Skip to main content

Posts

Showing posts from March, 2024

नातेपुते पोलीस ठाणे येथील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांची आदर्श कामगिरी

उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      नातेपुते पोलीस ठाणे येथे दि.२५/०३/२०२४ रोजी फिर्यादी नामे. अभिनंदन अरविंद दोशी राहणार नातेपुते यांनी नातेपुते पोलीस ठाणे येथे हजर होऊन तक्रार दिली की त्यांची मोटरसायकल MH 45 B 1117 हिरो होंडा कंपनीची सीडी डाऊन २५०००/- (पंचवीस हजार रुपये) किमतीची अक्षय शिक्षण संस्था नातेपुते येथे गेट समोर लावलेली. दिनांक १८/०३/२०२४ रोजी अज्ञात चोरट्याने चोरून नेलेबाबत नातेपुते पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 99/2024 IPC 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस हवालदार धोत्रे हे करत होते.       तसेच १३/०३/२०२४ रोजी फिर्यादी नामे - सौ.कमल बाळासाहेब घनवट, राहणार-नातेपुते ह्या नातेपुते ते शिखर शिंगणापूर येथे जाण्यासाठी एसटी स्टँड नातेपुते येथून प्रवासासाठी बसमध्ये चढत असताना त्यांचे गळ्यातील १०,०००/- (दहा हजार रुपये) किमतीचे दोन डोरले असलेले मंगळसूत्र कुणीतरी आज्ञात चोरट्याने चोरून नेलेबाबत नातेपुते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 73/2024 IPC 379 अन्वये आज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याचा...

सोलापूर राखीव मतदार संघातील गावाचा व मतदार बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी माझी उमेदवारी मा.श्री.अभिमन्यू आठवले

उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र       लोकसभेची निवडणूक आचारसंहिता लागली आहे. २०२४ ची निवडणूक आतापर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा अतिशय महत्वाची आहे. लोकशाही टिकली पाहिजे, हुकूमशाही नष्ट झाली पाहिजे, शेतकरी यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, शिकल्या सवरलेल्या मुलांना काम मिळाले पाहिजे यासाठी मी MIDC उभी रहावी, गावाचा तसेच मतदार बांधवाचा विकास व्हावा इत्यादीसाठी माझी उमेदवारी.       २०२४ ची निवडणूक देशासाठी महत्वाची आहे त्यासाठी मतदार बांधवानी जागृत राहवून आपले पवित्र मत दयावे. जनतेची शासन दरबारी न होणारी कामे करून देण्यासाठी मी सक्षम राहील, आरक्षण ज्या समाजाला पाहिजे ते मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी असेल, अशी हि बनवा बनवी करणाऱ्या पार्टीपासून मतदारांनी सावध रहावे. पवित्र मताचे पावित्र राखावे. २०२४  हि निवडणूक रात्र वैऱ्याची आहे असे समजून मतदान करा.      मी सर्व धर्म-समभाव असे समजून राहत आहे. गेली अनेक वर्ष सडेतोड पत्रकारिता करीत आहे, कोणावरही अन्याय होता कामा नये असे माझे मत असते. सध्या आपले पवित्र मत हे लोकशाहीसाठी महत्वा...

सावंत-टिक शिव विवाह सोहळा संपन्न

उपसंपादक वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते येथील स.म. शंकराव मोहिते-पाटील महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.उत्तम सावंत सर यांचे चिरंजीव चि.सत्यजित ( एम.बी.ए.) व धानोरे येथील श्री.अशोक टिक यांची कन्या चि.सौ.का शेजल ( एम.एस. सी कॉम्प्युटर सायन्स) यांचा  शिव विवाह नातेपुते येथील मधुर-मिलन मंगल कार्यालय येथे  दिनांक १७ मार्च २०२४ रोजी  संपन्न झाला. या विवाहाची वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही जन्मपत्रिका, मुहूर्त न पाहता, हुंडा न देता व न घेता दोन परिवारामध्ये आर्थिक नियोजन करून विवाह सोहळा पार पाडण्यात आला. अक्षदा न टाकता फुलांची पुष्पवृष्टी केली. अक्षदासाठी वापरले जाणारे तांदूळची रक्कम  इंदापूर येथील श्रावण बाळ अनाथ आश्रम यांना अन्नदान म्हणून देण्यात आली. प्रस्तुत विवाहप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार न करता त्यांना महामानवांचे कार्य व विचारावर आधारित पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. कोणत्याही प्रकारचे आहेर न स्वीकारता त्यांची उपस्थिती हाच आमचा आहेर ही भूमिका घेऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. या संपूर्ण विवाह सोहळ्याचे स्वरूप प...

माळशिरस तालुक्यातील शैक्षणिक दाखले त्वरीत वितरीत करावे. मा.श्री. राजकुमार हिवरकर-पाटील (शिवसेना शिंदेगट माळशिरस तालुकाध्यक्ष)

    संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र       माळशिरस तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. इतर तालुक्यामध्ये त्वरीत दाखले मिळतात तर माळशिरस मध्येच दाखले मिळण्यास उशीर का? सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी लागणारा जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्नाचा दाखला काढण्याकरिता विद्यार्थ्यांची अक्षरशः हेळसांड होत आहे.  अधून मधून आपले सरकार सेवा केंद्राचे सर्व्हर किंवा इंटरनेट डाऊन राहत आहे. महा ई सेवा केंद्रातून दाखले काढून देण्याकरिता सर्वर अधून मधून बंद असल्यामुळे दाखले भरण्यास खूप विलंब होत आहे. त्यामुळे सोडण्यासही विलंब होत आहे। त्यामुळे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्याथ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत आणि रात्रभर जागून केंद्र चालकाने दाखले भरले तर तहसिल व प्रांत मधून दाखले सोडण्यास विलंब होत आहे. सर्वच महा-ई-सेवा केंद्रांवर एकसारखी परिस्थिती दिसत आहे.  श्रावण बाळ, संजय गांधी त्याकरिता २१ हजारांच्या उत्पन्न दाखल्याची अट आहे. परंतु मागील काही दिवसां...

महाकिड्सचा सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण संपन्न

संपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र एस.एम.पी. एज्युकेशन सोसायटी नातेपुते संचलित महाकिड्स सी.बी.एस.ई स्कूल फोंडशिरसचा सांस्कृतिक कार्यक्रम युवा नेते जीवनभैय्या उत्तमराव जानकर आणि मामासाहेब पांढरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.  जीवनभैय्या जानकर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना पालकांनी मुलांना मैदानी खेळ, स्पर्धा परीक्षा, आणि मुलांना सकस आहार कसा देता येईल यावर भर द्यावा असे प्रतिपादन केले. एक चांगली सुद्रुढ पिढी घडवायची असेल तर मुलांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धीक विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी  मुलांना मैदानी खेळ, योगा आणि बुद्धिबळ याचे प्रशिक्षण गरजेचे आहे.  महाकिड्स ग्रामीण भागातील पालक आणी विद्यार्थ्यांना खेळ आणि सी.बी.एस.ई अभ्यासक्रमाची पर्वणीच देत आहे  त्याचा फायदा पालक आणी विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले.  तसेच मामासाहेब पांढरे यांनी संस्थेने कोरोना काळातून उभारी घेत पालकांचा विश्वास जिंकून पुन्हा उभारी घेतली आहे याचे कौतुक केले आणि बक्षिस मिळालेल्या चिमुकल्याना शाबासकी दिली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे संस्था...

सोलापूर लोकसभा मतदार संघातून अभिमन्यू आठवले निवडणूक लढविणार

उपसंपादक :साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघातून मा.श्री.अभिमन्यू आठवले हे उमेदवारी दाखल करणार असून महाराष्ट्रातील एक नावाजलेले सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख आहे. अभिमन्यु आठवले हे साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्राचे संपादक पत्रकार आहेत.  तसेच बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक आहेत. निर्भिड, रोखठोक व अन्याय याचा कर्दनकाळ म्हणून ओळख आहे. कायद्याचा अभ्यास, तसेच असंख्य पुरस्काराने सन्मानित झाले आहेत, निर्व्यसनी आहेत, उच्च शिक्षित आहेत, असंख्य आजी-माजी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती, आजी-माजी सभापती, उपसभापती, सदस्य, जि.परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, लहान, थोर, वडील धारी यांनी सोलापूर लोकसभा लढवावी म्हणून अभिमन्यू आठवले यांच्याकडे आग्रह केला आहे.  त्यामुळे गेली दोन महिने सोलापूर लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत. अभिमन्यु आठवले हे लोकसभेचे उमेदवार असणार असल्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जन माणसात मिसळणारे आहेत, त्यांची उमेदवारी म...

नगरपंचायत हद्दीतील स्वस्त धान्य दुकानांची संख्या वाढवा: मा.श्री.राजकुमार हिवरकर-पाटील (शिवसेना शिंदेगट माळशिरस तालुकाध्यक्ष)

संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      माळशिरस तालुक्यामध्ये ४ नगरपंचायती आहेत. अकलूज,महाळुंग,माळशिरस,नातेपुते या नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये स्वस्त धान्य दुकानांची  संख्या अल्प आहे. पूर्वी या सगळ्या ग्रामपंचायती होत्या. नगरपंचायती हद्दीतील वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग, निराधार महिला अशांना स्वस्त धान्य दुकाने गावातील नगरपंचायत हद्दीतील प्रमुख ठिकाणी असल्याने पाच ते सहा किलोमीटर पायपीट करून आणणे शक्य होत नाही किंवा आणायला जाताना साधन नसल्याने आणता येत नाही.प      परिणामी केंद्र व राज्य सरकारने गरिबांसाठी मोफत दिलेले धान्य सुद्धा घेता येत नाही. त्यामुळे नागरिकांना योजनांपासून वंचित रहावे लागते.      त्यासाठी  प्रत्येक प्रभाग निहाय स्वस्त धान्य दुकानाची निर्मिती करावी याबाबतचे निवेदन श्रीमती सीमा होळकर जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर व महाराष्ट्र यांना समक्ष व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांना मेल द्वारे देण्यात आले आहे.      वरील  निवेदनाबाबत तात्काळ लक्...

नवीन पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी गेली तर कुटुंबे उध्वस्त होतील मा.श्री. राजकुमार हिवरकर-पाटील (शिवसेना शिंदेगट माळशिरस तालुकाध्यक्ष)

    संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र          अतिशय चिंताजनक बाब म्हणजे १८ ते ३५ वयोगटातील मुलांची संख्या ८० टक्के आहे. पुणे जिल्ह्यामध्ये व कुरकुम या ठिकाणी तसेच सोलापूर एमआयडीसी या ठिकाणी सुद्धा अमली पदार्थांचे हजारो कोटीचे साठे आढळून आलेले आहेत. अशा घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.      सदरील संवेदनशील विषय म्हणून निर्भया पथक व पोस्को कायदा जाणीव जागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना व्यसनमुक्ती व अमली पदार्थ दुष्परिणाम रस्ता सुरक्षितता व वाहतुकीचे नियम याबाबत तातडीने तात्काळ बैठक आयोजित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब, दीपक केसरकर शिक्षण मंत्री, विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका गट विकास अधिकारी  विनायक गुळवे, तालुका शिक्षण अधिकारी करडे साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांच्या बैठकीचे आयोजन करण्याची संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी ग्वाही दिली. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा...

नातेपुते पोलीस ठाण्याची अभिनव संकल्पना तब्बल २ लाख ९० हजार किमतीचा मुद्देमाल मोबाईल मूळ मालकास परत

संपादक: अभिमन्यू आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र       माहिती अशी आहे की, नातेपुते पोलीस ठाणे येथे दि.०६/०२/२०२४ रोजी फिर्यादी नामे. सत्यजित मदन कुमार जोशी रा.नातेपुते  यांचे तक्रारून भादवी कलम ३७९ अन्वये अज्ञात व्यक्तीने मोबाईल चोरी केले बाबत गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये आरोपी उमेश पोपट लोंढे रा.बरड, सातारा यास अटक करून त्यांचेकडून जप्त कऱण्यात आला.      तसेच नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील, बाजार परिसर, इतर ठिकाणी मोबाईल गहाळ झाल्याबाबत मोठ्या प्रमाणात नातेपुते पोलीस ठाणे येथे तक्रारी प्राप्त होत होत्या. सदर तक्रारीबाबत मा.विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.सुनिल फुलारी, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री.शिरिश सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज विभाग श्री.नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनखाली नातेपुते पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री.महारुद्र परजणे, ASI गडदे, पोलीस कॉन्स्टेबल, ५३२ रणजीत मदने, शिवानंद सोनवणे, संतोष वारे, गणेश कापसे व सायबर सेलचे सचिन राठोड यांनी तांत्रिक विश्लेषण करून सायबर सेल सोलापूर यां...