Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

आषाढी वारीनिमित्त वाखरी येथे आरोग्य विभागाची जय्यत तयारी

आरोग्यदूत सेवा देण्यास तयार  संपादक बहुजन भूषण वृत्तपत्र श्री.धनाजी मस्के आरोग्य सेवक यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार  दि. २७/०६/२०२३ मंगळवार रोजी वाखरी ता.पंढरपुर जि.सोलापूर येथे संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज व इतर पालख्यांचा मेळावा होत असतो. या ठिकाणी आरोग्य विभाग पंचायत समिती पंढरपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र गादेगाव अंतर्गत वैदयकिय अधिकारी डॉ.अनिसा तांबोळी, डॉ.अभिजीत रेफाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वारकर्‍यांना आरोग्य सेवा देण्यासाठी तत्पर झाली आहे. यामध्ये वारकरी पालखी तळ व बाजीराव विहिर रिंगण तळ याठिकाणी आरोग्य उपचार केंद्र उभारले आहे. या ठिकाणी सर्व वारकरी यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. तसेच या ठिकाणी हिरकणी कक्ष, उष्माघात कक्ष, महिला सल्ला व समोपदेशन कक्ष उभारला आहे. तसेच वाखरी परिसरामधील ९० पाणी स्तोत्राचे पाणी नमुने तपासून शुद्धीकरण करून घेतले आहे, किटकजन्य आजारा संदर्भात कंटेनर सर्व्हे व धुर फवारणी करून घेतली आहे. माने विहिर व लवटे विहिर या ठिकाणी टँकर भरण्याची तयार पुर्ण केली आहे. या ठिकाणी १५ आरोग्य कर्मचारी शुद्धीकरणासाठी नेमले आहेत. गावाती...

नातेपुते येथे नवीन फॅशन प्लस चा वितरण शुभारंभ

उपसंपादक - साप्ताहिक बहुजन भूषण      नातेपुते येथील डायमंड ऑटो शोरूम मध्ये नवीन फॅशन प्लस या गाडीच्या वितरणाचा शुभारंभ नातेपुते येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ देशमुख डायमंड ऑटो शोरूम चे मालक दस्तगीर मुल्लानी,ऑल इंडिया फ्रेंड सर्कलचे महाराष्ट्र प्रदेशचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिमन्यू आठवले व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्रीकांत बाविस्कर  यांच्या हस्ते करण्यात आला.      यावेळी डायमंड ऑटोचे मालक दस्तगीर मुलांनी यांनी नवीन फॅशन प्लस ही मोटर सायकल हंड्रेड सीसी असून सर्वच बाबतीत दणकट व मोबाईल चार्जिंग पॅशन प्लस वैशिष्ट्य म्हणजे, डीजी अनलॉग मिटर, मोबाईल चार्जिंग पॉकेट, स्टायलिश फॉरेवर, अशी आहेत असे असल्याचे त्यांनी सांगितले.      यावेळी अली आणि नुह दस्तगीर मुल्लानी यांनी केक कापून शुभारंभ केला. यावेळी ग्राहक व शोरूम मधील सर्व स्टाफ हजर होता. बातमी  अधिक जाहिरातीसाठी संपर्क  संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले  ९४२०३०२५६१  उपसंपादक : वैभव अ. आठवले  साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक : बहुजन...

"जातिवाद" हा माणुसकिला काळिमा

उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र सध्या जातिवाद मोठ्या प्रमाणात असून हा माणुसकीला काळिमा आहे. जातिवादी स्वत:ला उच्च दर्जाचे समजत आहेत. जातिवाद्यांना दलित समाजावर अन्याय करणे म्हणजे एक "फॅशनच" झाली आहे. दलित बांधवांची एकी नाही ही "नाडी" जातिवादी यांनी ओळखली आहे. तसेच दलित समाजातील ज्या ५९ जाती ह्या अनुसूचीत जातीमध्ये मोडतात त्या प्रत्येक जातीकडे "मी पणा, गर्व" आहे. तसेच या जाती सवलती घेण्यासाठी पुढे आणि रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी मागे अशी परिस्थिती आहे. दलित व्यक्तींवर अन्याय झाल्यास त्वरित रस्त्यावर उतरणारा समाज म्हणजे "बौद्ध समाज" होय. सध्या जातिवाद ग्रामीण भागात प्रचंड दिसून येत आहे. दलित समाजाचा त्यांना "विटाळ, अॅलर्जी" आहे. त्यामध्येही अनुसूचीत जातीमधील ५९ जातीचे पुढारी दलाली करताना दिसत आहेत ही गंभीर व चिंताजनक बाब आहे. दलित सामाजावर दररोज जातिवादी समाजकंटक अन्याय-अत्याचार करीत आहेत. त्यामध्ये अयोग्य पाणी पिण्यास भाग पाडणे, जखमी करणे, अपमान व बदनामी करणे, अमानुष कृत्य करणे, दलित सामाजाच्या बेकायदेशीर जमिनी बळकावणे, दमदाटी करणे, ...

मा.श्री.रघुनाथ (अण्णा) आत्माराम कवितके यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभ

उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र अहिल्यादेवी पतसंस्थेचे व अक्षय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.रघुनाथ (अण्णा) आत्माराम कवितके यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभ रविवार दि.०४/०६/२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. कवितके सांस्कृतिक भवन नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे आयोजित केला आहे. यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.उत्तमराव जानकर साहेब, संचालक कृषि उत्पन्न बाजार समिति, अकलुज व समारंभाचे अध्यक्ष मा.श्री. शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, माजी.उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर यांच्या उपस्थितीत समस्त ग्रामस्थ व सत्कार समिति नातेपूते यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने रविवार दि.०४/०६/२०२३ रोजी सकाळी ०८.०० वा. वृक्षारोपण चंद्रकांत घुगरदरे प्रशाला नातेपुते तसेच सकाळी ०९.०० वा. ग्रामीण रुग्णालय नातेपुते येथे रुग्णांना फळे वाटप हे कार्यक्रम होणार आहेत.  तसेच सकाळी १०.०० वा. सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, जेष्ठ नागरिकांचा सन्मान, बचत गटातील महिलांचा सन्मान, गणेश उत्सव मंडळांचा सन्मान, उद्योजकांचा सन्मान, स्पर...

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनात जनतेने दिलेल्या अर्जाची अधिकारी दखल घेत नसतील तर लोकशाही दिन का आणि कशासाठी? मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले

संपादक सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लोकशाही दिन आहे. या दिवशी जे अर्जदार आपले लेखी म्हणणे देत असतात त्याचे निवारण व्हावे , न्याय मिळवा या आशेने जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनात अर्जदार वेळ , पैसा , मानसिक त्रास सहन करून न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवून अर्जदार सोलापूर येथे जात असतात. लोकशाही दिनादिवशी सर्व विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांनी हजर राहिले पाहिजे. अर्जदारांनी दिलेल्या अर्जावर त्वरित दखल घेवून त्याचे निवारण करून न्याय देणे हे लोकशाही दिनाचे पहिले कर्तव्य आहे. परंतु लोकशाही दिन हा फक्त कागदी घोडे नाचविण्यासाठी आहे असे दिसत आहे. अर्जदाराच्या अर्जाला अधिकारी यांच्याकडून दिशाभूल , टाळाटाळ , दफ्तर दिरंगाई केराची टोपली दाखविली जाते. पोहोच घ्या आणि घरी जावा हेच जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथील लोकशाही दिनादिवशी दिसून येत आहे. “ ना न्याय ना निवारण” होताना दिसत नाही. जनतेच्या अडीअडचणीचे निवारण होत नसेल , अधिकारी दखल घेत नसतील तर लोकशाही दिन का आणि कशासाठी ? असे बहुजन राष्ट्रशकती सामाजिक संघटनेचे संस्थापक पत्रकार मा.अभिमन्यु बी.आठ...

प्रत्येक कार्यालयात अधिकारी यांनी 'सरकारी कामात अडथळा' या कायद्यानुसार आरोप, दंड, शिक्षा याबाबत बोर्ड लावून जनतेला भीती दाखवण्याचे काम, त्या बोर्डाबरोबर अधिकारी यांनी आमची कर्तव्य यासाठी 'दफ्तर दिरंगाई कायदा २००६' या कायद्याचा बोर्ड सोबत लावावा

संपादक बहुजन भूषण वृत्तपत्र   असंख्य कार्यालयात अधिकारी सरकारी कामात अडथळा या कायद्याचा बोर्ड लावून जनतेला भीती दाखवत आहेत. तो कायदा सरकारी कर्मचारी यांना वरदान ठरत आहे, त्या कायद्याचे बोर्ड, त्यामधील आरोप, दंड, शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे त्याचा आधार अधिकारी, कर्मचारी घेत आहेत. अधिकार्‍यांनो तुम्ही तुमच्या कार्यालयात सरकारी कामात अडथळा याचा आधार घेता. तसेच अधिकारी कर्मचारी यांनी दफ्तर दिरंगाई कायदा २००६ काय सांगतो त्याचा बोर्ड लावावा म्हणजे समजेल की, दफ्तर दिरंगाई कायदा २००६ सरकारी कामात अडथळा कायद्याला भारी पडत आहे.       कोणत्याही कार्यालयात असलेला सरकारी कामात अडथळा या बोर्डासोबत दफ्तर दिरंगाई कायदा २००६ चा असा बोर्ड लावावा. कोणत्याही सरकारी कामात अडथळा याच फक्त कायद्याचा बोर्ड असेल तर त्या अधिकार्‍याची गय करणार नाही. अधिकार्‍यांनो जनतेचे तुम्ही नोकर आहेत, नोकर म्हणूनच नोकरी करावी, जनतेला मानसिक त्रास होईल असे वागू नका, दिलेल्या अर्जाचे निवारण करा, अडचण असल्यास मार्गदर्शन करा, टाळाटाळ करू नये, जातिभेद करू नये, कर्तव्यात कसूर करू नये, विलंब करू नये, खोट...

सह्याद्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा दिमाखदार उदघाटन सोहळा

उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र      नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार आर. जी. रूपनवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.रणजितसिंह मोहीते-पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आमदार रणजितसिंह मोहीते-पाटील यांच्या सहमतीने लोगो(अॕप)सोहळा संपन्न झाला. मोबाईल(अॕप) माजी आमदार आर.जी. रुपनवर यांच्या हस्ते व QR कोड सोहळा बाबाराजे देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रस्ताविकामध्ये संस्थेचे चेअरमन ॲड रणवीर देशमुख म्हणाले की, "नातेपुते गावामध्ये सध्या नऊ ते दहा पतसंस्था आहेत. आम्ही सर्व तरुण मंडळीनी सह्याद्री पतसंस्था स्थापन केली. आदरणीय समाजभुषण कै.नानासाहेब देशमुख यांनी रेणुका बँक, डाॕ.बा.ज. दाते प्रशाला यासारख्या संस्था स्थापन केल्या व त्या पारदर्शकपणे चालवल्या हाच वारसा पुढे घेऊन त्याच वाटेन आम्ही वाटचाल करु या संस्थेमध्ये मोबाईल अॕप्लीकेशन आहे, QR कोड आहे. घरबसल्या सर्व  व्यवहार करता...