उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र
सध्या जातिवाद मोठ्या प्रमाणात असून हा माणुसकीला काळिमा आहे. जातिवादी स्वत:ला उच्च दर्जाचे समजत आहेत. जातिवाद्यांना दलित समाजावर अन्याय करणे म्हणजे एक "फॅशनच" झाली आहे. दलित बांधवांची एकी नाही ही "नाडी" जातिवादी यांनी ओळखली आहे. तसेच दलित समाजातील ज्या ५९ जाती ह्या अनुसूचीत जातीमध्ये मोडतात त्या प्रत्येक जातीकडे "मी पणा, गर्व" आहे. तसेच या जाती सवलती घेण्यासाठी पुढे आणि रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी मागे अशी परिस्थिती आहे. दलित व्यक्तींवर अन्याय झाल्यास त्वरित रस्त्यावर उतरणारा समाज म्हणजे "बौद्ध समाज" होय. सध्या जातिवाद ग्रामीण भागात प्रचंड दिसून येत आहे. दलित समाजाचा त्यांना "विटाळ, अॅलर्जी" आहे. त्यामध्येही अनुसूचीत जातीमधील ५९ जातीचे पुढारी दलाली करताना दिसत आहेत ही गंभीर व चिंताजनक बाब आहे. दलित सामाजावर दररोज जातिवादी समाजकंटक अन्याय-अत्याचार करीत आहेत. त्यामध्ये अयोग्य पाणी पिण्यास भाग पाडणे, जखमी करणे, अपमान व बदनामी करणे, अमानुष कृत्य करणे, दलित सामाजाच्या बेकायदेशीर जमिनी बळकावणे, दमदाटी करणे, भीक मागावयास लावणे, दलित सामाजाच्या जमिनी बळकावून वहिवाट करणे, दृष्टहेतूने खोटी व अधिकारी यांना दिशाभूल करणारी माहिती देणे, ग्रामपंचायत मधून खोटे ठराव करणे, अधिकारी यांना चुकीची माहिती देणे, विनयभंग करणे, जातिवाचक शिव्या देणे, लैंगिक छळ करणे, पाणी दूषित करणे, घरे जाळणे, घर पाडून रस्ता करणे, गाव सोडावयास लावणे, जबरदस्तीने ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचेकडून जबरदस्तीने घर जागा सोडावयास लावणे, अधिकारी यांना खोटा पुरावा देणे, खून करणे, बलात्कार करणे इ.प्रकारे दलित सामाजावर अन्याय जातिवादी, हरामखोर, भाडखाऊ, समाजकंटक करीत आहेत. अशा जातिवादी यांना फाशीच दिली पाहिजे. त्यांना तर जगण्याचा अधिकार कशासाठी? गावात सर्वच जातिवादी नसतात, एखादे दुसरे घर गावात जातिवाद करत असते, त्याच जातिवाद्यांना बेघर केले पाहिजे, जेणेकरून गावात शांतता राहिली पाहिजे. जातिवाद्यांनी अनुसूचीत जातीतील अनेक तरुणांचा "बळी" घेतला आहे, त्यांची घरी उधवस्त केली आहेत. अनुसूचीत जाती जमातीच्या सर्वच जातीने यापुढे एकसंघपणे राहिले पाहिजे. तुमच्याकडे जमीन, पैसा काहीही नसूद्या, फक्त एकमेकांना साथ देवून, अन्याय करणारे जातिवादी आहेत त्यांना जोर का झटका देण्यासाठी एकसंघपणा महत्वाचा आहे असे बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटनेचे संस्थापक अभिमन्यु आठवले यांनी आपली चीड, वेदना, व्यथा, खंत मांडली.
नांदेड जिल्हयातील बोंडारा गावातील अक्षय भालेराव याने गावात आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून जातिवाद्यांनी त्या भीम सैनिकाचा खून केला त्या जातीवाद्याचा निषेध व अक्षय भालेराव या भीम सैनिकाला माझी भावपूर्ण आदरांजली...!
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१