केरबा बापू लांडगे (उपोषणकर्ते) |
संपादक
नातेपुते ता.माळशिरस,जि.सोलापूर येथील लोकशाही
अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर नातेपुते पोलिस स्टेशन मधील वरिष्ठ व कनिष्ठ पोलिस
अधिकारी व पोलिस कर्मचारी यांच्या विरोधात दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष
केरबा बापू लांडगे यांनी बेमुदत धरणे आंदोलनासाठी कार्यालयीन वेळेत अर्धनग्न गुडघ्यावर
बसून मास्क लावून, आंदोलन करीत आहेत. नातेपुते पोलिस स्टेशनचे
वरिष्ठ व कनिष्ठ पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांचा वाळू,
जुगार, मटका, दारू करणारे आहेत त्यांना
आधार देत असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हफ्ते वसूल करीत आहेत. राजरोसपणे हे धंदे
करीत असून त्यांच्यावरती कोणतीही कारवाई करीत नाहीत परंतु किरकोळ असे व्यवसाय करणारे
आहेत त्यांच्यावर हे अधिकारी कारवाई करत आहेत असा भेदभाव कशासाठी? असे केरबा लांडगे यांचे म्हणणे आहे. असे अवैध धंदे चालवणारे जे मालक आहेत
त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. कामगारावर कशासाठी? तसेच नातेपुते
पोलिस स्टेशनचे अधिकारी बीट हवलदारामार्फत मोठ्या प्रमाणात हफ्ते वसूल करण्यास सांगत
आहेत असे लांडगे म्हणतात. वाळू, जुगार,
मटका, दारू हे धंदे करणारे आहेत त्यांना मोकाट सोडून किरकोळ असे
धंदे करणारे आहेत त्यांचावर मात्र हे अधिकारी गुन्हे दाखल करीत आहेत. वरिष्ठ अधिकारी
यांनी वाळू तस्कर, मोकामधील आरोपी गुंडागर्दी करणारे आहेत त्यांचावर
कारवाई केली पाहिजे असे वरिष्ठ अधिकारी यांचे आदेश असताना सुद्धा नातेपुते येथील पोलिस
अधिकारी कारवाई करीत नाहीत. तसेच नातेपुते पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी गोरगरीब व्यक्ति
तक्रार करण्यास आल्यास त्यांना हाकलून दिले जाते, अपमानित केले
जाते. या अधिकारी यांचाकडून चांगली वागणूक मिळत नाही, आदर मिळत
नाही असे लांडगे यांचे म्हणणे आहे. तसेच दोनचाकी, चारचाकी गाड्या
अडवून अत्यावशयक सेवा देणारे असो वा नसो त्यांच्याकडून ५००,१०००,२००० रुपयेची मागणी केली जाते असे लांडगे यांचे म्हणणे आहे. तसेच नातेपुते
पोलिस स्टेशन मधील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी कोव्हिडचे लसीकरण केलेल्या कर्मचार्यांची
यादी मागितली आहे. नातेपुते पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी हे मनमानी करीत आहेत असे
केरबा लांडगे यांचे म्हणणे आहे यासाठी जे वरील व्यक्ति अवैध धंदे करीत आहेत त्यांच्यावर
कारवाई झाली पाहिजे व त्यांना पाठीशी घालणार्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. १० दिवसाच्या आत वरील सर्व धंदे बंद केले जावेत यासाठी १) पोलिस अधीक्षक, ग्रामीण सोलापूर, २) विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर
परीक्षेत्र, ३) उपविभागीय पोलिस अधिकारी अकलुज, ४) नातेपुते पोलिस स्टेशन यांना निवेदने देण्यात आली आहेत.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र
वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना
महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे
पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.