![]() |
आरोग्यदूत सेवा देण्यास तयार |
संपादक बहुजन भूषण वृत्तपत्र
श्री.धनाजी मस्के आरोग्य सेवक यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार
दि. २७/०६/२०२३ मंगळवार रोजी वाखरी ता.पंढरपुर जि.सोलापूर येथे संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज व इतर पालख्यांचा मेळावा होत असतो. या ठिकाणी आरोग्य विभाग पंचायत समिती पंढरपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र गादेगाव अंतर्गत वैदयकिय अधिकारी डॉ.अनिसा तांबोळी, डॉ.अभिजीत रेफाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वारकर्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी तत्पर झाली आहे. यामध्ये वारकरी पालखी तळ व बाजीराव विहिर रिंगण तळ याठिकाणी आरोग्य उपचार केंद्र उभारले आहे. या ठिकाणी सर्व वारकरी यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. तसेच या ठिकाणी हिरकणी कक्ष, उष्माघात कक्ष, महिला सल्ला व समोपदेशन कक्ष उभारला आहे.
तसेच वाखरी परिसरामधील ९० पाणी स्तोत्राचे पाणी नमुने तपासून शुद्धीकरण करून घेतले आहे, किटकजन्य आजारा संदर्भात कंटेनर सर्व्हे व धुर फवारणी करून घेतली आहे. माने विहिर व लवटे विहिर या ठिकाणी टँकर भरण्याची तयार पुर्ण केली आहे. या ठिकाणी १५ आरोग्य कर्मचारी शुद्धीकरणासाठी नेमले आहेत. गावातील सर्व हॉटेल तपासणी करण्यात आली आहेत.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१