श्री. सदगुरू लक्ष्मणदास महाराज |
वाखरी
ता.पंढरपूर जि.सोलापूर येथील श्री. लक्ष्मणदास महाराज पुण्यतिथि मोहोत्सव (भंडारा)
दरवर्षी साजरा होत असतो परंतु गेल्या वर्षापासून व याही वर्षी १२/०६/२०२१ रोजी शनिवार
या दिवशी होणारा (भंडारा) कोरोना कोव्हिड-१९ या आपत्तीमुळे होईल किंवा नाही परंतु मोजक्याच
भाविकांना घेवून आरतीचा कार्यक्रम होईल असे माजी सरपंच गंगाधर पराप्पा गायकवाड यांनी
माहिती दिली व हेच सकाळ संध्याकाळी महाराजांची आरती करीत असतात. महाराजांच्या (भंडारा)
उत्सवामुळे वाखरी गावाला यात्रेचे स्वरूप येत असते. सप्ताह, कीर्तन, हरिपाठ पुण्यतिथि दिवशी येणार्या
भाविकांना अन्नदानाचा प्रसाद दिला जातो. लक्ष्मणदास महाराज हे असंख्य भक्तांचे श्रद्धा
स्थान आहे. वाखरी या गावी महाराजांचे दगडी बांधकाम केलेले रेखीव व कोरीव दगडाचे बांधकाम
असा मठ आहे. पुण्यतिथिच्या दिवशी गाव गजबुजून गेलेले असते. दिवसभर कार्यक्रम असतात.
संध्याकाळी वाजत गाजत भजन म्हणत लेझिम खेळत महाराजांच्या पादुकांची भव्य अशी मिरवणूक
काढली जाती. या दिवशी पंढरपूर ते वाखरी काही ट्रक मालक भक्तांना ने आण करण्यासाठी मोफत
सेवा देतात. दानशूर भक्त पुण्यतिथि निमित्त गहू, गूळ, तांदूळ, दक्षिणा देतात. श्री. लक्ष्मणदास महाराज यांचा वार
गुरुवार आहे. मंदिर उघडण्यास व सामोहिक कार्यक्रम घेण्यास त्यामुळे यावर्षी होणारा
पुण्यतिथीचा कार्यक्रम मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत होईल. महाराजांची ११८ वी पुण्यतिथि
आहे. लक्ष्मणदास महाराजाची वाखरी गाव पावन भूमी म्हणून नावारूपास आले आहे. महाराजांचे
वाखरी येथे जमीन असून तेथेही वस्ती स्थान आहे. त्या ठिकाणीही भक्त दर्शनासाठी जातात.
तसेच पंढरपूर येथे भीमानदी येथे श्री.लक्ष्मणदास महाराज यांची समाधी आहे तेथेही भक्त दर्शनासाठी
जातात. श्री.लक्ष्मणदास महाराज काल म्हणजे इसवी सनाच्या २० व्या शतकाची काही अंतिम
वर्ष श्री.लक्ष्मणदास महाराज यांचे समकालीन म्हणजे श्री.गोंदवलेकर महाराज, श्री.सीताराम महाराज (खर्डी), श्री.साईबाबा (शिर्डी), श्री.गजानन महाराज (शेगाव)
असे होते. वाखरी येथे लक्ष्मणदास महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक
येत असतात इतकेच.
श्री.लक्ष्मणदास महाराज पुण्यतिथि मोहोत्सव (भंडारा) निमित्त सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा
*बातमी*
*अधिक जाहिरातीसाठी संपर्क*
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
*टीप : जे दिसले, जे पाहिले, जे अनुभवले तेच लिहणे हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे*