संपादक
नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील पालखी तळाशेजारील राहत असलेले प्रा.दत्तात्रय साळवे सर यांच्या
घरापुढे कंपाऊंडच्या आतमध्ये असलेली होंडा कंपनीची दुचाकी गाडी नं.एम.एच.45 यू २४३०
ड्रीम युगो या गाडीला आग लावून अज्ञात व्यक्तीने जाळून नुकसान केले आहे. ही घटना समजताच
नातेपुते पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी भेट दिली. ही घटना मंगळवारच्या १५/०६/२०२१
रोजीच्या मध्यरात्री घडलेली आहे. जळीत गाडीच्या शेजारी फोर व्हीलर गाडी होती परंतु
त्या गाडीचे नुकसान झाले नाही. नातेपुते येथे दुचाकी जाळल्यामुळे रहिवाशी यांच्यामध्ये
तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पालखी तळाशेजारील राहणार्या लोकांमध्ये
चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रा.दत्तात्रय साळवे सर हे सरळमार्गी व्यक्ति असून ते
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय येथे नोकरी करीत आहेत. ही घटना जाणूनबुजून
कोणीतरी केली गेली असेही चित्र आहे. या घटनेची माहिती पोलिस स्टेशनकडे दिली जाणार आहे
असे प्रा.दत्तात्रय साळवे सर यांनी सांगितले आहे. पालखी तळाशेजारील रहिवाशाची दुचाकी
जाळण्याची ही पहिलीच घटना आहे. गाडी का जाळली? कोणी जाळली? कशासाठी जाळली? जाळण्याचा हेतु काय? असे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. गाडी जाळण्यामागे कारण काय असावे? वाद विवाद कोणाचेही नाहीत तसेच प्रचंड माणुसकी असलेले साळवे सर आहेत. त्यांच्याबाबतीत
घटना घडावी ही चीड आणणारी, मनस्ताप वाटणारी घटना आहे. साळवे सरांच्या
दुचाकीला आग लावून नुकसान करण्याचा अज्ञात व्यक्तीचा “कट” असावा असे वाटते. तसेच साळवे
सरांच्या शेजारी इतर व्यक्तीच्या घराच्या पटांगणात उघड्यावर काही रहिवाशी यांच्या दुचाकी, चारचाकी गाड्या आहेत परंतु त्या गाड्याबाबत कोणतीही घटना घडली नाही हे विशेष.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु
बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण,
साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप : जे दिसेल, जे
पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.