Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

नातेपुते तालुका माळशिरस, जि. सोलापूर येथे संचारबंदी, जमावबंदीचे ग्रामस्थांकडून काटेकोरपणे पालन

संपादक           नातेपुते हे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटची बाजारपेठ असलेले  गाव आहे. थोड्याच किलोमीटरवरती  पुणे आणि सातारा जिल्हे लागत आहेत. नातेपुतेतील ग्रामस्थ शासकीय आदेशाचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. मुंबई पुणे येथून आलेल्या व्यक्तीला कॉरंनटाईन केले आहे त्याची देखभाल प्रांत (अकलूज), डी वाय एस पी (अकलूज), तहसीलदार (माळशिरस), गटविकास अधिकारी (माळशिरस), नातेपुते पोलीस स्टेशन चे युवराज खाडे साहेब व त्यांचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी इ. नातेपुते गावात कोरोना या रोगाची लागण होऊ नये म्हणून झटत आहेत.  अधिक माहितीसाठी संपर्क  संपादक - मा. डॉ. श्री. अभिमन्यू  बी.आठवले ९४२०३०२५६१                                                                                    ...

मा. वैभव शहा म्हणजे कुटुंब वात्सल्य नेतृत्व

मा. वैभव शहा म्हणजे कुटुंब वात्सल्य नेतृत्व संपादक       वैभव सुरेंद्र शहा रा. नातेपुते ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील असून सर्व धर्म समभाव असा एक दिलदारपणा, आपुलकी, सेवाभावी वृत्ती, दयाळूपणा वैभव सुरेंद्र शहा यांच्याकडे आहे ते लहानथोर असुद्या त्यांना प्रचंड आदर देतात.  वैभवजी यांना संस्काराचे बाळकडू आई वडिलांपासून मिळाले. चांगले करता आले नाहीतर वाईट तरी करू नये ही शिकवण वैभवजी यांना आई वडिलांनी दिली. आपले कर्तव्य समजून रंजल्या गांजलेल्यांना मदत करणे हे त्यांचे गुण आहेत माणुसकी जपणे हेच कर्तव्य समजून कार्य करीत आहेत. लहानथोरांना आपला मित्र समजून मान देतात. आई वडिलांच्या सोबत राहून इलेक्ट्रॉनिकचे रीपेरिंगचे काम करून उदरनिर्वाह करीत असताना एखाद्याचे दुःख वेदना आपत्यकाळ यामध्ये आपले कर्तव्य समजून मदत करतात, धावून जातात हाच मला फार मोठा आनंद वाटतो अशी भूमिका वैभव यांची असते. सर्व बंधुभावाचे कुटुंब हेच आपले कुटुंब समजतात त्यामुळे ते इतरांचे कुटुंब हे आपले कुटुंब समजून मिळून मिसळून राहतात त्यामुळे माणुसकीचे दर्शन वैभवजी कडे आहे. ते विविध ठिकाणी कार्यक्रमात भाग घेऊन कर...

दानशूर राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!

दानशूर राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साप्ताहिक बहुजन भूषण कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली. संपादक - अभिमन्यू  बी.आठवले ९४२०३०२५६१  उपसंपादक - वैभव अ. आठवले  साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र  बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार

कॉरंनटाईन च्या नावाखाली माणसाचा छळ करू नका

संपादक       कोरोना covid-19 या रोगाचे आपत्य देशावर व देशातील जनतेवर आले आहे. संचारबंदी, जमावबंदी आहे. कामानिमित्त बाहेर गावी गेलेल्या व्यक्ती लॉकडाऊन च्या काळात आपल्या गावी येत आहेत परंतु गावातील पुढारी, शासकीय अधिकारी त्यांना जाणूनबुजून कॉरंनटाईन करीत आहेत. त्यांची येताना तपासणी केलेली असते, वरिष्ठ अधिकारी यांचे प्रमाणपत्र असते असे असताना केवळ बाहेरून आल्याचा ठपका ठेऊन गावातील पुढारी राजकारण करून माणुसकी सोडून वागत आहेत ही चिंताजनक बाब आहे अशी परिस्थिती देशात व राज्यात आहे . कॉरंनटाईन करा, काळजी घ्या, त्यांचा अपमान करू नका, त्यांना वेदना होईल असे वागू नका, त्यांचा मानसिक छळ करू नका, छळ करणे हा गंभीर गुन्हा आहे. कॉरंनटाईन केले आणि एखाद्या व्यक्तीचे बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार पुढारी व अधिकारी असतील. त्यामुळे माणुसकी जपा एवढेच... 🙏जनहितार्थ🙏                                                                ...

भारत देशाचा तिरंगा ध्वज काळी टोपी घालून फडकावणे हा गंभीर अपमान व जो फडकावील तो या देशाचा दुश्मन

संपादक                भारत देशाचा तिरंगा ध्वज हा देशाचा व देशातील जनतेचा अभिमान, स्वाभिमान आहे असे असताना २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), १ मे (महाराष्ट्र दिन) या दिवशी भारताचा तिरंगा ध्वज काळी टोपी घालून पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्व राज्याचे राज्यपाल, पालकमंत्री, सर्व मंत्री,  सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी ते सरपंच इतर कोणीही यांनी काळी टोपी घालून राष्ट्रध्वज फडकवू नये जो राष्ट्रध्वज फडकाविल तो देशाचा दुश्मन समजला जाईल. यापूर्वी ज्यांनी काळी टोपी घालून राष्ट्रध्वज फडकावला त्यांचा आम्ही निषेध करतो. तसेच एखाद्या सभेच्या वेळी एखाद्या युवकाने काळा शर्ट घालून कार्यक्रमाच्या ठिकाणी आला असता त्याठिकाणी त्या युवकाला थांबू देत नाहीत हाकलून देतात मग हा तर देशाचा तिरंगा ध्वज काळी टोपी घालून फडकावणे हा तर मोठा गंभीर गुन्हा आहे. 🙏जनहितार्थ🙏                                                   ...

मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब सरकारची कामगिरी दमदार

संपादक  महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. मा. उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मा. अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व तिन्ही पक्षाचे मंत्री, सर्व आमदार, सर्व मित्रपक्ष व  सर्व मंत्री महाराष्ट्रातील जनतेची काळजी घेत आहेत सतर्क राहत आहेत पण वाईट वाटते की ज्या शिवसेना या पक्षाने अनेक वर्षे मित्र पक्षाला साथ दिली तेच मित्र उद्धव ठाकरे साहेब यांच्या कामगिरीवर नाराजी दाखवत आहेत. मित्र शत्रू झाले आणि शत्रू मित्र झाले. मा. उद्धवजी ठाकरे साहेबांमुळे ज्याच्या नशिबात मुख्यमंत्रीपद न्हवते ते शिवसेनेमुळे मिळाले तेच उद्धव ठाकरे साहेब यांना टार्गेट करत आहेत पण उद्धवजी ठाकरे साहेब या देशाचे रिमोट कंट्रोल आहेत हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. संकटसमयी विरोधक राजकारण करत आहेत. हे भारत देशाच्या व महाराष्ट्राच्या जनतेला चीड आणणारे असे आहे.  अधिक महितीसाठी संपर्क  संपादक - अभिमन्यू  बी.आठवले ९४२०३०२५६१  उपसंपादक - वैभव अ. आठवले  साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र  बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ...

समस्त ग्रामस्थ नातेपुते यांच्या मार्फत अन्नदान वाटप

संपादक :      कोरोना कोविड -१९ या आपत्यकाळात अन्नदान गोरगरिबांना वाटप करण्यात आले ज्यांनी या अन्नदानामध्ये भाग घेतला व सढळ हाताने मदत केली त्या अन्नदात्याचे अभिनंदन...!      ज्यांनी आपले कर्तव्य समजून माणुसकी जपली त्याबद्दल त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच. ज्यांनी मदत केली असे समस्त ग्रामस्थ नातेपुते व ग्रामीण भागातील तसेच इतर तालुक्यातील अन्नदाते त्यांची नावे पुढीलप्रमाणे हनुमान गणेश मंडळ, अमोल उराडे, प्रीतम दोशी (इंदापुरकर), हितेश दोशी, मंदार देशपांडे, रुपेश इंगोले, रत्नत्रय परिवार  सदाशिवनागर, महावीर दोशी (वैभवराज मशिनरी), शितलकुमार दोशी, स्वामी विवेकानंद गणेश मंडळ, प्रितम ट्रेडिंग कंपनी व पंकज ट्रेडिंग कंपनी, सखाराम भिसे, बारावी सायन्स २००८ बॅच सर्व विद्यार्थी, शशिकांत मेडिकल, सु. वा. कुलकर्णी, सुधीर & जितेंद्र दोशी, हरहर महादेव ग्रा. बि. शेती पतसंस्था & समस्त हिंदू खाटीक समाज, श्रीराम सेल्स, पटेल बंधू, प्रांजल दोशी (अमेरिका), शहाजीराव मुधोजीराव देशमुख (बाबराजे & रेणुका परिवार), माणिक उराडे, करीम (बाळू) रमजान शेख (यादगार बिर्याणी)...

वाखरी तालुका पंढरपूर येथे ग्रामस्थांचे जमावबंदी, संचारबंदीचे काटेकोरपणे पालन

     संपादक :      वाखरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे ग्रामस्थांकडून जमावबंदी, संचारबंदी तसेच शासकीय आदेशाचे काटेकोरपणे पालन होत आहे. कोण व्यक्ती बाहेरून आला असेल तर त्या व्यक्तीला कॉरनटाईन केले जाते यासाठी सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, ग्रामपंचायत वाखरी येथील सर्व कर्मचारी इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते वाखरी गावात कोणताही कोरोना या रोगाचा रुग्ण आढळून येऊ नये म्हणून गावाची काळजी घेत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क  संपादक अभिमन्यू बी. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र ९४२०३०२५६१

कॉरनटाईन करा पण त्या व्यक्तीची काळजी घ्या

          संपादक :           कोरोना या रोगाच्या आपत्ती काळात ज्या व्यक्ती सापडलेल्या आहेत त्यांना गाव व शहरी पातळीवर तेथील शासकीय अधिकारी व गाव पातळीवरील पुढारी त्या व्यक्तींना कॉरनटाईन करतात परंतु महाराष्ट्रा मध्ये काही ठिकाणी दखल घेतली जात नसलेचे समजते. तरी कॉरनटाईन केलेल्या व्यक्तींना आधार द्या त्यांना वेळेवर चहापाणी, जेवण, औषध उपचार करा. त्यांना परके समजू नका, त्यांना वाळीत टाकू नका, त्यांचा आदर करा, माणुसकीला काळिमा लागेल असा भेदभाव करू नका, त्यांचा अपमान व मानसिक छळ होईल असे वागू नका. त्यांच्यावर आपल्याकडून असे कृत्य आपल्या हातून झालेस तर तो गुन्हा असू शकतो हे लक्षात ठेवा. 🙏जनहितार्थ🙏 संपादक - अभिमन्यू  बी.आठवले  उपसंपादक - वैभव अ. आठवले  साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र  बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार अधिक माहितीसाठी संपर्क  संपादक अभिमन्यू बी. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र ९४२०३०२५६१

भारत देशातील देवस्थाने ज्या त्या राज्य सरकारने ताब्यात घ्यावी

भारत देशातील देवस्थाने ज्या त्या राज्य सरकारने ताब्यात घ्यावी  संपादक :    भारत या देशातील जेवढे राज्य आहेत त्या राज्यामध्ये कोणत्याही धर्माची देवस्थाने असुद्या ती देवस्थाने राज्य सरकारने ताब्यात घेऊन त्या देवस्थानची देखभाल राज्य सरकारने करावी. तसेच पुजा, अर्चा, आरती करण्यासाठी महिना पगारावर पुजारी नेमावा. जे भक्त ज्या देवस्थानला  दान देतात त्या दानाचा उपयोग आपत्यकाळात राज्याच्या व देशासाठी वापरला गेला पाहिजे. त्या देवस्थांवरती सरकार म्हणूनच अधिकार असावा. त्या देवस्थानच्या ट्रस्टी रद्द करावे असे केले तर वादविवाद होणार नाहीत असे वाटते  🙏जनहितार्थ🙏 संपादक - अभिमन्यू  बी.आठवले  उपसंपादक - वैभव अ. आठवले  साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र  बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार अधिक माहितीसाठी संपर्क  संपादक अभिमन्यू बी. आठवले ९४२०३०२५६१

मा. पंतप्रधानसाहेब यांनी २० लाख कोटींच्या केलेल्या पॅकेज बाबत अर्थमंत्री यांनी सविस्तर माहिती द्यावी

मा. पंतप्रधानसाहेब यांनी २० लाख कोटींच्या केलेल्या पॅकेज बाबत अर्थमंत्री यांनी सविस्तर माहिती द्यावी या २० कोटीतून कोणत्या राज्याला, कोणत्या जिल्ह्याला, तालुक्याला कोणत्या योजनेसाठी व कोणत्या विकास कामांसाठी निधी वापरायचा आहे तो प्रत्येकी योजनेसाठी एकूण निधी किती? त्या कार्यालयाचे, त्या विभागाची नावे द्यावीत. तसे परिपत्रक दिलेल्या पॅकेजच्या नुसार काढावे त्यामुळे जनतेला आनंद वाटेल. 🙏जनहितार्थ🙏 संपादक - अभिमन्यू  बी.आठवले  उपसंपादक - वैभव अ. आठवले  साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र  बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार अधिक महितीसाठी संपर्क  संपादक : अभिमन्यु बी आठवले  ९४२०३०२५६१

मरावे परी कीर्ती रूपे उरावे

          महामानव भारतरत्न घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला महान विचार तो म्हणजे तुम्हाला जगायचे असेल तर आपुलकीने, मानाने, सन्मानाने, स्वाभिमानाने जगा आणि कधीतरी मरणार आहे अशी भूमिका डोळ्यासमोर ठेऊन काहीतरी कार्य करून मरा म्हणजे जन्माला आलेले सार्थक होईल यामुळे तुमचे नाव होईल इतिहास होईल. 🙏जनहितार्थ 🙏 संपादक - अभिमन्यू  बी.आठवले  उपसंपादक - वैभव अ. आठवले  साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र  बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार अधिक महितीसाठी संपर्क  संपादक : अभिमन्यु बी. आठवले  ९४२०३०२५६१

शंकरगाव तालुका पंढरपूर येथे पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांची हातभट्टीवर कारवाई

संपादक - पंढरपूर तालुक्यातील जवळपास ३५-४० किलोमीटर वरती असलेले शंकरगाव शंकरगावच्या हद्दीमध्ये दारू काढली जात होती. त्या हातभट्टीवर छापा टाकून सतरा हजार पाचशे रुपये चा मुद्दे माल जप्त केला व तिथेच त्याची विलेवाट लावली. दारू करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला यावेळी पोलीस निरीक्षक किरण अवचर उपस्थित होते. अधिक माहितीसाठी संपर्क  संपादक - अभिमन्यू बी. आठवले                  ९४२०३०२५६१ साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र