संपादक
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात
जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लोकशाही दिन आहे. या दिवशी जे अर्जदार आपले लेखी म्हणणे
देत असतात त्याचे निवारण व्हावे, न्याय मिळवा या आशेने जिल्हाधिकारी
कार्यालयात लोकशाही दिनात अर्जदार वेळ, पैसा, मानसिक त्रास सहन करून न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवून अर्जदार सोलापूर येथे
जात असतात. लोकशाही दिनादिवशी सर्व विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांनी हजर राहिले
पाहिजे. अर्जदारांनी दिलेल्या अर्जावर त्वरित दखल घेवून त्याचे निवारण करून न्याय देणे
हे लोकशाही दिनाचे पहिले कर्तव्य आहे. परंतु लोकशाही दिन हा फक्त कागदी घोडे नाचविण्यासाठी
आहे असे दिसत आहे. अर्जदाराच्या अर्जाला अधिकारी यांच्याकडून दिशाभूल, टाळाटाळ, दफ्तर दिरंगाई केराची टोपली दाखविली जाते.
पोहोच घ्या आणि घरी जावा हेच जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथील लोकशाही दिनादिवशी
दिसून येत आहे. “ना न्याय ना निवारण” होताना दिसत नाही. जनतेच्या
अडीअडचणीचे निवारण होत नसेल, अधिकारी दखल घेत नसतील तर लोकशाही
दिन का आणि कशासाठी? असे बहुजन राष्ट्रशकती सामाजिक संघटनेचे
संस्थापक पत्रकार मा.अभिमन्यु बी.आठवले यांनी जाहीरपणे जनहितार्थ म्हणून आपली जनतेच्या
हितासाठी आपली रोखठोक भूमिका मांडली.
लोकशाही दिन जनतेसाठी “गाजरदिन” की “शापदिन”, की “वरदान दिन” हेच समजत नाही. लोकशाही दिन म्हणजे निवारण करून अधिकारी यांनी
न्याय देणे किंवा अडचण असेल तर मार्गदर्शन करणे असे असायला हवे. लोकशाही दिनातील अर्जावरून
नुसते कागदी घोडे नाचवून अधिकारी जनतेची अशीही बनवाबनवी करीत आहेत. लोकशाही दिनादिवशी
वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थित राहिले पाहिजे परंतु कोणतेही अधिकारी उपस्थित राहत नाहीत
ही गंभीर बाब आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयात लोकशाही दिन होताना दिसत
नाही. यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून तालुका पातळीवरील लोकशाही दिन
व्हावा यासाठी आदेश काढावा. लोकशाही दिन जनतेसाठी न्याय दिन ठरला पाहिजे.
लोकशाही दिनातील
अर्जातील अधिकारी यांनी तात्काळ दखल घेतली पाहिजे, विलंब लावता
कामा नये. जनतेच्या अडीअडचणीचे निवारण झाले पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयातून लोकशाही
दिन व जनतेने दिलेले अर्ज व त्याचे निवारण होत नसेल तर लोकशाही दिन हवा कशाला? तरी लोकशाही दिनात आलेल्या अर्जानुसार त्याची दखल घेवून निवारण करून न्याय
द्यावा हीच अपेक्षा. जनतेचा अर्ज हा एक फिर्यादच असते त्यानुसार कायदेशीर मार्गाने
व संविधानाला अनुसरूनच न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.