Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

कै.समाजरत्न राजेंद्र (भाऊ) हणमंतराव पाटील म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व: मा.श्री.अभिमन्यू आठवले

 

कै.समाजरत्न राजेंद्र (भाऊ) हणमंतराव पाटील

उपसंपादक: वैभव आठवले बहुजन भूषण वृत्तपत्र

     कै.समाजरत्न राजेंद्र (भाऊ) हणमंतराव पाटील, नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील नामवंत, गुणवंत, कीर्तिवंत, चारित्र्य संपन्न, आदरयुक्त, सामाजिक कार्यात सहभागी असणारे, मनमिळाऊ जिव्हाळा, आपुलकीचा झरा असे होते.

     कुशल बागायत, जनावरे जपण्याचा छंद असे होते. त्यांनी नातेपुते गावचे पोलीस पाटील म्हणून सामाजिक सेवा समजून जबाबदारी घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली. भाऊ हे माणुसकीचे दर्शन होते. आदर्श नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. कधी अहंकार, गर्व, मीपणा बाळगला नाही, सर्व बहुजन समाजाचे दैवत होते.

     मला भाऊंच्या सावलीत मनसोक्त विचार विनिमय करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन सुपुत्र मा.अतुल (बापु) राजेंद्र पाटील सध्या नातेपुते नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष म्हणून विराजमान आहेत.

     भाऊ म्हणजे दिलेला शब्द पाळणारे होते त्यांना मी  जवळून पाहिले आहे. त्यांच्या विचारात प्रचंड गोडवा होता. भाऊंनी जीवनात माणूसकी जपली, सर्वांना भाऊ आपले वाटत होते.

     भाऊ यांचे प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राद्ध) ता.०७/०२/२०२५ रोजी आहे. त्या निमित्ताने रक्तदान शिबीर, इतर सामाजिक उपक्रम राबविले गेले.

      तसेच प्रथम पुण्यस्मरण निमित्त श्री. गुरु डॉ, ह, भ, प.जयवंतजी बोधले महाराज (पंढरपूर) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम नातेपुते पाटील वस्ती येथे होत आहे.

भाऊंना आठवले परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली...!💐

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसलेजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments