Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

नातेपुते नगरीचे मा.अतुल (बापू) राजेंद्र पाटील म्हणजे जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केलेले एक आदर्श व्यक्तिमत्व होय

मा.श्री.अतुल (बापू) राजेंद्र पाटील  संपादक           नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर येथील समाजरत्न राजेंद्र (भाऊ) पाटील यांचे सुपुत्र नातेपुते ग्रामपंचायतचे 2 वेळा सदस्य ते उपसरपंच या पदावरती काम केले आहे. उच्चशिक्षित , कुशल बागायतदार , अभ्यासू वृत्ती , नम्रतेने सर्व लहान थोरांना मान , सन्मान देणारे समाजकारण म्हणजे जनतेच्या हिताच्या दृष्टीने , सर्व समाजाचे हित पाहणारे , दिला शब्द पाळणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे सर्वांचे लाडके म्हणजे अतुल (बापू) पाटील होय. जनमानसात मिसळणारे , कधी पद असो वा नसो काम करीत राहणे हे बापूंचे ध्येय असते. तसेच संपत्ती याचा कधीही बापूना कधी गर्व नाही. शांत , संयमी म्हणून ओळख निर्माण केली आहे. जनतेच्या हृदयामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्माण झाली आहे. राजकारण करीत असताना तेवढ्या पुरते राजकारण परंतु ते करीत असताना भेदभाव , द्वेष , मत्सर , वादावादी त्यांच्याकडून कधीही घडली नाही.  " मूर्ति लहान पण किर्ती महान" हे सत्य बापूंविषयी खरे ठरले आहे. त्यांच्या विचारात , बोलण्यात गोडवेपणा ,...

वाखरी ता.पंढरपूर येथील महिलांनी बिअर बार, बिअर शॉपी, दारूचे दुकाने सुरू होऊ नये, परवानगी देवू नये यासाठी आवाज उठविला तो आदर्शवादी

संपादक           वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर या गावामधील जागृत महिलांनी वाखरी ग्रामपंचायतकडे बिअर बार बिअर शॉपी ला परवानगी देवू नये , दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी देवू नये यासाठी महिलांनी पुढाकार घेतला.   तो आदर्शवादी आहे. बिअर बार , दारू दुकाने यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. वाखरी गाव हे पालखी सोहळ्याचे शेवटच्या ठिकाणचे गाव आहे. मागील काही दिवसात ग्रामसभा आयोजित केली होती त्यामध्ये बिअर बार बिअर शॉपी ला परवानगी देता कामा नये , दारू धंदे वाखरी गावात सुरू होऊ देता कामा नये. यासाठी महिलांनी एकत्रित येवून आवाज उठवून वादग्रस्त ठराव रद्द करण्यास भाग पाडले. अशा धंद्याना परवानगी दिल्यास अनेकांचे कुटुंब बरबाद , उध्वस्त होतील. वाईट धंद्याला आळा बसला पाहिजे. ग्रामपंचायतकडे २३ व्यक्तींनी बिअर बार , बिअर शॉपी ला परवानगी मिळावी यासाठी अर्ज केले होते. महिलांच्या पुढाकाराने दिलेले अर्ज ठराव न करता रद्द केले गेले. त्यामुळे एक चांगले आदर्शवादी कामगिरी महिलांनी केली आहे. त्याबद्दल त्या महिलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच या गावात सदगुरू ल...

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर, शाखा नातेपुते तर्फे दिवाळीनिमित्त फराळाचा कार्यक्रम संपन्न

संपादक           लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थचे संस्थापक मा.आ.श्री.सुभाष (बापू) देशमुख , माजी मंत्री , सहकार मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य   दि.१३/११/२०२१ रोजी लोकमंगल नागरी सहकारी पतसंथा मर्यादित , सोलापूर शाखा नातेपुते ता.माळशिरस येथे दिवाळीनिमित्त फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर येथे पतसंस्था स्थापन करण्यात आली. अगदी थोड्या दिवसात या पतसंस्थेकडे ठेवी ८० लाख रुपये , कर्ज वाटप ५० लाख रुपये व सेव्हिंग खाते ११०० अशी अल्पावधीत भरारी घेतली आहे. या शाखेने दिवाळीनिमित्त फराळाचे आयोजन केलेले होते. या कार्यक्रमास मा.श्री.डॉ.एम. पी.मोरे साहेब , श्री.सुधीर काळे , श्री. गणेश पागे , संदीप गटकुळ , श्री.औदुंबर कदम , श्री.उमेश पलंगे , श्री.नंदकुमार धालपे , ठेवीदार , कर्जदार , सेव्हिंग खातेधारक , पत्रकार बांधव व असंख्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाखाधिकारी रमेश छपरे , भद्रे शशिकांत , स्वाती कुंकारी , भाग्यश्री काटकर , स्वप्नील धाइंजे या स्टाफ कर्मचार्‍यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठ...

सोलापूर जिल्हाध्यक्ष काँग्रेस (आय) मा.श्री.डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील काँग्रेस पक्षाला जिवदान देणारे नेते ठरतील, जनतेच्या आशा पल्लवित, असंख्य युवक वर्ग काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक

  मा.श्री.डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील सोलापूर जिल्हाध्यक्ष काँग्रेस (आय) मा.श्री. अॅड. रामहरी रूपनवर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय)  संपादक           सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस (आय) पक्ष कमकुवत झाला होता. सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार झाला असे सर्व जनतेलाच वाटत होते. त्यामुळे या काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी कार्यकर्ते यांची मानसिकता नव्हती. काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी मा.श्री.डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांची निवड वरिष्ठ नेत्यांनी केली आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. काँग्रेस   पक्ष रसातळाला गेला होता. या पक्षाचे नाव घेण्या इतपत जनतेची मानसिकता नव्हती. या पक्षाचे या अगोदर पदाधिकारी झाले पण त्याचा उपयोग फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केला आणि कार्यकर्त्यांना वार्‍यावरती सोडले. काँग्रेस   पक्ष नावाला उरला आहे असे चित्र दिसत होते. असे असताना मा.श्री.डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे काँग्रेस (आय) पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे आली आणि वातावरण बदलून गेले. जिल्हास्तरीय , तालुकास्...

सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांची एक नंबर अशी ओळख

  मा.श्री.मिलिंद शंभरकर साहेब  (जिल्हाधिकारी सोलापूर)  संपादक           सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनी यांनी या कोरोना कोव्हिड-१९ या आपत्ती काळात जनतेच्या हिताच्या दृष्ठीने जेवढे शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी सतत लक्ष दिले. हळूहळू कोरोना या रोगाची आपत्ती कमी होत आहे. शेतकर्‍यासाठी पीक कर्ज याबाबत चांगला निर्णय घेवून त्यांची प्रगती व्हावी. त्यांना आपत्ती काळात आधार मिळावा यासाठी कर्तव्य बजावले. कोरोना या रोगाचे संकट जनतेसाठी भयानक होते असे असताना पोलिस खाते , प्रांत , तहसिलदार , गटविकास अधिकारी , सर्व विभागातील शासकीय कर्मचारी तसेच सहकार्य करणारे स्वयंसेवक व अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत ते म्हणजे डॉक्टर व कर्मचारी व सर्व आरोग्य विभाग. आपत्ती काळात जागृत राहून आपली कामगिरी पार पाडत आहेत. जिल्हाअधिकारी सोलापूर यांचे नाव मिलिंद शंभरकर जरी असले तरी ते एक नंबर जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील जनता त्यांची ओळख पुसणार नाही. असे जिल्हाधिकारी पदाला शोभिल अशी कामगिरी करून एक ठसा उमटिवला आहे. काही निर्णय ...

नातेपुते येथे दिनांक ०७/१०/२०२१ रोजी ग्राम सुरक्षा यंत्रणा या उपक्रमाचे शिबीर संपन्न झाले हे शिबीर जनतेचे हित पाहणारे, जागरूकता निर्माण करणारे, येणार्‍या संकटासाठी आदर्श कामगिरी ठरेल

संपादक           नातेपुते येथे ०७/१०/२०२१ रोजी मधुर मिलन , नातेपुते या मंगल कार्यालयामध्ये ग्रामसुरक्षा या चांगल्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम सोलापूर ग्रामीण पोलिस दल व जिल्हा परिषद सोलापूर संयुक्त उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम जिल्हा पोलिस अधिक्षक सौ.तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून राबविला जात आहे. या शिबिराच्या वेळी अकलुज विभागाचे पोलिस अधिकारी मा.श्री.शिवपूज तसेच नातेपुते पोलिस स्टेशनचे एपीआय मनोज सोलनकर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन , दरोडा , बिबट्याचा हल्ला , सर्पदंश , पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला , आग जळीताची घटना , अपघात , याबाबत डी . के.बोर्डे संचालक नागरी सुरक्षा पुणे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा जनतेसाठी कशी फायद्याची आहे ते समजावून सांगितले व त्यावेळी प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रत्येकाच्या जीवनात वेळ आणि काळ ठरलेला आहे. कोणते संकट कधी येईल हे सांगता येत नाही. संकटाच्या वेळी मदतीला कोण येईल तर ते म्हणजे ग्रामसुरक्षा यंत्रणेतील पोलिस अधिकारी व कर्मचारी व जनता. कोणत्याही व्यक्तीवरती संकट आले तर क्षणात ...

सोलापूर जिल्हा स्तरीय जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिन म्हणजे “ना न्याय ना निवारण” ही चिंताजनक व चीड आणणारी भयानक परिस्थिती

संपादक      सोलापूर जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन हा चांगला उपक्रम राबविला जात आहे. जनता वेळ , पैसा , मानसिक त्रास सहन करून लोकशाही दिनात आपल्या असलेल्या अडचणी त्या संदर्भात लेखी , अर्ज , निवेदने देवून अर्जदार पोच घेवून घरी परततात. परंतु दिलेल्या अर्जदाराच्या अर्जदाराच्या निवेदनाला अधिकारी यांच्याकडून “ना न्याय ना निवारण” होताना दिसत नाही. मी संपादक म्हणून अनुभवले आहे. अर्जानुसार त्या त्या विभागाकडे लोकशाही दिनातील आलेले अर्ज पाठविले जातात. अहवाल मागवला जातो. परंतु त्यातून अर्जदाराला न्याय ही मिळत नाही आणि त्याच्या लेखी म्हणण्याचे निवारण ही होत नाही. म्हणायला लोकशाही दिन बरा वाटतो. पण या दिनातील अर्जदाराच्या अर्जाचे , निवेदनाचे म्हणावी तशी दखल घेताना दिसत नाही. लोकशाही दिन म्हणजे अर्जदाराचे म्हणे समजून त्यावरती त्वरित न्याय देणे , अडचण असल्यास शासकीय स्तरावर त्या अर्जदाराला मार्गदर्शन करणे , निवारण करणे असे असले पाहिजे. तसेच लोकशाही दिनात सर्व विभागाचे वरिष्ठ , कनिष्ठ अधिकारी हे हजर राहिले पाहिजेत. लोकशाही दिन म्हणजे न्यायदिन जनतेसाठी वरदान ठर...