श्री.अभिजित भोसले यांचा माळशिरस तालुका प्रमुख, शिंदे गट मा.राजकुमार हिवरकर-पाटील यांचेकडून कौतुकरूपी सत्कार
उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र अभिजित निर्मला भरत भोसले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदी निवड झाली त्यानिमित्ताने शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार शिवरकर पाटील यांनी त्यांचा शिवसेना भावनावर सन्मान केला शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिल्यावर कोणीही गुरगुरणारच हा बाबासाहेबांचा विचार खऱ्या अर्थाने अभिजीत याने शिक्षणाच्या माध्यमातून सार्थक करून दाखवला आई-वडिलांचे छत्र हरपल तरीही खचून न जाता शिक्षणाप्रती स्वतःला वाहून घेतलं त्यामुळे यशाच्या शिखरापर्यंत त्याला पोहोचता आलं मिळालेले यश हे समाजातील उपेक्षित घटकांची सेवा करण्याकरता अर्पण केलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांचा विचार चा जागर होणार तु ज्या परिस्थितीतून अधिक शिकला त्याचा आदर्श एमपीसी यूपीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अकलूज व गिरवी येथे अभ्यास करून कोणतेही खाजगी शिकवणी न लावता सेल्फ स्टडी करून पास झाले. यामध्ये त्यांना २५१.५ गुण मिळवून त्यांना यश मिळाले आहे. ...