संपादक
सोलापूर
जिल्ह्यातील असलेल्या तालुक्यातील ग्रामीण मधील गावठाण असो वा शहरातील शासनाची मोकळी
जागा असो तेथे असंख्य कुटुंबांनी परिस्थितीनुसार त्या ठिकाणी ते सन २०११ पूर्वीपासून
राहत आहेत. तसेच त्यांना घरामध्ये वीज कनेकशन, नळ कनेकशन, आजी-माजी पदाधिकारी यांनी घर बांधणेसाठी ना हरकत दाखला, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगारपरिषद, नगरपंचायत यांनी दिले असून
ते पाणीपट्टी व वीज बिल भरत आहेत. यांची घरजागा नियमित होते. “राहील त्याची जागा व
कसेल त्याची जमीन” हा कायदा लागू पडत आहे. तसेच या कुटुंबाकडे जुने नवीन रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पाणीपट्टी पावती, वीज बिल पावती, भारत देशातील कोणत्याही ठिकाणचे
आधार कार्ड, पॅन कार्ड, यापैकी कोणताही एक पुरावा अतिशय महत्वाचा आहे. त्यासाठी जे कुटुंब
ग्रामपंचायत गावठाण हद्दीत व इतर पालिका हद्दीत अतिक्रमणे करून राहत आहेत त्या कुटुंबांनी
वरील कार्यालयाकडे घर जागा नियमित करण्यासाठी अर्ज सादर करावेत त्यामुळे घर जागा नावावर
झाल्यास त्या कुटुंबाला घरकुलचा लाभ मिळेल. तसेच एक वेदनादायी बाब आहे की, वरील कार्यालयामध्ये जे जातिवादी
कारभारी आहेत ते ठराव करण्यास विरोध करीत असतात हे अनुभवले आहे. तर काही कुटुंबांना
ग्रामपंचायत गावठाण हद्दीत राहून ५० वर्षे झाली आहेत तरी जातिवादी कारभारी ठराव करण्यास
धजावत नाहीत ही चिंताजनक बाब आहे. ज्या ठिकाणी कुटुंब राहत असेल त्या ठिकाणचा सर्व्हे
करून त्या ठिकाणची जागा नियमित केली गेली पाहिजे. सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील
गावामध्ये अनुसूचीत जाती जमातीचे कुटुंब गेले ५० वर्षे गावठाणात राहत आहेत परंतु जातिवादी
कारभारी जाणूनबुजून त्या कुटुंबाचे घर जागा नियमित करीत नाहीत अशा कारभारयावरती अनुसूचीत
जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ सुधारित कायदा २०१५ नुसार कारवाई केली गेली
पाहिजे. या जातिवादी कारभारी यांना घर जागा नियमित करण्यास “विटाळ” होतोय की काय? असा प्रश्न पडतो. कुटुंब कोणत्याही
जाती धर्माचे असुदया त्यांची घर जागा नियमित केली गेली पाहिजे. तर काही ग्रामीण भागात
ग्रामपंचायत हद्दीमध्ये काही कुटुंब गेले ५० वर्षे राहत आहेत त्या कुटुंबाच्या घरामागे रस्ता करून त्या
कुटुंबावर रस्त्यात घर बांधले आहे असे आरोप करीत आहेत व त्या कुटुंबाला बेघर व बहिष्कृत
करण्याचा कट जातिवादी कारभारी यांनी रचला आहे हे ही पहायला मिळत आहे असे संघटनेचे संस्थापक
व वृत्तपत्राचे संपादक पत्रकार अभिमन्यु आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे.
जनहितार्थ
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.