संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
सोलापूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयात लोकशाही दिन साजरा होत नाही हि गंभीर बाब आहे. फक्त सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन न चुकता साजरा केला जातो हे कौतुकास्पद आहे परंतु जिल्ह्यातील तहसील कार्यालयात लोकशाही दिन घेण्यास अधिकारी यांना का अॅलर्जी आहे हेच कळत नाही. लोकशाही दिन तालुका स्तरावर तहसील कार्यालयात साजरा झाल्यास जनतेचा पैसा, वेळ, मानसिक त्रास कमी होईल असे संपादक म्हणून वाटते.
तसेच काही तहसील कार्यालयात लोकशाही दिन साजरा होतो का? असे कर्मचारी यांना विचारले त्यावेळी त्यांनी सांगितले कि येथे होत नाही. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय तेथे होतो हे वेदनादाई आहे. तरी जनतेचे हित समजून मा.सोलापूर जिल्हाधिकारी यांनी त्वरित तहसील कर्यालयात लोकशाही दिन साजरा करण्यात यावा यासाठी तात्काळ आदेश काढून जनतेला होणारा त्रास कमी करावा.
तहसील कार्यालयातील लोकशाही दिन जनतेला फायदेशीर ठरणार आहे. तालुका स्तरावरील लोकशाही दिनात अर्जदारांनी दिलेल्या अर्जाचे अधिकारी यांनी निवारण केले नाही, टाळाटाळ केली, दखल घेतली नाही, दफ्तर दिरंगाई केली, अडचण असल्यास मार्गदर्शन केले नाही तर सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनात त्या अधिकारी विरोधात तक्रार दाखल करता येईल. त्यामुळे तालुका स्तरावरील तहसील कार्यालयातील लोकशाही दिन साजरा होत नाही तो सुरु करण्यात यावा यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी मा.कुमार आशीर्वाद साहेब यांनी तात्काळ आदेश काढून जनतेचे हित पहावे असे बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक मा.श्री.डॉ.अभिमन्यू आठवले संपादक याँनी प्रसिद्धीद्वारे केली आहे.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१