Skip to main content

Posts

Showing posts from July, 2020

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

वृत्तपत्र चालवणे संपादकापुढे अडचण निर्माण झालेमुळे महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत करावी

संपादक           सध्या कोरोना कोव्हिड-१९ या रोगाने थैमान घातले असून देश व जनता यामध्ये भरडुन व व्याकुळ होत आहे. त्यामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून दैनिक , साप्ताहिक , मासिक , पाक्षिक , लहान , मोठे चॅनेल चालवणे संपादकापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शाई , कागद , वाहतूक , कर्मचारी इ. साठी भरमसाठ खर्च येत असल्यामुळे सध्या वृत्तपत्रे छापणे संपादकापुढे आर्थिक पैशाची अडचण येत आहे. तर वृत्तपत्रे छापण्यसाठी लागणारा पैसा यासाठी मित्रमंडळी , नातेवाईक किंवा इतरांकडून हात उसने पैसे घेऊन वृत्तपत्रे छापावे लागत आहेत. सध्या वृत्तपत्रांना जाहिराती मिळणे सुद्धा अवघड झाले आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब आहे परंतु हा चौथा खांब मजबूत रहावा यासाठी वृत्तपत्रे चालवणे महत्वाचे आहे. परंतु संपादकापुढे आर्थिक पैशाची अडचण भासत आहे तर काही संपादकाने आपली वृत्तपत्रे पैशा अभावी छापणे बंद केले आहे. सर्व वृत्तपत्राचे संपादक असो वा चॅनेल चे संपादक असो त्यांना सरकारकडून आर्थिक पैशाच्या मदतीची गरज आहे. संपादक गुडघ्यावर आले आहेत , वृत्तपत्र छापणे व वितरीत क...

समाधान (भाऊ) भोसले म्हणजे माळशिरस तालुक्यातील लहान थोरांचे आशास्थान

मा. श्री. समाधान (भाऊ) भोसले संपादक             सिद्धार्थनगर , ता. माळशिरस जि. सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान भोसले हे लहान थोरांचे आधारस्तंभ आहेत. ते असंख्य युवकांच्या गळ्यातील ताईत आहेत. माणूसपणा जपणे हाच छंद समाधान यांना आहे. कधी चांगल्या वाईट संकट समयी संभाळलेली माणसं त्यांच्याकडून चुका झाल्या तरी त्यांना मोठया मनाने माफ करतात. मोठा मनाचा हा युवक एक आदर्श सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख निर्माण झाली आहे. असंख्य राजकीय पक्षाचे कार्यकर्ते , नेते समाधान भोसले यांना मान सन्मान देत आहेत. समाधान भोसले नावाचे मंच काढून सर्व समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांनी मंच स्थापन केले आहे. एक जिवाभावाचा आपला लाडका भाऊ समाधान भोसले आहेत असे प्रत्येक युवकांना वाटत आहेत. प्रचंड लोकप्रियता असलेले समाधान भोसले सर्वांच्या आनंदात , दु:खात  सहभागी होताना दिसतात. त्यांच्याजवळ माणुसकीचा झरा आहे. मा. आयुष्मान समाधान (भाऊ) भोसले साहेब आज आपला वाढदिवस आहे. तुमचे सामाजिक कार्य जसा सूर्य कलेकलेने उगवतो व मोठा होऊन सर्वांना प्रकाश देतो...

कर्मयोगी रघुनाथ उराडे उर्फ बापू यांना आठवले परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

          नातेपुते ता. माळशिरस , जि. सोलापूर येथील कर्मयोगी रघुनाथ (बापू ) उराडे यांची निधन वार्ता समजली खूप दु:ख झाले. बापूंचा प्रामाणिकपणा , सत्यपणा , सत्यवादी , मनमोकळेपणा निर्भिडपणे आपले विचार मांडत असत. साधी राहणी , उच्च विचारसरणी बापूंची होती. त्यांचे विचार परिवर्तनवादी व प्रबोधनवादी असत , रोखठोक न्यायाची बाजू घेऊनच न्याय देणारे असे बापू होते. बापूंचा हात माझ्या पाठीवर शब्बासकी देऊन गेला. बापूंच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. बापू लहान थोरांचे आदर्श होते. त्यांच्या जाण्याने जो त्यांच्या कुटुंबावर आघात झाला तो आघात पचवण्याची ताकत परमेश्वराने त्यांच्या कुटुंबांना द्यावी. तसेच बापूंच्या आत्म्यास शांति लाभू ही ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांच्या दु:खात माझा आठवले परिवार सामील होत आहे.

कोरोना कोव्हिड-19 या काळातील लॉकडाऊनचा फायदा नाही तर तोटा झाला आहे, मायबाप सरकारने जनतेला वेठीस धरू नये

संपादक           मार्च पासून देश , राज्य , जिल्हे , तालुके , शहरे , गाव कोरोना कोव्हिड -19 या रोगामुळे लॉकडाऊन , संचारबंदी , जमावबंदी सतत चालू आहे. शासनाचे आदेश व जनतेचे हाल अशी परिस्थिति सध्या चालू आहे. ज्या जनतेने लाख मोलाचे पवित्र मत दिले त्याच जनतेची आज उपासमार चालू आहे. कोरोना हा रोग वाटला होता आज पर्यंतच्या रोगापेक्षा भयंकर हा रोग आहे पण यामध्ये काही तथ्य नाही ही अफवा आहे असे माझे मत आहे. विनाकारण सरकारने या रोगाला प्रमाणापेक्षा जास्त महत्व दिले. हा रोग औषध , गोळ्या , इंजेक्शन , हजारो लाखो रुपये किमतीच्या औषध वापरुन बरे करीत आहेत असे काही नाही तर एकांतपणा म्हणजेच क्वारंटाईन केले जाते त्यामुळे रुग्ण आपोआप बरा होतो. कोरोना झालेल्या व्यक्तीला महागडे किमतीची औषध , गोळ्या , इंजेक्शन दिले जात नाही फक्त बंदिस्त ठेऊन ताप , थंडी , सर्दी , खोकला , गर्दी , मळमळ , अंगदुखी , डोकेदुखी , शुगर , बीपी इ. आहेत म्हणून त्या व्यक्तिला कोरोना रोग झाला असे बनवले जात आहे. आज जनतेला घाबरून सोडण्याचे काम सध्या चालू आहे. राज्यकर्त्यांनी ...

कोरोना कोव्हिड -१९ चे क्वारंटाईन केलेले रुग्ण १४ दिवसानंतर पॉझिटिव्ह चे निगेटिव्ह कसे होतात त्यांना कोणते औषध, गोळ्या, इंजेक्शन दिले जातात ते डॉक्टरांनी जनतेसमोर अहवाल मांडावा

संपादक सध्या कोरोना कोव्हीड -१९ या रोगाची सगळीकडे भीती पसरली असून हा रोग ज्या व्यक्तिला झाला आहे त्या व्यक्तीला क्वारंटाईन केले जाते. क्वारंटाईन केल्यानंतर कोणतेही औषध , गोळ्या , इंजेक्शन दिले जात नाही ते ही रुग्ण निगेटिव्ह होऊन १४ दिवसांनी घरी जातात व पॉझिटीव्ह व्यक्तींना औषध , गोळ्या , इंजेक्शन डॉक्टर देऊन १४ दिवसात बरे करतात ते कोणती औषधे , त्या औषधांची एकूण किंमत किती त्या रुग्णांना १४ दिवसात बरे करण्यासाठी खर्च किती येतो ते डॉक्टरांनी जनतेसमोर मांडावा. शासनाने ही कोरोना कोव्हिड -१९ या रोगाला जास्त महत्व देऊ नये. संचारबंदी , जमावबंदी , लॉकडाऊन उठवावे. जनतेला मिळालेले जीवन त्यांना आनंदाने जगू द्या. कोरोना या रोगाची भीती दाखवून त्यांचा खून करू नका. त्या व्यक्तींना जीवनातून उठवू नका. हे पाप तुम्हाला क्षमा करणार नाही हा कोरोना रोग क्षुल्लक रोग आहे याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. जनतेची सरकारला एवढी काळजी आहे तर जनतेवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिस खात्याला का देता ? त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई करून लाखो रूपयांचा दंड जनतेकडून का आकारता ? कोरोनाचे नाव मोठे आणि लक्षण...

कोरोना कोव्हिड -१९ या रोगाची शास्त्रज्ञांनी, डॉक्टरांनी माझ्या शरीरावरती जनतेच्या हितासाठी टेस्ट करावी

मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले संपादक           मी संपादक अभिमन्यु बी. आठवले आज जे जनतेच्या मनात धडकी व भीती कोरोना रोगाची आहे. केवळ ताप , थंडी , सर्दी , गर्दी , घसा खवखवणे , मळमळ करणे , तापमान कमी जास्त होणे. माणसाच्या शरीरात जन्मापासूनच ही लक्षणे असतात. ती या कोरोना कोव्हिड -१९ च्या रोगाच्या काळात आली असे नाही. कोरोना हा रोग त्या व्यक्तीच्या शरीरात कुठे आणि कसा लपतो आहे ? तो शरीराच्या कोणत्या भागाची पोखरणी करीत आहे ? या रोगाची लागण झालेल्या व्यक्तीचे फोटो यंत्रसामोग्रीच्या सहाय्याने जनतेसमोर शास्त्रज्ञ व डॉक्टर यांनी जनतेसमोर आणावेत. तसेच कोरोना या रोगाची लागण झालेली व्यक्ति व मी अभिमन्यु बी. आठवले एकत्र एकाच ताटात जेवतो , समोरासमोर चर्चा करतो , त्यावेळी त्या रुग्णाची लागण मला होईल का ? मी माझे शरीर कोरोना टेस्टसाठी देण्यास तयार आहे. माझ्या कुटुंबाचा विचार न करता जनतेच्या हितासाठी शास्त्रज्ञ व डॉक्टर यांनी माझ्या शरीरावर टेस्ट करावी अशी माझी विनंती आहे. मला मरण आले तरी जनतेच्या हितासाठी सार्थक ठरेल अशी माझी शास्त्रज्ञ व डॉक्ट...

वाखरी गावावर कोरोना या रोगाचा शिरकाव, गावात येणारे सर्व रस्ते केले बंद

संपादक           वाखरी ता. पंढरपूर जि. सोलापूर या गावी कोरोना रोगाचा रुग्ण सापडला असून त्या व्यक्तीच्या घराशेजारील व्यक्तींचे तपासणीचे काम जोराने चालू आहे. गावात घरोघरी जाऊन तसेच वाडी वस्तीवर जाऊन आरोग्य कर्मचारी ग्रामस्थांची तपासणी करत आहेत. कोरोना या रोगाचा रुग्ण आढळून आल्यामुळे वाखरी गावात व आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाखरी गावात मास्क लावणारे मोजकेच ग्रामस्थ दिसत असून तसेच शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे असे समजते. वाखरी गावात व वाडी वस्तीवर पंढरपूर ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त जोरात चालू आहे. वाखरी गावातील आजूबाजूचे रस्ते ग्रामस्थांनी अडवले आहेत. या कोरोना रोगाचा वाखरी गावावर शिरकाव झाला आहे त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. गावात व परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वाखरी गाव पुर्णपणे सील केले आहे असे ग्रामस्थांनकडून माहिती मिळाली आहे. यासाठी प्रांत अधिकारी , उपविभागीय पोलिस अधिकारी , तहसिलदार , गटविकास अधिकारी , आरोग्य अधिकारी व त्यांचे कर्मचारी ग्रामीण चे वरिष्ठ पोल...

नातेपुते व इतर परिसरातील गावामध्ये मास्क गळ्यात आणि तोंड उघडे असे सर्वत्र भयानक परिस्थिती

संपादक      नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूर या गावात ५० % घराबाहेर पडणारे ग्रामस्थ आहेत. तसेच घरातून बाहेर पडणारे मोकाट टाइमपास म्हणून फिरणारे ग्रामस्थ यांच्याकडे पाहिले असता गळ्यात मास्क आणि तोंड उघडे बघायला मिळत आहेत. नातेपुते गावात कोरोना या रोगापासून गाव , ग्रामस्थ आनंदी रहावे , कोणतीही विचित्र घटना घडू नये , कोणावरही या रोगाचे संकट येऊ नये यासाठी ग्रामपंचायत , नातेपुते पोलिस स्टेशन सतत दक्ष आहेत. नियम मोडू नका , आदेशाचे पालन करा असे सांगितले जाते पण या आदेशाकडे काही ग्रामस्थांचे लक्ष नाही ही शोकांतिका आहे. तसेच नातेपुते पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या गावामध्येही अशीच भयानक परिस्थिती आढळत आहे. जे गळ्यात मास्क तोंड उघडे अशी जी व्यक्ति करीत असेल तर पोलिस खात्याने दांडक्याचा प्रसाद दिलाच पाहिजे कारण कोरोना या रोगाची लागण नातेपुते या गावात झाली तर करोना या रोगाचे ढीग लागतील याचा विचार जनतेने केला पाहिजे. मास्क हा गळ्यात अडकवण्यासाठी नाही तर तोंडातून हवेद्वारे पडणारे सूक्ष्मजंतु थांबवण्यासाठी आहेत. बाबांनो मास्क गळ्यात अडकावू नका तोंडावर बांधा तसेच दरोरज सकाळी काही ग...

नातेपुते येथे गरीब व गरजूंना आर्थिक सहाय्य करण्यासाठीच श्री. रामहरी रूपनवर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना – माजी आमदार रामहरी रूपनवर

श्री. रामहरी रूपनवर नागरी सहकारी पतसंस्थेच्या उदघाटनप्रसंगी  प्रकाश पाटील पंढरपूर, बाबाराजे (दादा) देशमुख, माजी आमदार रामहरी रूपनवर, प्रकाश पाटील पाणीव, अॅड. डी. एन. काळे, संतोष काळे इ.   संपादक           नातेपुते तालुका माळशिरस , जि. सोलापूर येथे श्री. रामहरी रूपनवर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. या पतसंस्थेचे उदघाटन सुधाकरपंत परिचारक , पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील पंढरपूर , माजी आमदार रामहरी रूपनवर , रेणुका परिवाराचे नेते सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. बाबाराजे (दादा) देशमुख यांच्या हस्ते फीत कापून झाले. माजी आमदार रामहरी रूपनवर म्हणाले की , सध्या कोरोना या रोगाने थैमान घातले असून मोठी आर्थिक अडचण झाली आहे ही पतसंस्था गरीब व गरजू लोकांना अर्थसाहय्य करणारी आहे. या संस्थेत तीन हजार सभासद झाले आहेत. ह्या पतसंस्थेला अॅड. डी. एन. काळे वकील यांनी जागा दिल्यामुळे व या ठिकाणी धुळदेव पतसंस्थेने यशस्वी वाटचाल केली असल्यामुळे आमच्या पतसंस्थेला ही जागा यशस्वी ठरेल व चांगली वाटचाल करेल असे पतसंस्थेचे चे...

भारतीय घटनेचे शिल्पकार प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावरील हल्याचा जाहीर निषेध

संपादक भारतीय घटनेचे शिल्पकार प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई दादर येथील राजगृहावरती समाजकंटकांनी दगडफेक केली , नुकसान केले त्या “समाजकंटकाच्या ७० पिढीचे फडके फाडलेच पाहिजे”. जे समाजकंटक आहेत त्यांची भरचौकात होळी केली पाहिजे. बाबासाहेबांचे राजगृह ही आमची अस्मिता आहे. जीव की प्राण आहे. राजगृहावरील वरील हल्ला का आणि कशासाठी केला याच्या मागे कोणाचा हात आहे हे सरकारने समाजकंटकांना ताब्यात घेऊन चौकशी करावी. त्या समाजकंटकांना फासावर लटकावले पाहिजे म्हणजे असे समाजकंटक राजगृहाकडे बघणार नाहीत. राजगृह म्हणजे न्याय मंदिर आहे. त्या न्याय मंदिरावर हल्लाच काय पण वाकडी नजर केली तर डोळे सुद्धा समाजकंटकाचे काढावे लागतील. महाराष्ट्र सरकारने या समाजकंटकांना कोणी पाठवले याच्या मागे जातिवादी आहेत काय याचा शोध लावला पाहिजे. त्या समाजकंटकांना भिम सैनिकांच्या ताब्यात द्यावे त्याचे काय करावे ते भिम सैनिक करतील. राजगृहावर हल्ला हा तमाम आंबेडकरी जनतेवरील हल्ला आहे. राजगृह हे आमचे दैवत आहे. अरे समाजकंटकांनो हिम्मत असेल तर समोरासमोर या तुमचा खेळ खल्लास केल्याशिवाय भिम सैनिक राहणार नाहीत. तोंडाला क...

बांधवांनो सरकारचे डोके ठिकाणावर आहे तुमचे डोके ठिकाणावर ठेवा

संपादक             कोरोना कोव्हिड – १९ या रोगाच्या काळात महाआघाडीचे सरकार जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे असे दिसते. हे सरकार डोक ठिकाणावर ठेऊन कर्तव्य पार पाडत आहे परंतु बांधवांनो तुम्ही शासकीय आदेश मोडत आहात , तुम्ही जागृत राहत नाही म्हणून कोरोना हा रोग तुमच्यापर्यंत पोहचत आहे. तुम्ही स्वत: ची , कुटुंबाची व इतरांची काळजी घेत नाही. शासनाला सहकार्य करायची आपली सर्वांची जबाबदारी आहे. सरकारला दोष देण्याचे कारण नाही. बांधवानो कोरोना या रोगाची दिवसेंदिवस वाढ होत आहे केवळ आपल्यामुळे शासन , डॉक्टर , आरोग्य कर्मचारी , पोलिस , सफाई कामगार , पत्रकार हे आपल्यासाठी झटत आहेत त्यांना सहकार्य केले पाहिजे. लॉकडाउन वाढवण्यासाठी आपण सर्वस्वी जबाबदार आहोत हे सर्वांनी लक्षात घ्या. वेळेवर रक्त तपासा , तोंडाला मास्क बांधा , सॅनिटायझर चा वापर करा , हात स्वच्छ धुवा , गर्दीत जाऊ नका , मोकाट फिरू नका , कोरोना हा रोग घातक रोग आहे कधी मुळावर उठेल हे सांगता येत नाही. सरकारच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा आपणच आपली काळजी घेतली तर अशी आपत्ती येणार नाही. या कोरोना या रोगाच...