Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

कोळी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे, अभ्यासु व्यक्तिमत्व प्रा.बाळासाहेब बळवंतराव सर



संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र 

आज महादेव कोळी समाजाची भयानक, गंभीर, परिस्थिती आहे, कोळी समाजाचे जगणे अवघड झाले आहे. बोटावर मोजण्या इतपत कोळी समाजाची प्रगती दिसत असली तरी ग्रामीण शहरामध्ये मुल, निवासी कोळी समाजाची भयानक बिकट परिस्थिती महाराष्ट्र राज्यात आहे. कोळी समाजाचे हलाकीचे जीवन, व्यथा, वेदना प्रा.बाळासाहेब बळवंतराव सर यांनी पाहिली आहे. 

सरांचे मत असे आहे की, ज्या जातीत मी जन्म घेतला त्या मी समाजाचे देण लागतो, माझा समाज हक्कापासून वंचित राहू नये, भेडसावणाऱ्या मूलभूत गरजा मिळाव्यात, समाज वंचित राहू नये अशी तळमळ सरांची आहे. समाजाचे संघटन अतिशय महत्वाचे आहे, अनेक वर्ष, पिढ्या गेल्या आहेत परंतु समाज प्रगती पासून वंचित राहिला आहे. समाजाची अधोगतीच आहे, शासनाच्या योजनांपासून दूर आहे. मूठभर समाजातील समाज बांधव सुधारले म्हणून समाज सुधारला असे होत नाही. त्यासाठी प्रा.बाळासाहेब  बळवंतराव सर धडपडीत आहेत. 

समाजाचे जे अधिकार व हक्क मिळवून देण्यासाठी त्यांची समाज बांधिलकी म्हणून समाज एक संघ करण्यासाठी, चळवळ उभी करण्यासाठी, समाज जागृत करण्यासाठी, समाजाची प्रगतीकडे वाटचाल होवे, सर्वं कोळी समाज बांधवानी एकसंघपणा दाखवावा. यामध्ये महादेव कोळी, कोळी ढोर, टोकरे कोळी, कोळी, डोंगर कोळी, कोळी मल्हार, इत्यादी कोळी समाज बांधवानी एकत्र येणे काळाची गरज आहे. कोळी समाज बांधवाना प्रा.बाळासाहेब बळवंतराव सर यांच्या रूपाने समाजाला एक अभ्यासु खमक्या नेता "समाज सेवक" मिळाले आहेत. त्यांना सर्वं कोळी समाज बांधवानी आपला माणूस, हक्काचा माणूस म्हणून स्वीकारावे, त्यांना ताकद द्यावी, बळ द्यावे, कोळी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे, अधिकारी वर्गावर वचक असलेले, बहुजन समाजप्रिय मनमिळाऊ असे नेतृत्व कोळी समाज बांधवासाठी आदर्श आहेत. सर्वं कोळी समाज बांधवानी सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक व संपादक/पत्रकार श्री.अभिमन्यू आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे .

लेखाकंन. :अभिमन्यू आठवले संपादक बहुजन भुषण वृत्तपत्र

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

                       टीप : जे दिसलेजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.   

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...