संपादक
नातेपुते
ग्रामपंचायत मधील उपसरपंच मा.अतुल(बापू) राजेंद्र पाटील व प्रकाश साळवे(ग्रामपंचायत
सदस्य) व पॅनल प्रमुख व सरपंच, सदस्य यांच्या मानसिकतेमुळे वार्ड
क्र.३ मधील रहिवाशांना भेडसावणारा जो सांडपाण्याचा प्रश्न होता त्यासाठी गटार महत्वाची
होती. अनेक वार्ड क्र.३ मध्ये सरपंच, सदस्य होऊन गेले परंतु त्यांनी
गटारीचा प्रश्न सोडविला नाही परंतु वार्ड क्र.३ मधून मा.अतुल(बापू) राजेंद्र पाटील
सदस्य म्हणून निवडून आले व उपसरपंच झाले व प्रकाश साळवे हेही सदस्य म्हणून निवडून गेले
त्यांनी वार्ड क्र.३ मध्ये रहिवासी यांचा सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावून मोठ्या
सीमेंट पाईपांचा वापर करून बंदिस्त गटार काढून नातेपुते पालखी मैदान तळाशेजारील रहिवासी
यांचा कायमचा प्रश्न मिटवला व रहिवाशांचा वनवास संपविला. निवडणुकीदरम्यान गटारीचा प्रश्न
मार्गी लावला जाईल असे आश्वासन अतुल (बापू) पाटील यांनी दिले होते ते पूर्ण करून ५०
वर्षे रेंगाळलेला गटारीचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे मा.अतुल (बापू) राजेंद्र पाटील, (उपसरपंच) व मा.प्रकाश साळवे (सदस्य), ग्रामपंचायतमधील
सरपंच, सर्व सदस्य, पॅनल प्रमुख त्यांचे
कौतुक येथील रहिवाशी करीत आहेत. मानसिकता असेल तर कोणतेही काम अवघड नाही हे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, पॅनल प्रमुख यांच्या सहमतीतून असे कठीण प्रश्न सुद्धा मार्गी लागू शकतात.
वार्ड क्र.३ मधील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीचे काम करून रोगराईला आळा बसविला
आहे त्यामुळे वार्ड क्र.३ मधील रहिवासी यांच्याकडून ग्रामपंचायतमधील सर्वांचे अभिनंदन
होत आहे व अशीच कामे करून आदर्श कामगिरी करावी
इतकेच.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.