Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

सह्याद्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा दिमाखदार उदघाटन सोहळा

उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र      नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार आर. जी. रूपनवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.रणजितसिंह मोहीते-पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आमदार रणजितसिंह मोहीते-पाटील यांच्या सहमतीने लोगो(अॕप)सोहळा संपन्न झाला. मोबाईल(अॕप) माजी आमदार आर.जी. रुपनवर यांच्या हस्ते व QR कोड सोहळा बाबाराजे देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रस्ताविकामध्ये संस्थेचे चेअरमन ॲड रणवीर देशमुख म्हणाले की, "नातेपुते गावामध्ये सध्या नऊ ते दहा पतसंस्था आहेत. आम्ही सर्व तरुण मंडळीनी सह्याद्री पतसंस्था स्थापन केली. आदरणीय समाजभुषण कै.नानासाहेब देशमुख यांनी रेणुका बँक, डाॕ.बा.ज. दाते प्रशाला यासारख्या संस्था स्थापन केल्या व त्या पारदर्शकपणे चालवल्या हाच वारसा पुढे घेऊन त्याच वाटेन आम्ही वाटचाल करु या संस्थेमध्ये मोबाईल अॕप्लीकेशन आहे, QR कोड आहे. घरबसल्या सर्व  व्यवहार करता...

ऑल जर्नालिस्ट अॅड फ्रेंड्स सर्कल (AJFC) या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी सौ.शोभाताई वाघमोडे यांची नियुक्ती

उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र भारतातील पहिले नोंदणीकृत पत्रकार संघटना म्हणजे  ऑल जर्नालिस्ट अॅड फ्रेंड्स सर्कल ( AJFC) ही संघटना आहे. या संघटनेची नुकतीच नातेपुते येथे २२/०३/२०२३ रोजी बैठक पार पडली. या बैठकीत AJFC चे सर्व पदाधिकारी यांनी एकमताने माळशिरस तालुका  ऑल इंडिया जर्नालिस्ट अॅड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार  संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी सौ.शोभाताई वाघमोडे यांची निवड केली. ही निवड सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले यांच्या उपस्थितीत पार पडली. या निवडीला संघटनेचे संस्थापक मा.यासीन पटेल साहेब, केंद्रीय कार्यकारणी, तसेच राज्य कार्यकारणी यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली. या संघटनेने महिलेला तालुका अध्यक्ष करून आदर व सन्मान केला. शोभाताई वाघमोडे या तरुण भारत व इतर वृत्तपत्रातून पत्रकारिता करीत असून अन्यायाला वाचा फोडत आहेत. ही संघटना पत्रकारांसाठी "वरदान" ठरत आहे. पत्रकार, संपदकांच्या पाठीशी ही संघटना उभी राहत आहे. अभिमन्यु आठवले यांच्या सोलापूर जिल्हाअध्यक्ष पदाच्या कलावधीमधील जिल्ह्यातील पहिली माळशिरस तालुका कार्यकारणी जाहीर करण्य...

नातेपुते येथील शासकीय बँकेतील कर्मचारी, मॅनेजर यांच्याकडून जनतेला मानसिक त्रास देण्याचे काम : ऑल इंडिया जर्नालिस्ट अॅड फ्रेंड्स सर्कल राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले

उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र   मिळालेल्या माहितीनुसार तसेच प्रत्यक्ष आलेल्या अनुभवानुसार नातेपुते येथे असलेल्या ज्या शासकीय बँका आहेत त्या बँकेतील कर्मचारी यांचा उद्धटपणा, आरेरावी करणे, दमात घेणे असे करीत असून ग्राहकांना सरकारी कामात अडथळा या कायद्याचा आधार घेवून दमदाटी करीत आहेत. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू म्हणून भीती दाखवत आहेत असे चाललेले आहे. ग्राहकांना सेवा देण्यापेक्षा मानसिक त्रास देण्यात नातेपुते शासकीय बँकेतील कर्मचारी आनंद मानत आहेत. ग्राहकांना वेदना देण्याचे काम शासकीय बँकेतील कर्मचारी, मॅनेजर करीत आहेत.  बसायला फिरती खुर्ची, थंडगार हवा, प्रचंड पगार यामुळे या कर्मचारी यांना माज चढला आहे. ग्राहक वेळ, पैसा, मानसिक त्रास सहन करून येत असतात. बँकेत ठेवलेला पैशाचा ग्राहक हा मालक आहे. कर्मचारी नोकर आहेत, त्यांनी नोकराप्रमाणे रहावे. बँकेत नोकर म्हणून काम करता, बँकेचा मालक नाही हे कर्मचारी, मॅनेजर यांनी लक्षात घ्यावे. नातेपुते शासकीय बँकेतील कर्मचारी हे कामचुकार असून त्या कर्मचार्‍या यांच्याबाबत व बँकेबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रकार संघटना तक्रार करणार आहे....

नातेपुते ग्रामीण रुग्णालयास मा.राजकुमार हिवरकर-पाटील शिवसेना (बाळासाहेब) यांच्याकडून ऊर्जित अवस्था प्राप्त

उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील असलेले ग्रामीण रुग्णालय हे बेवारीस असे होत चालले होते. त्या रुग्णालयात थांबू वाटत नव्हते. प्रचंड दुर्गंधी, परिसर अस्वच्छ, कर्मचारी यांचा मनमानी कारभार अशी प्रचंड बिकट अवस्था होती. या रुग्णालयात रक्त तपासण्यासाठी यंत्र सुविधा नव्हत्या. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत व जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी रुग्णालयास सेल काउंटरवर, ऑटो लायजर या दोन मशिन रक्त तपासणीसाठी नातेपुते ग्रामीण रुग्णालयास देण्यात आल्या त्यामुळे रुग्णांचा वेळ व पैसा वाचला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या नावाने रुग्णालयास व्हेंटिलेटरसह सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका देण्यात आली. त्यासाठी माळशिरस तालुका प्रमुख मा.श्री.राजकुमार हिवरकर-पाटील शिवसेना (बाळासाहेबांची) यांनी पाठपुरावा केला होता त्यास यश आले व रुग्णवाहिका नातेपुते रुग्णालयास मिळाली. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे, पंचायत समिति सदस्य माऊली पाटील, अॅड.बी.वाय.राऊत, नगरसेवक रावसा...

संपादक पत्रकार यांना दमदाटी, मानसिक त्रास, छळ केल्यास त्या समाजकंटकाला पन्नास हजार रुपये दंड, तीन वर्षापर्यंत तुरुंगवास होवू शकतो: सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले (AJFC राष्ट्रीय पत्रकार संघटना)

  उपसंपादक -  बहुजन भूषण वृत्तपत्र       सध्याच्या काळात समाजकंटकाकडून दादागिरी केली जाते, धमकावले जाते, त्यांना मनाला लाज वाटेल अशा पद्धतीने त्यांना अपमानित केले जाते, बदनामी केले जाते, जीवे मारण्याचा कट रचला जातो. तसेच शासकीय जागेत, गावठाणात काही संपादक, पत्रकार राहत असताना त्यांना गाव सोडून जाण्यास ग्रामपंचायत व इतर पालिकेमधील जातिवादी पदाधिकारी यांचेकडून अन्याय होताना दिसत आहे. पत्रकार हा खरा समाजसेवक आहे. घडणार्‍या घडामोडी जनतेसमोर मांडतो, पत्रकारांमुळेच घडणार्‍या घटनांनाची माहिती जनतेला मिळते. पत्रकारावर जीव घेणे हल्ले होताना दिसत आहे. त्यामुळे पत्रकारांवर अन्याय कराल तर यापुढे त्या  समाजकंटकाला 50,000/- (पन्नास हजार रुपये) दंड व तीन वर्षाचा तुरुंगवास होणार, पत्रकारासाठी ही जमेची बाजू आहे. त्यामुळे पत्रकाराच्या वाट्याला यापुढे कोणीही जाणार नाही. संपादक पत्रकाराला धमकावल्यास २४ तासात अटक केली जाते व लवकर जामीन हल्लेखोराला मिळणार नाही. पत्रकार संकटात असेल तर संपर्क साधून त्वरित मदत जनतेने व शासकीय यंत्रणेने केली पाहिजे. पत्रकाराला मान सन्मान दिला ग...

पत्रकार व जनतेचे हित पाहणारी ऑल जर्नालिस्ट अॅण्ड फ्रेंड्स सर्कल भारतातील एकमेव पत्रकार संघटना: सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले

  उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र सध्याच्या काळात संपादक पत्रकार वंचित आहेत. ना त्यांना पगार, ना त्यांना दररोज भत्ता, जाहिरातीच्या कमिशनवर घर परपंचा चालवावा लागतो. कोणतेही शासकीय योजना पत्रकारांना मिळत नाही. पत्रकारांना बँका जवळ करीत नाहीत अशी अवस्था पत्रकार संपादक यांची आहे,  पत्रकारिता ही अग्नी परीक्षा आहे. संपादकापुढे पेपर चालविण्यासाठी आर्थिक अडचणी आहेत, तर पत्रकारापुढे कसे जगायचे हा प्रश्न आहे. संपादक पत्रकार यांना कोणाचाही आधार नाही. पत्रकारिता करीत असताना समाजकंटकाकडून चटके बसत असतात. पत्रकाराला संपविण्यापर्यंत सध्या समाजकंटकाची मजल गेली आहे. पत्रकारासारखी अवस्था कोणाची नाही. पत्रकारांना जीव मुठीत धरून घडणार्‍या घटना उजेडात आणण्याचे पवित्र काम करतो. पत्रकारामुळेच अन्यायाला वाचा फुटते. पत्रकारांना बळ देणारी भारतातील एकमेव संघटना म्हणजे AJFC संघटना आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका अध्यक्ष नेमले जाणार आहेत. सभासद करून घेतले जाणार आहेत. त्यासाठी इलेक्ट्रिक मीडिया, दैनिक, साप्ताहिक, मासिक, वार्षिक इ. वृत्तपत्राचे संपादक पत्रकारांना या संघटनेमध्ये सहभाग करून घ...

भारतातील पहिले मित्र संघटन ऑल जर्नालिस्ट अॅण्ड फ्रेंड्स सर्कल या नोंदणीकृत राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी. आठवले यांची नियुक्ती

उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र दि.०४/०३/२०२३ रोजी या संघटनेचे संस्थापक मा.यासीन पटेल साहेब व केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी साहेब, केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार साहेब या केंद्रीय कार्यकारणी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.श्री.ईश्वर हुलवान यांनी मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी. आठवले यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली. नियुक्ती करण्यासाठी केंद्रीय उपाध्यक्ष मा.श्री. गणेश गोडसे साहेब तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री.श्रीकांत बाविसकर साहेब यांनी शिफारस केली होती. मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी आठवले हे साप्ताहिक बहुजन मित्र, बहुजन भूषण वृत्तपत्राचे, सडेतोड, निर्भीड, जहालवादी, मवाळवादी, विचारवंत संपादक पत्रकार म्हणून महाराष्ट्रात ओळखले जात आहेत.  हे "शोधपत्रिका" करीत असून जे दिसेल, जे अनुभवले, जे पाहिले यावरतीच रोखठोक लिहीत असतात. त्यांनी यापूर्वी अनेक सामाजिक, राजकीय पक्षात काम केले आहे. त्यांची ही स्वत:ची बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना आहे. अन्याय विरुद्ध लढा देण्यासाठी सदैव जागरूक असतात. या AJFC संघटनेत यापूर्वीही चांगले काम केले आहे. अभ्यासूवृत्तीने अधिका...

अधिकार्‍यांनो "लायक" बना, "नालायक" बनू नका

उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र अलीकडच्या काळात अधिकारी यांना "साहेब" म्हणताना लाज वाटते. अर्जदार आपले प्रश्न, अडीअडचणी सोडविल्या जाव्यात त्या त्या विभागाचे जे अधिकारी असतात त्या त्या अधिकार्‍याकडे अर्जदार अर्ज देतात, कर्मचारी पोच देतात पण त्या अर्जाचे निवारण करून त्याचवेळी न्याय देताना अधिकारी दिसत नाहीत हे मी संपादक म्हणून अनुभवले आहे, पाहिले आहे. अर्जदाराच्या अर्जाला केराची टोपली दाखवली जाते. अर्जदाराचा पैसा, वेळ वाया घालवून अधिकारी यांच्याकडे अर्जदार अर्ज देतो, जेणेकरून अधिकारी न्याय देतील परंतु अर्जदाराच्या वाट्याला संकट, शिमगा येताना दिसते. अधिकारी यांनी तातडीने अर्जदाराने दिलेल्या अर्जाचे निवारण करून त्याबाबत निर्णय तसेच मार्गदर्शन केले पाहिजे परंतु असे होताना दिसत नाही.  अधिकारी यांनी आलेल्या अर्जदाराच्या अर्जाचे निवारण करून "लायक" म्हणून नाव कमवावे "नालायक" म्हणून नको. "खुर्ची आणि पद" याला शोभेल असा न्याय निवाडा करावा. अर्जदाराने दिलेला अर्ज त्यामधील विषय याबाबत गुंतागुंतीचा विषय असेल तर अर्जदाराने काय करावे यासाठी अधिकारी यांनी मार्गद...