Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

सांगोला तालुक्यातून दुष्काळाला हद्दपार करून तालुक्याचे नंदनवन करणारे प्रिय झुंजार जेष्ठ नेते मा.गणपतराव (आबा) देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली...!

सांगोला विधानसभा मतदार संघाचे माजी जेष्ठ आमदार मा. गणपतराव (आबा) देशमुख संपादक           सांगोला विधानसभा मतदार संघाचे माजी जेष्ठ आमदार मा. गणपतराव (आबा) देशमुख यांचे निधन झाले. जनतेला अश्रु आणावर झाले. सांगोला तालुका पाण्याविणा निराधार होता , दुष्काळी होता. त्या तालुक्याला पाणीदार तालुका करून त्या तालुक्याचे आबांनी नंदनवन केले. आबा हे ५४ वर्षे आमदार होते. आबांचे राहणीमान साधी व उच्च विचारसरणी होती. लहान थोरांचे आधारस्तंभ , जनतेसाठी झटणारे सर्व समाजप्रिय लोकसेवक असे होते. शेतकरी , कष्टकरी यांना न्याय देण्याचे काम केले. आबा सारखा नेता यापुढे कधीच होऊ शकणार नाही. आबांच्या निधनामुळे सर्व समाजप्रिय जनता पोरकी झाली आहे , त्यांचा आधार गेला आहे. आबांनी कधी गर्व बाळगला नाही. जनतेचा आमदार कसा असावा याचे उदाहरण म्हणजे गणपतराव (आबा) देशमुख होय. त्यांचे आदर्श कामगिरी जनतेसाठी मौल्यवान ठरली आहे. त्यांचा आदर्श सर्वच क्षेत्रातील राजकीय असो वा सामाजिक क्षेत्रातील असो. सर्वांना नवीन दिशा देणारा आहे. सांगोला येथे सूत गिरणी काढून अनेक युवकांना रोजगाराची स...

नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर पालखी तळावर आमदार निधीतून ओपन जीम व्यायाम साहित्याचे उद्घाटन

  आमदार निधीतून व्यायाम साहित्यांचे उद्घाटन करताना उपस्थित  मान्यवर संपादक           नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर येथे आमदार राम सातपुते साहेब यांच्या निधीतून ओपन जीम व्यायाम साहित्य रक्कम पाच लाख रुपये अशी असून या साहित्यामुळे सर्व लहान थोर यांना व्यायाम करता येणार आहे. या व्यायाम साहित्याचे उद्घाटन मा.धैर्यशील(भैय्या) मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते दि.३०/०७/२०२१ रोजी पालखी तळ येथे करण्यात आले. याप्रसंगी आमदार राम सातपुते साहेब , सरपंच कांचनताई लांडगे , उपसरपंच अतुल (बापू) पाटील , माजी सरपंच बी.वाय.राऊत , हनुमंत (भाऊजी) धालपे , रणविर देशमुख (ग्रा.सदस्य) , प्रकाश साळवे  (ग्रा.सदस्य) , शशि कल्याणी , भैय्या चांगण , बाजीराव काटकर , शिकंदर मुलाणी  (ग्रा.सदस्य) , ग्रामपंचायत कर्मचारी अशोक जावरे , सतीश बडवे , राजकुमार बरडकर , पांडुरंग पैठणकर , भीमराव लांडगे , दादासाहेब लांडगे , केरबा लांडगे , बाबा पोळ , इ. ग्रामस्थांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.         बातमी अधिक जाहिरातीसाठी ...

नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर शाखा नातेपुते येथे ४४ व्या शाखेचे उद्घाटन संपन्न

  लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर नातेपुते येथे ४४ व्या शाखेचे उद्घाटनप्रसंगी मान्यवर   संपादक           नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर येथे संस्थापक मा.आ. सुभाष (बापू) देशमुख माजी मंत्री सहकार , मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य यांनी स्थापन केलेल्या लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या ४४ व्या शाखेचे उद्घाटन ३०/०७/२०२१ रोजी संस्थापक मा.आ.सुभाष (बापू) देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळेस माजी जि.प. उपाध्यक्ष बाबाराजे (दादा) देशमुख , माळशिरस पंचायत समितीचे सदस्य ज्ञानराज (माऊली) पाटील , डॉ.एम.पी. मोरे साहेब , भाऊबली चंकेश्वरा साहेब , सागर बोराटे (महाराज) , सहाय्यक निबंधक बी.एस. मिसाळ , पांडुरंग वाघमोडे , गणेश पागे , सुधीर काळे , महेश शेटे , अतुल दोशी , पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सौ.अल्का देवडकर , चेअरमन , व्हा.चेअरमन , संचालक मंडळ , कर्मचारी इ. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.           यावेळी सागर बोराटे (महाराज) यांनी या पतसंस...

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या सदस्यपदी श्री श्रीकांत उत्तम बावीस्कर यांची नियुक्ती

मा. श्री. श्रीकांत उत्तम बावीस्कर यांचा सत्कार करताना बहुजन भूषण वृत्तपत्राचे संपादक अभिमन्यु आठवले  संपादक               महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या सदस्यपदी श्री श्रीकांत उत्तम बावीस्कर नातेपुते येथील असून त्यांची नियुक्ती झाली असून श्रीकांत उत्तम बावीस्कर हे राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त असून गेली २५ वर्षे पत्रकारिता करीत आहेत. सध्या ते दैनिक शिवनिर्णय चे पत्रकार म्हणून काम करीत आहेत तसेच ते लक्षवेध न्यूज चॅनेल चे संपादक आहेत व ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य याचे ते सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची मुलाखत ऑनलाईन पध्दतीने २४/०६/२०२१ रोजी झाली होती व २८/०७/२०२१ रोजी त्यांची नियुक्ती झाली असून त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. श्रीकांत उत्तम बावीस्कर नियुक्ती झाल्यानंतर प्रथम बहुजन भूषण कार्यालय येथे येऊन भेट दिली व त्यांचा आठवले परिवाराच्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.   बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : म...

पुरग्रस्थांसाठी मदत करताना दानशूरपणा दाखवा, आपत्ती काळातील कुटुंबाची गरज भागेल असे जीवनावश्यक उपयोगी वस्तु त्या कुटुंबाला द्या असा हेतु असावा

संपादक             पूरग्रस्थास आपत्ती काळात अथवा कोणत्याही अपत्य काळात ज्या कुटुंबावर संकट येते , कमविलेले गमविले जाते , क्षणात होत्याचे नव्हत होत. कुटुंबातील व्यक्ति आपत्तीमुळे जगाचा निरोप घेते त्यामुळे कुटुंबांना अनंत वेदना होतात त्या वेदनेची तुलनाच होऊ शकत नाही. दु:ख , वेदना सहन करणे अवघड होते. सध्या कोरोनाचा , राज्यकर्त्याचा , निसर्गाचा जनतेवर कोप चालू आहे. जनतेला जगणे अवघड झाले आहे. “हरामखोर” राज्यकर्ते मजेत आहेत , जनतेचे मात्र राज्यकर्त्यांनी हाल , छळ , सुरू केला आहे. त्यामध्ये निसर्ग सुद्धा जनतेला सोडत नाही. आधीच रोगाचे संकट आणि त्यामध्ये पुन्हा पुराचे संकट यामुळे गावे , कुटुंब उध्वस्त झाली आहेत. दिसेनासे झाली आहेत. आपत्तीत माणूस डोळ्या देखत माणस गाडली गेली आहेत असे असताना समाजसेवी संस्था यांनी पुढाकार घेवून आपत्ती कोसळलेल्या कुटुंबांना मदत करावी व जे मदत   देतात त्यांनी दानशूर दाखवत असताना नियत स्वच्छ ठेवावी. जुने कपडे , वापरात न येणारी भांडी कुंडी , कुजलेले कडधान्य व साहित्य असे दानशूर व्यक्तीने देवू नये. ...

वाखरी ता.पंढरपूर पालखी तळावर आषाढी वारीनिमित्त दहा मानाच्या पालखी सोहळ्यासाठी जय्यत तयारी

  संपादक           वाखरी ता.पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त पालखी तळावर दहा मानाच्या पालख्या १९/०७/२०२१ रोजी ०३ वा.पर्यंत पालखी तळावर पोहचून त्या ठिकाणी रीतीरिवाजाप्रमाणे पुजा आरच्या भजन , प्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होऊन वाखरी पालखी तळावरून पंढरपूरकडे दहा मानाच्या महाराजांच्या पादुका घेऊन भजन , कीर्तन करीत पायी जाणार आहेत यासाठी वाखरी पालखी तळावर असलेल्या ३० एकरास तारेचे कुंपण घातले असून पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे दहा मानाच्या पालख्यांच्यासाठी येणारे वारकरी भक्त आहेत त्या प्रत्येक पालखीसाठी पत्राशेड उभारले आहेत जेणेकरून प्रचंड पाऊस होत असल्यास त्यामध्ये त्या १० मानाच्या पालखी सोबत जे वारकरी व संस्थांचे पदाधिकारी यांना त्या पत्राशेड मध्ये थांबता येईल. तसेच पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने पालखी तळावर स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच वीज , पाणी , औषध फवारणी , रंगरंगोटी केले असल्याचे समजते. ज्या दहा मानाच्या पालख्या वाखरी पालखी तळावर येत असल्यामुळे त्याचे स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष उभारला आहे. तसेच पालखी तळाला संपूर्ण तारेचे कंपाऊंड केले...

एक आजी सरपंच, माजी आमदार, तीन माजी सरपंच व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत नातेपुते पालखी तळावरील ज्ञानेश्वर महाराज विसावा याठिकाणी माऊलीच्या पादुकाची पुजा संपन्न

संपादक               आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुते ता.माळशिरस येथे पायी वारी असती तर नातेपुते येथे १४ तारखेस मुक्कामी असते. त्यामुळे नातेपुते पालखी तळावरील विसावा येथे प्रतिकात्मक माउलीच्या पादुकाची आरती करून आनंद घेतला गेला. नातेपुते येथे पहिला मुक्काम १४ तारखेस झाला असता. या निमित्ताने नातेपुते येथील समाजभूषण नानासाहेब देशमुख दिंडीचे प्रमुख मनोहर भगत महाराज यांनी विसाव्याच्या जागी स्वच्छता करून त्या कट्ट्याला फुलांची सजावट करून रंग देवून रांगोळी काढून ज्ञानेश्वर माऊलीच्या सामाधीच्या प्रतिमीचे व ग्रंथाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भजनी मंडळ , लक्ष्मी भजनी मंडळ यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात भजन केले गेले. हा कार्यक्रम साय. ०६ वा. नातेपुते पालखी तळावर होऊन या निमित्त माजी आमदार रामहारी रूपनवर , सरपंच कांचनताई लांडगे , मनोहर भगत , कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे , माजी सरपंच अमरसिंह देशमुख , रावसाहेब पांढरे , व माजी सरपंच यांच्या हस्ते आरती करण्यात आली....

समान नागरी कायदा सर्व जातीधर्मासाठी धोक्याचा असू शकतो

संपादक समान नागरी कायदा हा सर्व जाती धर्मासाठी व त्यांच्या रूढी परंपरेसाठी धोकादायक असून सर्व जाती धर्मावर अन्यायकारक ठरू शकतो. प्रत्येक जाती धर्मामधील असलेले सण , उत्सव , सांस्कृतिक , सामाजिक कार्यक्रम हे त्या जाती धर्माच्या नुसार होत असतात. समान नागरी कायदा हा राज्य सरकार व केंद्र सरकारच्या अधिकारात करता येतो परंतु तो करताना असंख्य अडीअडचणी निर्माण होऊ शकतात. प्रत्येक जात धर्म यांना हा कायदा करावा असे वाटत नाही. प्रत्येक जाती धर्मांना त्यांच्या चालत आलेल्या रूढी परंपरेने वागावे लागते. प्रत्येक जाती धर्मात वेग वेगळे विवाह सोहळे , त्या रूढी परंपरेने पाढीत असतात. समान नागरी कायदा जर केंद्र सरकारने व राज्य सरकारने हुकुमशाही या पद्धतीने वापर करून तो जातीपाती धर्मावर लादला तर राज्य सरकार व केंद्र सरकारला व त्यांच्या पक्षाला मोठा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही तसेच केंद्र सरकार मधील व राज्य सरकार मधील जे कारभारी आहेत त्यांना जाती धर्माच्या व्यक्तींना तो सहन होणार नाही. समान नागरी कायदा भाजप आणू पाहत असले तरी त्यांना जाती धर्माकडून प्रचंड विरोध झाल्याशिवाय राहणार नाही. समान नागरी कायद्य...

“सरकारी कामात अडथळा” या कायद्याचा अधिकारी, कर्मचारी यांना आधार तर “दफ्तर दिरंगाई” या कायद्यानुसार अधिकारी, कर्मचारी यांना वटणीवर आणण्यासाठी या कायद्याचा अर्जदाराला आधार

संपादक           शासकीय जे   अधिकारी , कर्मचारी विविध विभागाचे आहेत ते “सरकारी कामात अडथळा” या कायद्याचा आधार घेऊन अर्जदारावर अन्याय करतात. अर्जदाराने दिलेल्या अर्जानुसार काय कारवाई झाली हे अधिकारी यांना जाब विचारण्यासाठी गेले असता अधिकारी , कर्मचारी अर्जदाराला वेठीस धरतात , दम देतात हेच चाललेले असते. या कायद्याचा अधिकारी , कर्मचारी आधार घेवून “बळाचा” वापर करतात. या कायद्याचा आधार हे अधिकारी व कर्मचारी यांचे “हत्यार” झाले आहे त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांना “गुर्मी , माज ” चढला आहे. शासकीय नोकरी म्हणजे हे अधिकारी कर्मचारी मनमानी करण्यासाठी आहेत असे अधिकारी कर्मचारी यांचे मत झाले आहे. अर्जदार वेळ , पैसा , मानसिक त्रास सहन करून न्याय मिळेल ही “भोळी” अशा बाळगून आपले अर्जदार लेखी म्हणणे अधिकारी यांचाकडे देतात परंतु हेच “हरामखोर” अधिकारी अर्जदाराला वेठीस धरतात. सरकारी कामात अडथळा केला म्हणून गुन्हे दाखल करू , तुरुंगात पाठवू अशा पद्धतीने धमक्या देतात , दम देतात त्यामुळे अर्जदार मनामध्ये भीती बाळगून राहत आहेत. अधिकारी आणि कर्मचारी य...