असंख्य कार्यालयात अधिकारी सरकारी कामात अडथळा या कायद्याचा बोर्ड लावून जनतेला भीती दाखवत आहेत. तो कायदा सरकारी कर्मचारी यांना वरदान ठरत आहे, त्या कायद्याचे बोर्ड, त्यामधील आरोप, दंड, शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे त्याचा आधार अधिकारी, कर्मचारी घेत आहेत. अधिकार्यांनो तुम्ही तुमच्या कार्यालयात सरकारी कामात अडथळा याचा आधार घेता. तसेच अधिकारी कर्मचारी यांनी दफ्तर दिरंगाई कायदा २००६ काय सांगतो त्याचा बोर्ड लावावा म्हणजे समजेल की, दफ्तर दिरंगाई कायदा २००६ सरकारी कामात अडथळा कायद्याला भारी पडत आहे.
कोणत्याही कार्यालयात असलेला सरकारी कामात अडथळा या बोर्डासोबत दफ्तर दिरंगाई कायदा २००६ चा असा बोर्ड लावावा. कोणत्याही सरकारी कामात अडथळा याच फक्त कायद्याचा बोर्ड असेल तर त्या अधिकार्याची गय करणार नाही. अधिकार्यांनो जनतेचे तुम्ही नोकर आहेत, नोकर म्हणूनच नोकरी करावी, जनतेला मानसिक त्रास होईल असे वागू नका, दिलेल्या अर्जाचे निवारण करा, अडचण असल्यास मार्गदर्शन करा, टाळाटाळ करू नये, जातिभेद करू नये, कर्तव्यात कसूर करू नये, विलंब करू नये, खोटा व चुकीचा अधिकारी यांना दिशाभूल करणारे ठराव करू नये, प्रामाणिकपणे नोकरी करीत असताना कर्तव्य जपा. अधिकार्यांनो, कर्मचार्यांनो तुम्ही कामचुकारपणा करता, दिलेल्या अर्जाचे काय दखल घेतली असे अर्जदाराने विचारल्यास अर्जदाराने सरकारी कामात कुठे अडथळा केला? मी असंख्य अधिकारी प्रामाणिक आहेत हे पाहिले आहेत व बोटावर मोजणारे अधिकारी, कर्मचारी आळशी व कामचुकार आहेत त्यामुळे चांगल्या अधिकार्यांनासुद्धा बदनामीला सामोरे जावे लागते ही गंभीर चिंताजनक बाब आहे.
सरकारी कामात अडथळा या कायद्याचा आधार घेवून जनतेला मानसिक त्रास वेठीस धरत असाल तर दफ्तर दिरंगाई कायदा २००६ नुसार तुम्हालाही या कायद्याने दंड, शिक्षा, शास्ती व निराधार करण्याचा या कायद्यात सुद्धा तरतूद आहे हे लक्षात घ्यावे. अधिकारी कर्मचारी यांनी आपली जनतेबाबत असलेली मानसिकता स्वच्छ ठेवावी. कामचुकारपणा करीत असल्यामुळे जनतेने जाब विचारू नये यासाठी जनतेला भीती दाखवण्यासाठी सरकारी कामात अडथळा बोर्ड लावून पळवाट करण्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात परंतु सध्याच्या काळात जनतेला होणारा मानसिक त्रास, छळ, पैसा वाया घालवून जनता आपला प्रश्न सुटतील म्हणून अधिकारी कर्मचारी यांच्याकडे येत असतात त्याचाही अधिकारी, कर्मचारी यांनी विचार करावा. अधिकारी आणि जनता हे समीकरण बंधुभावाचे समजून वागावे. अधिकारी कर्मचार्यांनो तुमच्या कामावर तुमची लायकी जनता ठरवते हे लक्षात घ्यावे. आपण स्वत:कडे बघावे. कामचुकारपणा आपण करीत आहोत का? प्रामाणिकपणे सेवा बजावत असाल तर सरकारी कामात अडथळा या कायद्याचा बोर्ड कार्यालयात कशासाठी? जरूर कायदा वापरा परंतु त्याचा दुरुपयोग करू नका, दहशत पसरवू नका, दमात घेवू नका, जनतेला भीती दाखवू नका. कर्तव्य जपा अशी मानसिकता चांगली ठेवा. जनतेच्या अडीअडचणी सोडवा, अडचणी असतील तर मार्गदर्शन करा असे कराल तर तुमच्या विषयी चांगला अधिकारी कर्मचारी म्हणून नाव निघेल. मूठभर, हरामखोर, भडवे, कामचुकार अधिकारी यांच्यामुळे चांगले कर्मचारी, अधिकारी यांना अपमानित व्हावे लागते. यामुळे कोणत्याही कार्यालयात सरकारी कामात अडथळा या कायद्याच्या बोर्डा बरोबर दफ्तर दिरंगाई कायदा २००६ या कायद्याचा बोर्ड लावलाच पाहिजे. फक्त सरकारी कामात अडथळा हा बोर्ड असेल तर अधिकारी यांना दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार त्याचा हिशोब चुकता करणार असे ऑल जर्नालिस्ट अॅड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिमन्यु बी. आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.