Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, यामध्ये महिला सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला नगराध्यक्षा, महिला उपनगराध्यक्षा, महिला नगरसेविका कोमात त्यांचे अनधिकृत पतीदेव जोमात ही शोकांतिका

संपादक: बहुजन भूषण वृत्तपत्र  जे पाहिले, जे अनुभवले, तेच मांडले आहे.   आजची परिस्थिती ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका यामध्ये ज्या महिला सरपंच, उपसरपंच, सदस्य, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, नगरसेविका ज्या निवडुन येऊन पदाधिकारी झाल्या त्या पदाधिकारी महिला वर्गावर त्यांचे पतीदेव, मुलगा, दीर, पुतण्या अन्याय करताना पाहिले आहे.  महिला पदाधिकारी घरी, त्यांचे पतीदेव, मुलगा, दीर, पुतण्या हेच अनधिकृत महिला वर्गाच्या कामात ढवळा ढवळ, हस्तक्षेप करताना दिसत आहेत ही चीड आणणारी गंभीर बाब आहे. यामुळे महिला अधिकृत वर्ग कोमात असे पाहत आहे. तर त्या महिला वर्गाचे अनधिकृत पतीदेव, पुतण्या, मुलगा हे मात्र जोमात असलेले पाहायला मिळत आहे. ज्या वेळी ग्रामसभा, विशेष सभा, आमसभा किंवा मासिक मिटिंग असेल तर महिला वर्गाचे अनधिकृत पतीदेव, पुतण्या, मुलगा, दीर हेच स्वतःला पदाधिकारी समजतात, हे लक्षण योग्य नाही.  महिला वर्ग अधिकृत पदाधिकारी यांनीच कामकाज पाहिले पाहिजे. त्यांचे पतीदेव, मुलगा, दीर, पुतण्या यांना कोणताही अधिकार पोहचत नाही. तसेच ग्रामसभा, विशेष सभा, आमसभा...

नातेपुते नगरपंचायतचा विकास आराखडा म्हणजे शेती धारक, प्लॉट धारक, व्यापारी यांना उध्वस्त करण्याचा कुटील डाव: मा.श्री.डॉ.अभिमन्यू आठवले

संपादक: बहुजन भूषण वृत्तपत्र  नातेपुते नगरपंचायतचा जा.क्र.०६/२०२४ दिनांक १०-१०-२०२४ या ठरावाची नक्कल माहिती अधिकारातून मिळवली आहे. त्या ठरावात 1) नगराध्यक्ष सभापती स्थायी समिती, २) उपनगराध्यक्ष सभापती नियोजन व विकास समिती ३) सदस्य सभापती बांधकाम समिती ४) सूचक प्रशासकीय असे असून ठराव सर्वानुमते बहुमताने मंजूर केला गेला.  तसेच ठराव जा.क्र.०६/२०२४ दिनांक २६-११-२०२४ ठरावाची नक्कल हाती लागली, त्या ठरावात सर्वसाधारण सभा ३०-०८-२०२४, विषय नंबर १७, ठराव क्र. ७८३ असा असून १) नगराध्यक्ष सभापती स्थायी समिती २) उपनगराध्यक्ष सभापती नियोजन व विकास समिती सदस्य, ३) सभापती बांधकाम समिती ४) सूचक प्रशासकीय ठराव सर्वानुमते बहुमताने मंजूर ठरावावर मुख्याधिकारी, नगराध्यक्षा यांच्या सह्या असून नगरपंचायतचा शिक्का आहे, असे ठराव संपादक या नात्याने माहिती अधिकारातून मिळवले आहेत. त्यावरती नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सदस्य, मुख्याधिकारी असा उल्लेख आहे.  त्यात एक सदस्य की, सर्व सदस्य येतात की नाही असे वाटते. ठराव हा नातेपुते गावाच्या ग्रामस्थांच्या हिताच्यादृष्टीने सर्वांना माहिती देऊन, आमसभा घेऊन,...

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना कर्मचारी प्रलंबित मागण्यांबाबत मा.ना.जयकुमार गोरे साहेब ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांना वाखरी, ता.पंढरपूर, जि. सोलापूर येथे निवेदन

संपादक (बहुजन भूषण वृत्तपत्र)       राज्यात २७ हजार १२० ग्रामपंचायतीमध्ये लिपीक, पाणी पुरवठा, दिवाबत्ती कर्मचारी, शिपाई सफाई कामगार अशा विविध पदावर अतिशय कमी वेतनात काम करीत आहेत.       हे कर्मचारी गावातील नागरीकांना लोकोपयोगी सेवा निरंतर पुरविण्याचे काम करीत असलेल्या ६० हजार ग्रामपंचायत कर्मचा-यांचे विविध प्रश्न व मागण्या अनेक वर्षापासुन प्रलंबीत आहेत.      ग्रामपंचायत कर्मचा-यांना उद‌योग उर्जा व कामगार विभागाने निश्चीत केलेले १४१२५/- ते ११६२५/- रुपये सुधारीत किमान वेतन दर लागु असुन शासनाकडून वसुलीच्या प्रमाणात सदर कर्मचा-यांचा किमान वेतनावरील खर्च भागविण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न व लोकसंख्या व परीमंडळ निहाय कुशल अर्धकुशल व अकुशल या वर्गवारीनुसार शासनाकडुन ५०, ७५ व १०० टक्के वेतन ग्रामपंचायत कर्मचा-यांना मिळत आहे. उर्वरीत ५० व २५ टक्के वेतन ग्रामपंचायतीने अदा करायचे असुन सदर वेतन ग्रामपंचायतीकडुन वसुली नसल्याचे कारण सांगितले जाते.       या किमान वेतनाव्यतिरीक्त रहाणीमान भत्ता विशेष भत्ता अदा करणे ग्रामपंचायत...

माण खटाव तालुक्याचे आमदार ते नामदार ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य ते सोलापूर जिल्हा पालकमंत्री मा.जयकुमार (भाऊ) गोरे साहेब जनतेसाठी न्यायदाते ठरतील : मा.श्री.अभिमन्यू आठवले

मा.आ.ना.श्री.जयकुमार (भाऊ) गोरे, महाराष्ट्र राज्य ग्रामविकास व पंचायतराज मंत्री, सोलापूर जिल्हा पालकमंत्री  संपादक: बहुजन भूषण वृत्तपत्र       सोलापूर जिल्ह्याला मा. जयकुमार गोरे यांच्या रूपाने पालकमंत्री पद मिळाले आहे. त्यामुळे जनतेला आपला माणूस आहे, जनतेशी शासन दरबारी न होणारी कामे मा.पालकमंत्री यांच्यामदतीने होतील असे जनतेला वाटत आहे.  ग्रामविकास मंत्री असल्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या मधील कामे मार्गी लागणार. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या मधील अधिकारी, कर्मचारी हे (गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत) जनतेने दिलेल्या अर्जाची दखल घेत नाहीत, टाळाटाळ करतात, कोणालाही घाबरत नाहीत असे चित्र दिसत आहे.  पण आता ग्रामविकास मंत्री ते सोलापूर जिल्हा पालकमंत्री मा.जयकुमार (भाऊ)गोरे साहेब आहेत. अ धिकारी व कर्मचारी यांना वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाहीत, आता अधिकारी, कर्मचारी यांना दिवसा चांदण्या दाखवतील. अधिकारी, कर्मचारी यांना आलेला माज जिरवतील. मा.जयकुमार गोरे साहेब हे एक उत्तम जनतेसाठी काम करणारे नेतृत्व मानले जाते.  मा.जयक...

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका व इतर शासकीय पातळीवर पदाधिकारी व अधिकारी यांच्या सह्याच्या मंजुरीने कामकाज असावे: मा श्री अभिमन्यू आठवले

संपादक: अभिमन्यू बी. आठवले (बहुजन भूषण वृत्तपत्र)       माहिती अधिकारातून उघड झालेली धक्कादायक परिस्थिती व पुरावे हाती लागले असून ही भयानक बाब समोर आली आहे.  मी ग्रामपंचायत तसेच नगरपंचायतकडे केलेल्या ठरावाच्या प्रति मागितल्या त्यामध्ये ग्रामपंचायतकडून ठरावावर पदाधिकारी यांच्या सह्या नसलेले, त्या ठरावावर फक्त सरपंच, ग्रामसेवक यांच्या सह्या असून अनुमोदक, सूचक यांच्या सह्या नसल्याचे ठराव हाती लागले आहेत.  तर मासिक मिटिंगमध्ये हजर असलेले सदस्य त्यांची नावे व सह्या ठरावर नसल्याचे पुरावे संपादक यांच्या हाती लागले आहेत. तसेच नगरपंचायतकडील ठरावाच्या प्रति संपादक यांच्या हाती लागल्या असून त्या ठरावर फक्त नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सदस्य, सभापती बांधकाम समिती व सूचक म्हणून प्रशासकीय अशी नावे दिसून येत आहेत. ठरावावर फक्त मुख्याधिकारी व नगराध्यक्ष व नगरपंचायतचा शिक्का दिसत आहे. त्यामध्ये ठराव करताना हजर असलेले नगरसेवक व त्यांच्या नावांच्या सह्या दिसत नाहीत. त्यामुळे नक्की हा ठराव खोटा कि खरा?, चुकीचा की बरोबर? कि वरिष्ठ अधिकारी यांची दिशाभूल करणारा ठराव आहे कि काय? ...

ब्रिटीशकालीन शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती करा: भीमराव फुले

उपसंपादक: वैभव आठवले (बहुजन भूषण)      सरकार बदलते, शासन निर्णय बदलतात परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. यासाठी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्यावतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन, शेतकर्‍यांच्या समस्या समजुन घेत प्रशासकीय, न्यायालयीन पातळीवर काम सुरू केले असुन शेतरस्त्यासाठी न्याय मिळवत तोडगा काढण्यासाठी सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चळवळीच्या वतीने जिल्हयात शिवपानंद शेतरस्त्यांच्या नंबरीचे सर्वेक्षण करून नंबरी हलवणाऱ्यांना दंड सुरू करा, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयातील सर्व तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस निकाली काढण्याचे तातडीने आदेश द्यावेत. समृद्ध गावांसाठी ग्रामस्तरीय शेतरस्ता समित्यांची स्थापना करून समित्यांच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने घ्यावा, चालू वहीवाटीच्या प्रत्येक शेतरस्त्याचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून घेण्याचे आदेश द्यावेत. शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, नकाशावरील शेतरस्त्यांच्या मोजणी व संरक्षण फी बंद करा. शेरस्त्याअभावी नापिक राहणाऱ्या भूधारकांना विनाअट नुकसान भरपाई द्या, प्रशासक...

राष्ट्रमाता जिजाऊ ज्ञानज्योती सावित्रीमाई यांच्यामुळेच नारीशक्तीचा सन्मान: माण तालुक्याचे आमदार, ना. ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य मा.जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती सौ. सोनिया गोरे

उपसंपादक: वैभव आठवले (बहुजन भूषण वृत्तपत्र)    राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध गुणदर्शन स्पर्धांचे प्रशस्तीपत्रक वाटप व भव्य मोफत सायकल वाटप, बचत गटांना स्वस्त धान्य दुकान वाटप इत्यादी कार्यक्रम जिजाऊ सावित्रीच्या जयंती निमित्त करण्यात आले.    राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध गुणदर्शन स्पर्धांचे प्रशस्तीपत्र वाटप व भव्य सायकल वाटप हा कार्यक्रम शिवसेनेचे नेते तथा विश्वस्त नातेपुते एज्युकेशन सोसायटी राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहिगाव येथील श्री श्री ज्ञान मंदिर या संस्थेवर आयोजित करण्यात आलेला होता.       यावेळी बोलताना मा. आमदार, ना. ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मा.जयकुमार गोरे यांच्यापत्नी सौ.सोनियाताई गोरे म्हणाल्या, सरकारने आज लाडकी बहीण योजना आणली, प्रत्येक कुटुंबाला बहिणीला स्वावलंबी बनवायचा मानस सरकारचा आहे. ताईंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अध्यात्मावर शाळेने जास्तीत जास्त भर दिला आहे. शाळेतील मुल...