Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

नातेपुतेच्या ‘मंडईचा राजा’ मंडळाला जिल्हास्तरीय ‘आदर्श मंडळ’ पुरस्कार पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या हस्ते सन्मान

  


उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र  

दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी श्री हनुमान गणेशोत्सव मंडळ, ‘मंडईचा राजा फाउंडेशन’ (स्थापना १९५०) यांना त्यांच्या ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवाच्या वर्षात एक मोठा गौरव प्राप्त झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेचे उत्कृष्ट कार्य करत असलेल्या या मंडळाला सोलापूर ग्रामीण पोलिस यंत्रणेतर्फे ‘जिल्हास्तरीय आदर्श गणेशोत्सव मंडळ’ म्हणून सन्मानित करण्यात आले.

    हा पुरस्कार पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ‘आदर्श गणेश उत्सव संकल्पने’ अंतर्गत मंडळाच्या कार्याची दखल घेऊन देण्यात आला. बुधवारी झालेया एका समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळेस श्री हनुमान गणेश मंडळाचे अध्यक्ष -  विजय पिसे , उप अध्यक्ष - अभिजीत भिसे, खजिनदार - वैभव शहा तसेच मंडइचा राजा फाउंडेशन चे अध्यक्ष - विघ्नेश पदमन , उप अध्यक्ष - नीलेश गरगडे , सचिव - अमित चांगन , उपसचिव - तुषार देसाई तसेच मंडळातील सदस्य - धनंजय गरगडे,अमर भिसे, पृथ्वीराज पवार,राहुल दीक्षित व अक्षय पदमन यांनी सन्मानाचा स्वीकार घेतला.या अभिमानास्पद क्षणी मंडळाच्या प्रतिनिधींनी सोलापूर ग्रामीण पोलिस दल, नातेपुते पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. महारुद्र परजने, अडशन यश पी प्रीतम यावलकर पी आय नामदेव शिंदे व नातेपुते पोलीस चे गोपनीय देशमुख साहेब सुधीर हांगे पोलीस कॉन्टेबल स्थानिक पत्रकार मित्र, नगरपंचायत, सर्व ग्रामस्थांना तसेच सर्व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना आभार व्यक्त केले.

    ७५ वर्षांची वारसाहक्काची वाटचाल

    हनुमान गणेशोत्सव मंडळाने सुरुवातीच्या काळात रामायण-महाभारतावरील नाटके, भारुड यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम राबवून गावात सांस्कृतिक एकात्मता निर्माण केली. कालांतराने मंडळाने श्री गणेश मंदिराची स्थापना केली व समाजहिताचे अनेक उपक्रम सुरू केले. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे हिंदू- जैन - मुस्लिम ऐक्य जोपासले गेले आहे तसेच महिलांना अध्यक्षपदासह सर्व पदांवर प्रतिनिधित्व दिले जाते.

    समाजोन्नतीचे बहुआयामी कार्य

    मंडळाने गेल्या अनेक वर्षांदरम्यान समाजासाठी मिसाल उभी केली आहे. यामध्ये दर चतुर्थीला कीर्तन, नवजात मुलींसाठी ‘सुकन्या समृद्धी योजना’, वृक्षारोपण, नेत्रतपासणी शिबीर, मोफत चष्मा वाटप, रक्तदान व अवयवदान जागरूकता शिबीर, आरोग्य शिबीर, शिक्षक सन्मान, ‘मंडईचा राजा’ पुरस्कार, होम मिनिस्टर, फॅशन शो सारख्या स्पर्धा यांचा समावेश होतो. कोरोना काळात मंडळाने अन्नदानाचे मोठे कार्य केले.

    ‘क्रमांकापेक्षा समाजकार्य महत्त्वाचे’

    गेली ११ वर्षे सलग प्रथम क्रमांक आणि ७ वर्ष आदर्श मंडळाचा मान मिळवणाऱ्या या मंडळाने एक महत्त्वाचे निर्णयात्मक पाऊल टाकले आहे. नवीन मंडळांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मंडळाने आता पुढे होऊन कोणत्याही प्रकारचा क्रमांक किंवा पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. मंडळाचे म्हणणे आहे की, ‘‘आमचे एकच ध्येय राहील: श्री च्या कृपेने आणि लोकांच्या सहकार्याने नातेपुतेकरांसाठी आणि समाजासाठी उत्कृष्ट समाजकार्य करणे आणि तालुका व जिल्हास्तरीय मध्ये आपल्या नातेपुते नगरीचे व श्री हनुमान मंडळाचे नाव करणे.’’

    मंडळाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात हा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याने सर्व कार्यकर्ते अभिमानाने उंचावलेले आहेत.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

                       टीप : जे दिसलेजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.   

Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...