संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
राजाभाऊ लक्ष्मण गायकवाड यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार
सालाबादप्रमाणे आषाढी वारी निमित्त याही वर्षी 27/06/2023 रोजी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे वाखरी यागावी शेवटच्या टप्प्यातील बाजीराव विहीर याठिकाणी रिंगण सोहळा पार पडला. त्याठिकाणी पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशन व वाखरी गावातील ग्रामसुरक्षा दल हे गेली 15 वर्षे उत्कृष्ट व आदर्श सेवा देत आहेत. पंढरपूरकडे जाई पर्यंत हे सुरक्षा दल उत्कृष्ट सेवा बजावत आहेत यामध्ये मुलींचाही सहभाग असतो.
याकाळात उद्योगपती सूर्यकांत रामचंद्र जगताप व पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार मा.समाधान अवताडे साहेब यांनी 230 टी-शर्ट सुरक्षा दलाला दिले. यासाठी सामाजिक कार्यात सहभागी होवून सेवा देणारे राजाभाऊ लक्ष्मण गायकवाड, सदाशिव रामचंद्र मस्के, सुनील दादासाहेब गायकवाड, सुधाकर पोपट गायकवाड तसेच वाखरीचे पोलिस पाटील शिंदे कार्यरत होते. राजाभाऊ लक्ष्मण गायकवाड हे वाखरी गावातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आपले कर्तव्य म्हणून कोणत्याही कार्यात सहभागी होत आहेत.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१