लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थचे संस्थापक मा.आ.श्री.सुभाष (बापू) देशमुख, माजी मंत्री, सहकार मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य दि.१३/११/२०२१ रोजी लोकमंगल नागरी सहकारी पतसंथा मर्यादित, सोलापूर शाखा नातेपुते ता.माळशिरस येथे दिवाळीनिमित्त फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे पतसंस्था स्थापन करण्यात आली. अगदी थोड्या दिवसात या पतसंस्थेकडे ठेवी ८० लाख रुपये, कर्ज वाटप ५० लाख रुपये व सेव्हिंग खाते ११०० अशी अल्पावधीत भरारी घेतली आहे. या शाखेने दिवाळीनिमित्त फराळाचे आयोजन केलेले होते. या कार्यक्रमास मा.श्री.डॉ.एम. पी.मोरे साहेब, श्री.सुधीर काळे, श्री. गणेश पागे, संदीप गटकुळ, श्री.औदुंबर कदम, श्री.उमेश पलंगे, श्री.नंदकुमार धालपे, ठेवीदार, कर्जदार, सेव्हिंग खातेधारक, पत्रकार बांधव व असंख्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाखाधिकारी रमेश छपरे, भद्रे शशिकांत, स्वाती कुंकारी, भाग्यश्री काटकर, स्वप्नील धाइंजे या स्टाफ कर्मचार्यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.