Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

नातेपुते येथील खंडोबा मंदिरावर सुवर्ण कलशा रोहन धार्मिक कार्यक्रमाचे शानदार आयोजन

उपसंपादक - बहुजन भूषण वृत्तपत्र      नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे दिनांक 28-8-2023 वार सोमवार मिती श्रवण शुद्ध द्वादशी शके 1945 या दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. हा आनंदी सोहळा दोन दिवस चालणार आहे दिनांक 27-8-2023 रविवार रोजी 9-30 ते 12-30 सुवर्ण कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे, त्याच दिवशी 12-30 वाजता कलश स्वागत, दुपारी 1ते 4 होम हवन, दुपारी 1ते 3 महाप्रसाद कार्यक्रम, गणेश पूजन, पुण्याह वाचन, नांदी श्रद्धा असे कार्यक्रम होणार आहेत, तसेच 28-8-2023 सोमवार या दिवशी देवता स्थापना, जलशिवाय आणि धान्य दिवस सकाळी 7ते 10, अग्नी स्थापना, नवग्रह स्थापना, होम हवन सकाळी 10ते 12-30 महंत ब्राह्मचारी ह.भ.प.भगवान महाराज वरप गावकर हस्ते कलश बसविण्यात येणार आहे व प्रसाद फराळ कार्यक्रम होणार आहे त्याच दिवशी हरी किर्तन महंत ह.भ.प भगवान महाराज वरप गावकर जि.बीड यांचे होणार आहे. महाप्रसाद श्री.गणेश उराडे बापु फ्रेंड्स ग्रुप नातेपुते यांच्या कडून होणार आहे.  तसेच सुवर्ण कलशा रोहन समिती नातेपुते यांच्या वतीने खंडोबा मंदिरावर सुवर्ण कलश बसविण्यात येणार आहे तरी सर्व बंधू भगिनी...

सोलापूर जिल्हाधिकारी मा.कुमार आशीर्वाद यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिन साजरा होत नाही त्यासाठी त्वरित सर्व तहसीलदार यांना आदेश द्यावेत: मा.श्री.डॉ. अभिमन्यू बी. आठवले

संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र सोलापूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयात लोकशाही दिन साजरा होत नाही हि गंभीर बाब आहे. फक्त सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन न चुकता साजरा केला जातो हे कौतुकास्पद आहे परंतु जिल्ह्यातील तहसील कार्यालयात लोकशाही दिन घेण्यास अधिकारी यांना का अॅलर्जी आहे हेच कळत नाही. लोकशाही दिन तालुका स्तरावर तहसील कार्यालयात साजरा झाल्यास जनतेचा पैसा, वेळ, मानसिक त्रास कमी होईल असे संपादक म्हणून वाटते. तसेच काही तहसील कार्यालयात लोकशाही दिन साजरा होतो का? असे कर्मचारी यांना विचारले त्यावेळी त्यांनी सांगितले कि येथे होत नाही. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय तेथे होतो हे वेदनादाई आहे. तरी जनतेचे हित समजून मा.सोलापूर जिल्हाधिकारी यांनी त्वरित तहसील कर्यालयात लोकशाही दिन साजरा करण्यात यावा यासाठी तात्काळ आदेश काढून जनतेला होणारा त्रास कमी करावा. तहसील कार्यालयातील लोकशाही दिन जनतेला फायदेशीर ठरणार आहे. तालुका स्तरावरील लोकशाही दिनात अर्जदारांनी दिलेल्या अर्जाचे अधिकारी यांनी निवारण केले नाही, टाळाटाळ केली, दखल घेतली नाही, दफ्तर दिरंगाई केली, अडचण असल्यास मार्ग...

नातेपुते येथे शिवप्रेमींनी बसवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण  गेल्या अनेक वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नातेपुते येथे शिवप्रेमीकडुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धप्रणाकृती पुतळ्याचे चबुतऱ्यावर अनावरण केल्याने महसूल प्रशासन पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी तात्काळ हजर झाले व त्या ठिकाणी संबंधित शिवप्रेमी यांना हा पुतळा कधी कोणी बसवला विचारणा करू लागले मात्र हा पुतळा कधी व कोणी बसवला हे कोणासही माहीत नव्हते.  परंतु महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा मंगळवार दिनांक १८ जुलै २०२३ रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांना गाफील ठेवून शिवप्रेमीकडून हा पुतळा बसविण्यात आला मात्र हा पुतळा बसवल्याने सर्वधर्मीय शिवप्रेमी तसेच राजकीय सामाजिक संघटनेचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बुधवार दिनांक १९ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून फटाक्यांचे आतिषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आनंद व्यक्त करत होते तर एका बाजूला महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी य...

श्रीमती सायरा मुर्तुजा मुलाणी यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा

संपादक साप्ताहिक बहुजन भूषण    दि.१६/०७/२०२३ रोजी  ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील शिक्षण विस्तार अधिकारी, बीट वेळापूर, पंचायत समिती माळशिरस श्रीमती सायरा मुर्तुजा मुलाणी या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा रविवार दि. १६/०७/२०२३ रोजी कृष्णप्रिया मल्टीपर्पज हॉल, बायपास रोड, संग्रामनगर-अकलुज याठिकाणी  सकाळी १० वा. ३० मि. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या कार्यक्रमास मा.श्री. मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, सभापती - कृषी उत्पन्न बाजार समिती, अकलूज, मा.श्री.धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील, चेअरमन - शिवामृत दुध संघ, विझोरी,  मा. स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, संचालिका - स.म.शं.मो.पा.सह.सा.का.लि. शंकरनगर यांचे हस्ते संपन्न होणार आहे. तसेच  मा.श्री. शहाजीराव (बाबाराजे देशमुख),  माजी उपाध्यक्ष, जि. प. सोलापूर,   मा.श्री. किशोरसिंह मारुतराव माने-पाटील,  मा. सरपंच ग्रामपंचायत, अकलूज,   मा.श्री. विनायक जगन्नाथ गुळवे गट विकास अधिकारी, पं.स.माळशिरस,  मा. डॉ. एम. पी. मोरे माजी वैद्यकीय अ...

संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी आषाढीवारी सोहळ्यानिमित्त पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशन व वाखरी ग्रामसुरक्षा रक्षक दल यांची आदर्शवादी सेवा

 संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र राजाभाऊ लक्ष्मण गायकवाड यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार  सालाबादप्रमाणे आषाढी वारी निमित्त याही वर्षी 27/06/2023 रोजी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे वाखरी यागावी शेवटच्या टप्प्यातील बाजीराव विहीर याठिकाणी रिंगण सोहळा पार पडला. त्याठिकाणी पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशन व वाखरी गावातील ग्रामसुरक्षा दल हे गेली 15 वर्षे उत्कृष्ट व आदर्श सेवा देत आहेत. पंढरपूरकडे जाई पर्यंत हे सुरक्षा दल उत्कृष्ट सेवा बजावत आहेत यामध्ये मुलींचाही सहभाग असतो.  याकाळात उद्योगपती सूर्यकांत रामचंद्र जगताप व पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार मा.समाधान अवताडे साहेब यांनी 230 टी-शर्ट सुरक्षा दलाला दिले. यासाठी सामाजिक कार्यात सहभागी होवून सेवा देणारे राजाभाऊ लक्ष्मण गायकवाड, सदाशिव रामचंद्र मस्के, सुनील दादासाहेब गायकवाड, सुधाकर पोपट गायकवाड तसेच वाखरीचे पोलिस पाटील शिंदे कार्यरत होते. राजाभाऊ लक्ष्मण गायकवाड हे वाखरी गावातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आपले कर्तव्य म्हणून कोणत्याही कार्यात सहभागी होत आहेत....

आषाढी वारीनिमित्त वाखरी येथे आरोग्य विभागाची जय्यत तयारी

आरोग्यदूत सेवा देण्यास तयार  संपादक बहुजन भूषण वृत्तपत्र श्री.धनाजी मस्के आरोग्य सेवक यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार  दि. २७/०६/२०२३ मंगळवार रोजी वाखरी ता.पंढरपुर जि.सोलापूर येथे संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज व इतर पालख्यांचा मेळावा होत असतो. या ठिकाणी आरोग्य विभाग पंचायत समिती पंढरपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र गादेगाव अंतर्गत वैदयकिय अधिकारी डॉ.अनिसा तांबोळी, डॉ.अभिजीत रेफाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वारकर्‍यांना आरोग्य सेवा देण्यासाठी तत्पर झाली आहे. यामध्ये वारकरी पालखी तळ व बाजीराव विहिर रिंगण तळ याठिकाणी आरोग्य उपचार केंद्र उभारले आहे. या ठिकाणी सर्व वारकरी यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. तसेच या ठिकाणी हिरकणी कक्ष, उष्माघात कक्ष, महिला सल्ला व समोपदेशन कक्ष उभारला आहे. तसेच वाखरी परिसरामधील ९० पाणी स्तोत्राचे पाणी नमुने तपासून शुद्धीकरण करून घेतले आहे, किटकजन्य आजारा संदर्भात कंटेनर सर्व्हे व धुर फवारणी करून घेतली आहे. माने विहिर व लवटे विहिर या ठिकाणी टँकर भरण्याची तयार पुर्ण केली आहे. या ठिकाणी १५ आरोग्य कर्मचारी शुद्धीकरणासाठी नेमले आहेत. गावाती...

नातेपुते येथे नवीन फॅशन प्लस चा वितरण शुभारंभ

उपसंपादक - साप्ताहिक बहुजन भूषण      नातेपुते येथील डायमंड ऑटो शोरूम मध्ये नवीन फॅशन प्लस या गाडीच्या वितरणाचा शुभारंभ नातेपुते येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ देशमुख डायमंड ऑटो शोरूम चे मालक दस्तगीर मुल्लानी,ऑल इंडिया फ्रेंड सर्कलचे महाराष्ट्र प्रदेशचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिमन्यू आठवले व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्रीकांत बाविस्कर  यांच्या हस्ते करण्यात आला.      यावेळी डायमंड ऑटोचे मालक दस्तगीर मुलांनी यांनी नवीन फॅशन प्लस ही मोटर सायकल हंड्रेड सीसी असून सर्वच बाबतीत दणकट व मोबाईल चार्जिंग पॅशन प्लस वैशिष्ट्य म्हणजे, डीजी अनलॉग मिटर, मोबाईल चार्जिंग पॉकेट, स्टायलिश फॉरेवर, अशी आहेत असे असल्याचे त्यांनी सांगितले.      यावेळी अली आणि नुह दस्तगीर मुल्लानी यांनी केक कापून शुभारंभ केला. यावेळी ग्राहक व शोरूम मधील सर्व स्टाफ हजर होता. बातमी  अधिक जाहिरातीसाठी संपर्क  संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले  ९४२०३०२५६१  उपसंपादक : वैभव अ. आठवले  साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक : बहुजन...