दि.१६/०७/२०२३ रोजी ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील शिक्षण विस्तार अधिकारी, बीट वेळापूर, पंचायत समिती माळशिरस श्रीमती सायरा मुर्तुजा मुलाणी या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा रविवार दि. १६/०७/२०२३ रोजी कृष्णप्रिया मल्टीपर्पज हॉल, बायपास रोड, संग्रामनगर-अकलुज याठिकाणी सकाळी १० वा. ३० मि. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
या कार्यक्रमास मा.श्री. मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, सभापती - कृषी उत्पन्न बाजार समिती, अकलूज, मा.श्री.धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील, चेअरमन - शिवामृत दुध संघ, विझोरी, मा. स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, संचालिका - स.म.शं.मो.पा.सह.सा.का.लि. शंकरनगर यांचे हस्ते संपन्न होणार आहे.
तसेच मा.श्री. शहाजीराव (बाबाराजे देशमुख), माजी उपाध्यक्ष, जि. प. सोलापूर, मा.श्री. किशोरसिंह मारुतराव माने-पाटील, मा. सरपंच ग्रामपंचायत, अकलूज, मा.श्री. विनायक जगन्नाथ गुळवे गट विकास अधिकारी, पं.स.माळशिरस, मा. डॉ. एम. पी. मोरे माजी वैद्यकीय अधिकारी, मा. श्री. धनंजय हरिश्चंद्र देशमुख गट शिक्षण अधिकारी, पं.स.माळशिरस, मा. श्री. प्रदीपकुमार विठ्ठल करडे शिक्षण विस्ताराधिकारी, पं.स. माळशिरस हे प्रमुख उपस्थिती म्हणून येणार आहेत.
हा कार्यक्रम सोहळा पार पाडण्यासाठी श्री. चाँद आलमुद्दीन मुलाणी, श्री. रमजान आलमुद्दीन मुलाणी, श्री. जिलाणी गफुर मुलाणी, श्री. दस्तगिर आलमुद्दीन मुलाणी, डॉ. श्री. समिर अब्दुलगनी शेख, श्री. मैनुद्दीन गफुर मुलाणी, समस्त मुलाणी परिवार हे परिश्रम घेत आहेत.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.