उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
अहिल्यादेवी पतसंस्थेचे व अक्षय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.रघुनाथ (अण्णा) आत्माराम कवितके यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभ रविवार दि.०४/०६/२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. कवितके सांस्कृतिक भवन नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे आयोजित केला आहे. यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.उत्तमराव जानकर साहेब, संचालक कृषि उत्पन्न बाजार समिति, अकलुज व समारंभाचे अध्यक्ष मा.श्री. शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, माजी.उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर यांच्या उपस्थितीत समस्त ग्रामस्थ व सत्कार समिति नातेपूते यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने रविवार दि.०४/०६/२०२३ रोजी सकाळी ०८.०० वा. वृक्षारोपण चंद्रकांत घुगरदरे प्रशाला नातेपुते तसेच सकाळी ०९.०० वा. ग्रामीण रुग्णालय नातेपुते येथे रुग्णांना फळे वाटप हे कार्यक्रम होणार आहेत.
तसेच सकाळी १०.०० वा. सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, जेष्ठ नागरिकांचा सन्मान, बचत गटातील महिलांचा सन्मान, गणेश उत्सव मंडळांचा सन्मान, उद्योजकांचा सन्मान, स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान इ. कार्यक्रम होणार आहेत व त्यादिवशी मा.श्री.रघुनाथ (अण्णा) कवितके यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भव्य असा सत्कार समारंभ आनंदी वातावरणात व वाजत गाजत संपन्न होणार आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.