Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

गणेशोत्सवात डीजे बंदी बाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांचे आदेश


उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र 

    ज्या अर्थी, दि. 27/08/2025 ते दि. 06/09/2025 रोजीच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यामध्ये गणेश उत्सव हा सण पारंपारिक पध्दतीने व मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते. सदर मिरवणुकीमध्ये गणेश उत्सव मंडळाकडून डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गणेश मुर्ती आगमन मिरवणुकीवेळी मिरवणुक बघण्याकरीता आलेल्या भाविकांना डॉल्बी सिस्टीममुळे काही व्यक्तींना कानाचा व छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व अथवा जिवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आलेली आहे. तसेच लेझर लाईट डोळयावर पडल्यामुळे मुख्यत्वे वयोवृद्ध व लहान मुलांच्या डोळयाच्या पडद्याला तसेच बुबळाला इजा झालेल्या घटना घडलेल्या आहेत. याबाबत जेष्ठ नागरिक संघटनांनी त्यांना व इतर नागरिकांना डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटच्या जिवितास धोका तसेच इतर शारिरिक दुष्परीणाम होत असल्याचे निवेदन या कार्यालयाकडे सादर केले आहे.

ज्या अर्थी, गणेश उत्सव कालावधीत गणेश मूर्ती आगमन, गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक दरम्यान डॉल्बी सिस्टिममुळे काही व्यक्तींना कानाचा व छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व अथवा जिवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आलेली आहे. तसेच लेझर लाईट डोळयावर पडल्यामुळे मुख्यत्त्वे वयोवृध्द व लहान मुलांच्या डोळयाच्या पडद्याला तसेच बूबळाला इजा झालेल्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत उपविभागीय अधिकारी, सोलापुर क्रमांक-१ यांनी त्यांचे दिनांक २७/०८/२०२५ रोजीच्या पत्रान्वये अहवाल सादर केला आहे.

तसेच ज्या अर्थी, सोलापूर जिल्हयात दि.27/08/2025 ते दि.06/09/2025 रोजी या कालावधीत सोलापूर जिल्ह्यामध्ये गणेश उत्सव सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसेच सार्वजनिक गणेश मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते. सदर मिरवणुकीमध्ये गणेश मंडळ हे डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे मिरवणुकीमध्ये डॉल्बी व लेझर लाईट वापरात प्रतिबंध करणे आवश्यक आहे. याबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) मध्ये जेथे जिल्हादंडाधिका-याच्या मते या कलमाखाली कार्यवाही करण्यास पुरेसे कारण असेल आणि तात्काळ प्रतिबंध करणे किंवा सत्वर उपाययोजना इष्ट असेल त्या प्रकरणी, एखादया व्यक्तीला विवक्षित कृती करण्यापासून परावृत्त राहण्याचा अथवा मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट उत्पन्न होण्याचा संभव आहे, असे अशा दंडाधिका-याला वाटले तर, असा दंडाधिकारी त्या प्रकरणाच्या महत्त्वाच्या तथ्यांचे निवेदन अंतर्भूत असलेला एक लेखी आदेश काढून निदेश देवू शकेल, अशी तरतूद नमूद आहे.

त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये दि.27/08/2025 ते दि. 06/09/2025 रोजी या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते. सदर मिरवणुकीमध्ये गणेश मंडळ हे डॉल्बी सिस्टिम व लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करणे आवश्यक असलेने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) मध्ये नमुद तरतुदीच्या अनुषंगाने सदरचे कलम लागू करणे आवश्यक आहे, अशी माझी खात्री झाली आहे.

त्या अर्थी, मी कुमार आशीर्वाद, जिल्हादंडाधिकारी, सोलापुर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्यये, मला प्राप्त अधिकारास अनुसरून मी असा आदेश देतो की, दि.27/08/2025 ते दि 06/09/2025 रोजी पर्यंत या कालावधीत सोलापूर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून आयोजित मिरवणूकीमध्ये डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा शो/वापर करणेस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) मध्ये नमूद केलेनुसार प्रतिबंध करीत आहे.

वरील बाबीस या आदेशाव्दारे प्रतिबंध घालणेत येत असलेने या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील असे जिल्हादंडाधिकारी साहेब, सोलापूर यांनी सांगितले आहे.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

                       टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.   

Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...