मा.श्री.अतुल (बापू) राजेंद्र पाटील |
नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर येथील समाजरत्न राजेंद्र (भाऊ) पाटील यांचे सुपुत्र नातेपुते ग्रामपंचायतचे 2 वेळा सदस्य ते उपसरपंच या पदावरती काम केले आहे. उच्चशिक्षित, कुशल बागायतदार, अभ्यासू वृत्ती, नम्रतेने सर्व लहान थोरांना मान, सन्मान देणारे समाजकारण म्हणजे जनतेच्या हिताच्या दृष्टीने, सर्व समाजाचे हित पाहणारे, दिला शब्द पाळणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे सर्वांचे लाडके म्हणजे अतुल (बापू) पाटील होय. जनमानसात मिसळणारे, कधी पद असो वा नसो काम करीत राहणे हे बापूंचे ध्येय असते. तसेच संपत्ती याचा कधीही बापूना कधी गर्व नाही. शांत, संयमी म्हणून ओळख निर्माण केली आहे. जनतेच्या हृदयामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्माण झाली आहे. राजकारण करीत असताना तेवढ्या पुरते राजकारण परंतु ते करीत असताना भेदभाव, द्वेष, मत्सर, वादावादी त्यांच्याकडून कधीही घडली नाही. "मूर्ति लहान पण किर्ती महान" हे सत्य बापूंविषयी खरे ठरले आहे. त्यांच्या विचारात, बोलण्यात गोडवेपणा, आपलेपणा असतो. साधी राहणी, उच्च विचारसरणी, हे गुण आहेत. मनमोकळेपणाने बोलणारे म्हणून बापूंकडे पाहिले जाते. नातेपुते ग्रामपंचायतचे 2 वेळा उपसरपंच म्हणून पदभार संभाळला असताना त्यांनी भरीव अशी कामे केली आहेत. त्यापैकी एक महत्वाचे काम म्हणजे पालखी मैदानाशेजारी केले गेलेले गटार. गटार हा वादावादीचा विषय होता. तेथील ग्रामस्थांचा सांड पाण्याचा प्रश्न गंभीर होता. ते सांड पाणी कोठे सोडायचे हा प्रश्न ग्रामस्थांकडे अडचणीचा होता परंतु बापू उपसरपंच झाले व प्रकाश साळवे सदस्य या दोघांनी ५० वर्ष रखडलेला सांड पाण्याच्या गटारीचा प्रश्न सोडविला. हा प्रश्न सोडविल्यामुळे सर्व ग्रामस्थ बापूसाहेबांवरती खुश आहेत. असे काम करणारे बापूसाहेब जनतेसाठी खरे सेवक बनले आहेत. त्यांच्या दोन वेळा उपसरपंच पदाच्या कारकिर्दीत समाजउपयोगी कामे केली आहेत. सध्या नातेपुते ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले आहे. सोडत झाल्यामुळे वार्ड रचना बदलली गेली आहे. बापू म्हणजे आपला माणूस, कामाचा माणूस, हक्काचा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली आहे. एक नावारूपाला असलेले गुणवंत, नामवंत, कीर्तीवंत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पद स्वीकारत असताना जनतेने निवडून दिले असताना त्याचा उपयोग जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी केला गेला पाहिजे अशी भूमिका त्यांची असते. नातेपुते गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विकास कामे करण्यासाठी ग्रामपंचायतला म्हणावा तसा निधि येत नव्हता. त्यामुळे विकास करता येत नव्हता. जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असले तरी पण बापू यांनी उपसरपंच असताना तुटपुंज्या निधीतून कामे केली व कामे करण्यासाठी सदैव तयार असतात. आता तर नगरपंचायत झाली आहे. विकास कामांना भरपूर निधि उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नातेपुते गावाचा कायापालट होऊन एक विकासाचे मॉडेल होईल असे वाटते. मा.अतुल (बापू) पाटील कर्तव्यनिष्ठा, विकासनिष्ठा समजून काम करणारे धडाडीचे आहेत. त्यामुळे नगरपंचायत झाल्यामुळे वार्ड रचना बदलल्यामुळे आरक्षणाच्या सोडतीप्रमाणे बापू कोणत्या वार्डात उभे राहणार हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. बापू नातेपुते नगरपंचायत मध्ये असावे असे ग्रामस्थांना वाटत आहे इतकेच.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल,
जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.