संपादक
वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर या गावामधील
जागृत महिलांनी वाखरी ग्रामपंचायतकडे बिअर बार बिअर शॉपी ला परवानगी देवू नये,
दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी देवू नये यासाठी महिलांनी पुढाकार घेतला. तो आदर्शवादी आहे. बिअर बार,
दारू दुकाने यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. वाखरी गाव हे पालखी सोहळ्याचे
शेवटच्या ठिकाणचे गाव आहे. मागील काही दिवसात ग्रामसभा आयोजित केली होती त्यामध्ये
बिअर बार बिअर शॉपी ला परवानगी देता कामा नये, दारू धंदे वाखरी गावात सुरू होऊ देता कामा
नये. यासाठी महिलांनी एकत्रित येवून आवाज उठवून वादग्रस्त ठराव रद्द करण्यास भाग पाडले.
अशा धंद्याना परवानगी दिल्यास अनेकांचे कुटुंब बरबाद,
उध्वस्त होतील. वाईट धंद्याला आळा बसला पाहिजे. ग्रामपंचायतकडे २३ व्यक्तींनी बिअर
बार, बिअर शॉपी ला परवानगी मिळावी यासाठी अर्ज केले होते. महिलांच्या
पुढाकाराने दिलेले अर्ज ठराव न करता रद्द केले गेले. त्यामुळे एक चांगले आदर्शवादी
कामगिरी महिलांनी केली आहे. त्याबद्दल त्या महिलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच या गावात
सदगुरू लक्ष्मणदास महाराज यांची समाधी असून भव्यदिव्य असे मंदिर आहे. त्यामुळे या गावात
असे धंदे होता कामा नये. महिलांच्या एकजुटीच्या निर्णयामुळे वाखरी ग्रामपंचायत सरपंच,
उपसरपंच, ग्रामसेवक यांनी बिअर बार बिअर शॉपी साठी आलेले अर्ज रद्द
केले. हे गावाच्या हिताच्या दृष्टीने महत्वाची कामगिरी म्हणावी लागेल. ग्रामपंचायत
सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांनी चांगल्या कामासाठी पुढाकार तर
वाईट कामासाठी विरोध केला पाहिजे असे वाटते. वाखरी गावातील महिलांनी जे कुटुंब उध्वस्त
होणारे जे धंदे आहेत त्यांना जोर का झटका देण्यासाठी असेच एकत्रित यावे. त्याचप्रमाणे
ग्रामपंचायत शासनाच्या आर्थिक निधीतून ज्या योजना राबवित आहेत. त्यासाठी आलेला निधि व कोणत्या ठिकाणी राबवल्या त्या ठिकाणी भेटी देवून त्या योजना उत्कृष्ट की निकृष्ठ आहेत
यासाठी सतर्क रहावे इतकेच.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.