प्रमाणे...!

1)गुरनं- 114/2025 BNS कलम 205,318(4) - 1,50,000/- रोख रक्कम

2)गुरनं- 218/2025 BNS कलम 304(2)-60,000/- रुपये किमतीचे 15 ग्रॅम वजनाचे एक सोन्याचा लक्ष्मी हार.

3)गुरनं- 251/2025 BNS कलम 303(2)- 1)1,36,000/- रुपये किमतीचे 17 ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील चैन 2)1,60,000/- रुपये किमतीची 19.5 ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील चैन

4)गुरनं- 254/2025 BNS कलम 304(2)- 79,800/- रुपये किमतीची 9.80 ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याचे बदाम. 

5)गुरनं- 255/2025 BNS कलम 304(2) - 1,60,000/- रुपये किमतीची 20 ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन 

6)गुरनं- 252/2025 BNS कलम 304(2)- 1,65,000/- रुपये किमतीची 20.610 ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन

7)गुरनं- 248/2025 BNS कलम 304(2)- 1)56,000/- रुपये किमतीचे 07 ग्रॅम वजनाचे गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण 2)64,000/- रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन 3)32,000/- रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी 4)18,000/- 2.25 ग्रॅम वजनाचे गळ्यातील मंगळसूत्र.

असे एकूण 10,80,800/- असे वेगवेगळ्या गुन्ह्यातील सोने व रोख रक्कम 

     वरील किमती मुद्देमाल जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मा.श्री.अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक  मा.श्री.प्रीतम यावलकर व मा.श्री.नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी सो अकलूज विभाग, स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याचे भव्य प्रांगणात वरील सर्व गुन्ह्यातील फिर्यादी व मूळ मालक यांना बोलावून घेऊन त्यांना सोन्याचे दागिने व रोख रक्कम परत करण्यात आली. त्यावेळी सर्व मूळ फिर्यादीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले व आपली वस्तू परत मिळाल्यामुळे पोलिसांचे आभार व्यक्त केले. त्यावेळी नातेपुते पोलीस ठाण्याचे श्री.महारुद्र परजणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत दिघे पोलीस उपनिरीक्षक तसेच PN/562 राकेश लोहार,HC/1636 जावेद जमादार, HC/1765  सुभाष गोरे,

 HC/1522 महादेव कदम,HC/ 706 राहुल रुपनवर HC/ 1708 विकास बाबर, PC/2058 असलम शेख, PC/2076 सोमनाथ मोहिते, PC/06 अमोल देशमुख, यांचे आभार मानले सदर कामगिरीमुळे नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांकडून नातेपुते पोलीस ठाण्याचे कौतुक करण्यात येत असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

                       टीप : जे दिसलेजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.        




Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...