Skip to main content

Posts

Showing posts from September, 2022

सोलापूर जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पंचवीस हजार कार्यकर्ते दसरा मेळावा यासाठी मुंबई येथे जाणार : जिल्हाप्रमुख चरणराज (दादा) चवरे

  उपसंपादक :  साप्ताहिक बहुजन भूषण           नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर येथील शंकरराव कॉम्प्लेक्स येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची दसरा मेळावा यासंदर्भात बैठक पार पडली. मोठे बाजारपेठेचे असलेले नातेपुते हे गाव व पश्चिम भागातील तसेच आजूबाजूच्या गावातील असंख्य कार्यकर्ते यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश जिल्हा अध्यक्ष चरणराज (दादा) चवरे यांच्या उपस्थिती केला. एकनाथ शिंदे गटाला जिल्हाध्यक्ष म्हणून लाभलेले चरणराज चवरे म्हणजे तळागाळातून काबाड कष्ट करून सर्व सामान्य जनतेच्या अडीअडचणीच्या वेथा-वेदना समजावून घेऊन त्यांना न्याय मिळवून देणारे एक तडफदार व्यक्तिमत्व म्हणून शिवसेना शिंदे गटाला जिल्हाध्यक्ष लाभले आहेत. मनमिळावू व्यक्तिमत्त्व , पदाचा गर्व नाही. पक्षाने टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हे आपले कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले. चवरे यांच्या रूपाने सोलापूर जिल्ह्याला एक कर्तव्यदक्ष पदाधिकारी शिंदे गटाला मिळाला आहे. मुंबई येथे दसरा मेळाव्यासाठी नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर येथे बैठकीसाठी आले होते. त्यावेळी असंख्य पदाधिक...

साप्ताहिक बहुजन मित्र नवव्या वर्षात तर साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र पाचव्या वर्षात दमदार पदार्पण करीत आहे

  उपसंपादक            माझ्या सर्व जाहिरातदार , पत्रकार , विविध क्षेत्रातील मान्यवर , व्यापारी , वाचक , पतसंस्था , शिक्षण संस्था , सर्व राजकीय , सामाजिक क्षेत्रातील मान्यवर , आपण सर्वांनी साप्ताहिक बहुजन मित्र व साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राला भरगोस जाहिरातीच्या माध्यमातून मदत केली आहे. आपला आशीर्वाद माझ्या वृत्तपत्राला लाभला आहे. त्यामुळेच वृत्तपत्राने घवघवीत वाटचाल केली आहे. साप्ताहिक बहुजन मित्र नवव्या वर्षात तर साप्ताहिक बहुजन भूषण पाचव्या वर्षात दमदार पदार्पण करीत आहे. हे वृत्तपत्रे “जे दिसेल तेच लिहत आहेत व रोखठोक मांडले जाते.” या वृत्तपत्राची “शोधपत्रकारिता” म्हणून गवगव चालू आहे. संपादक , उपसंपादक यांचे सडेतोड अभ्यासपूर्ण लेखन विविध विषयावर करून अन्याय , अत्याचार याबाबत आवाज उठवीत आहेत. आपणा सर्वांचा आशीर्वाद माझ्या वृत्तपत्राला लाभला आहे त्याबद्दल सर्वांना आजच्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्या व्यवसायाच्या जाहिराती देवून असेच पुढेही सहकार्य करा. रेखीव , कोरीव , ना नफा ना तोटा यावरती आपल्या व्यवसाया...

वाखरी ग्रामपंचायतच रहावी पंढरपूर नगरपालिकेमध्ये विलीन करू नये यासाठी ग्रामस्थांचा विरोध

  संपादक :  बहुजन भूषण वृत्तपत्र पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर-पुणे रोड वर असलेले वाखरी गाव हे हद्दवाढीमध्ये पंढरपूर नगरपालिकेत समाविष्ट करावे असे सुधारित आराखड्यामध्ये असल्याचे आढळून आले. त्यामुळे दिनांक २६/०९/२०२२ रोजी वाखरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांची बैठक पार पडली. त्या बैठकीत वाखरी गाव पंढरपूर नगरपालिकेमध्ये विलीन करू नये यासाठी वाखरी ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यासाठी आंदोलने , वेळप्रसंगी कोर्टात जाण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. वाखरी गावात जवळपास २८५३ असे लागवडी क्षेत्र आहे. व ग्रामस्थांचे उपजीविकेचे साधन आहे. वाखरी गाव पंढरपूर नगरपालिकेत विलीन केल्यास त्याचा फटका सर्व ग्रामस्थांना बसणार आहे. ग्रामस्थांवर अन्याय होणार आहे. तरी वाखरी गाव पंढरपूर नगरपालिकेत विलीन करू नये. असे तातडीने जिल्हाधिकारी साहेब सोलापूर मिलिंद शंभरकर यांना ईमेल द्वारे ग्रामस्थांनी कळविले आहे. वाखरी गाव पंढरपूर नगरपालिका हद्दवाढमध्ये गेल्यास मोठ्या प्रमाणात शेतकर्‍याचे नुकसान होणार आहे. त्याचा फटका सर्व जनतेला बसणार आहे. तरी वाखरी गाव पंढरपूर नगरपालिकेत हद्दवाढ करण्याच्या हेतून...

शिवप्रेमी तरुण मंडळ सार्वजनिक नवरात्र उत्सवाला सुरुवात

  शिवप्रेमी तरुण मंडळ, पुणे उपसंपादक ( पुणे)           गाढवे मळा , कुंजीरवाडी ता.हवेली , जि.पुणे येथे शिवप्रेमी तरुण मंडळ सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२२ साजरा होत आहे. यानिमित्ताने सोमवार दि.२६/०९/२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वा.भव्य मिरवणूक व सायं.०८ वा. घटस्थापना , मंगळवार दि.२७/०९/२०२२ सायं ८ ते १० शिवपुत्र संभाजी महाराज श्री.राकेश पिंजन यांचे व्याख्यान , बुधवार दि.२८/०९/२०२२ सायं ०८ वा. फूल टु धमाल , दि.२९/०९/२०२२ सायं ८ ते १० संगीत खुर्ची कार्यक्रम , ३०/०९/२०२२ रोजी सायं ८ ते ११ होम मिनिस्टर कार्यक्रम , शनिवार दि.०१/१०/२०२२ रोजी सायं ८ ते १० डान्स स्पर्धा विविध कलागुण दर्शन , रविवार दि.०२/१०/२०२२ रोजी ८ ते १० दांडिया ग्रुप कार्यक्रम , सोमवार दि.०३/१०/२०२२ सायं ८ ते १० जल्लोष महाराष्ट्राचा कार्यक्रम , मंगळवार दि.०४/१०/२०२२ रोजी सायं ६ ते ०९ वा.पर्यंत होम हवन कार्यक्रम , बुधवार दि.०५/१०/२०२२ रोजी सायं ६ ते ०९ दसरा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तरी तमाम बंधु भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन शिवप्रेम...

नातेपुते नगरपंचायतचा विकासात्मक लेखाजोखा

उपसंपादक             ०३ ऑगस्ट २०२१ रोजी नातेपुते ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले. निवडणुका लागल्या , निकाल लागले आणि १८ फेब्रुवारी २०२२ रोजी  नगरसेवक  यांनी पदभार स्वीकारला. त्वरित सर्व प्रभागाचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये रस्ते , पानी , ड्रेनेज इ.ची पाहणी केली. ०९ मार्चच्या मासिकी मीटिंगमध्ये ०१ ते १७ प्रभागातील कामे मंजूर करून घेण्यात आली. सध्या २२ दिवस पाणी पुरेल एवढा साठा असून तो साठा वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यासाठी ०५ कोटी रुपयांची गरज आहे. आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे तशी मागणी केली आहे. १७ प्रभागात विविध कामाच्या निधीसाठी डी.पी.डी.सी. प्रस्ताव पाठवले आहेत. सध्या निधी मिळाला नसल्यामुळे थोडी अडचण येत आहे परंतु ती लवकरच सुटेल. सर्वांच्या मदतीने नातेपुते नगरपंचायतचा कायापालट होऊन एक विकासाचे नातेपुते गाव होईल असे नगराध्यक्ष सौ.उत्कर्षाराणी पलंगे व उपनगराध्यक्ष मालोजीराजे(आबासाहेब) देशमुख , सार्वजनिक बांधकाम सभापती अतुल(बापू)पाटील यांनी माहिती पत्रकार परिषदेत दिली. तसेच गावातील बरीच ...

कै.सुभाष (तात्या) शंकर बावकर म्हणजे लहान थोरांसाठी आधारस्तंभ होते त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम

कै.सुभाष(तात्या) शंकर बावकर उपसंपादक             नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर येथील कै.सुभाष(तात्या) शंकर बावकर यांचे प्रथम पुण्यस्मरण बुधवार दि.२१/०९/२०२२ रोजी आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यामध्ये २०/०९/२०२२ रोजी दुपारी ४ ते ५ वा. प्राध्यापक दीपक देशपांडे सोलापूर झी टॉकीज मराठी फेम यांचा एकपात्री कार्यक्रम होणार आहे. तसेच संध्याकाळी ५ ते ७ वा. ह.भ.प.निवृत्त महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांचे कीर्तन नातेपुते येथील डॉ.बा.ज.दाते प्रशाला येथे होणार आहे. बुधवार दिनांक २१/०९/२०२२ रोजी सकाळी १० ते १२ वा. ह.भ.प.नीलेश महाराज कोरडे जुन्नरकर यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२ वा. पुष्पवृष्टी व त्यानं भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीची सभापती मामासाहेब पांढरे , अतुलशेठ बावकर , सत्यवानशेठ बावकर यांनी केले आहे.  बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले     ...

विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय मधील लोकशाही दिन जनतेसाठी न्यायदिन ठरावा यासाठी अधिकारी यांची भूमिका असावी नौटंकी नसावी

  संपादक          विभागीय आयुक्त कार्यालय , जिल्हाधिकारी कार्यालय , तहसील कार्यालय या ठिकाणी लोकशाही दिन साजरा होत असतो. यामध्ये जनतेने दिलेल्या अर्जातील लेखी म्हणणे , अडचणी त्या लोकशाही दिनात दिलेल्या अर्जानुसार त्वरित दखल घेवून जनतेला न्याय दिला पाहिजे. परंतु लोकशाही दिनात जनतेने दिलेले अर्ज त्यानुसार फक्त अधिकारी पत्र व्यवहार करून ज्या त्या कार्यालयाकडे पाठवीत असतात. ठोस निर्णय घेत नाहीत. लोकशाही दिन हा न्याय दिन जनतेसाठी ठरला पाहिजे. परंतु सध्या लोकशाही दिन अधिकार्‍याची अशीही बनवाबनवी असा झाला आहे. लोकशाही दिनातील अधिकारी यांच्याकडे जनतेने दिलेल्या अर्जानुसार त्वरित निवारण करून अर्जदाराला न्याय दिला पाहिजे. अर्जदार वेळ , पैसा घालवून लोकशाही दिनात न्याय मिळेले ही अपेक्षा बाळगून अर्ज देत आहेत. परंतु अर्जदाराच्या हाती निराशाच येत आहेत. लोकशाही दिन हवा कशासाठी ? त्याचा उपयोग काय ? हे अधिकारी यांनी लक्षात घेतले पाहिजे. लोकशाही दिन हा जनतेचे प्रश्न अडीअडचणी , आलेल्या अर्जाचे निवारण करून त्वरित न्याय द्यावे. हे लोकशाही दिनाचे वैशिष्ट आहे. परंतु लोकश...

डॉ.वैभव विठ्ठल कवितके जनतेसाठी ठरत आहेत “वरदान”

डॉ.वैभव विठ्ठल कवितके उपसंपादक : वैभव आठवले         नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर येथील डॉ.वैभव विठ्ठल कवितके यांनी नातेपुते शहरातील रस्ते दुरुस्त करावेत म्हणून नातेपुते नगरपंचायतच्या मुख्याधिकारी माधव खांडेकर साहेब यांना मोर्चा काढून निवेदन दिले आहे. पंढरपूर-पुणे ते नातेपुते पोलिस स्टेशनकडे जाणारा रस्ता उखडून गेला आहे. मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्या रस्त्यावर सतत वरदळ असते. लहान मुले , महिला , पुरुष , वयोवृद्ध व्यक्ति ये जा करीत असतात. या रस्त्यावर महादेव मंदिर , बाजारतळ , पोलिस स्टेशन आहे. हा रस्ता बाजारतळाला लागून आहे. लहान मोठी वाहने या रस्त्याने सतत ये-जा करीत असतात. या रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. जनतेला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. या रस्त्याचे सेमेंट कॉंक्रेटीकरण करण्यात यावी अशी मागणी डॉ.वैभव कवितके व त्यांचे सहकारी यांनी केली आहे. जनतेसाठी ज्या सुविधा पाहिजेत त्यासाठी नगरपंचायतला जागे करण्याचे काम डॉ.वैभव कवितके करीत आहेत. व्यवसायाने वैभव कवितके डॉक्टर आहेत. त्यांचा नातेपुते येथे मोठा दवाखाना आहे. जनतेच्या वेदना काय असतात त...

पोलिस बांधवांची अशीही आडवाअडवी जनतेच्या मुळावर

  संपादक           सध्या रोडवर येणे जाणे जनतेसाठी दुख:द घटना झाली आहे. सध्या टू व्हीलर ,  फोर व्हीलर , इतर वाहनांवर पोलिस बांधव कारवाई करीत असल्याचे दिसत आहेत. “सीट बेल्ट वाहनामध्ये असणे गरजेचे झाले आहे.” मंत्र्यांनी आदेश सोडायचा आणि पोलिस बांधवांनी जनतेवर अन्याय करायचा हे सध्या जोमात चालू आहे. जनतेने कसे जगायचे ? फिरावे की नाही ? असे प्रश्न जनतेला पडले आहेत. सध्या पोलिस बांधव जनतेच्या मुळावर उठले आहेत. लायसन्स , हेलमेट , इन्सुरन्स , सीट बेल्ट , नंबर प्लेट , गाडी जुनी किंवा नवी , हॉर्न , टायर नवीन जुने , इ. विचारून पोलिस बांधव जनतेला कोंडीत पकडीत आहेत. ज्या जनतेने हरामखोरांना आमदार खासदार केले , ते मंत्री झाले. तेच जनतेच्या जिवावर उठले आहेत. सध्या देशात हुकुमशाही चालू आहे. जो तो केंद्रातील असो वा कोणत्याही राज्यातील मंत्री मनात येईल ते आदेश काढून जनतेला वेठीस धरत आहेत. जनतेला चांगले दिवस येतील , देश व देशातील जनतेचे कल्याण होईल यामुळे राजकर्त्यांनी दिलेल्या आश्वासनाला बळी पडून जनतेने मतदान केले आणि सत्तेवर बसविले. त्याच राजकर...

वाखरी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी धनश्री तानाजी साळुंखे विराजमान

पंढरपूर : बहुजन भूषण वृत्तपत्र      माहितीनुसार वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर येथील १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतचे सरपंचपदी धनश्री तानाजी साळुंखे यांची निवड झाली आहे. काही महिन्यापूर्वीच पती तानाजी अभिमान साळुंखे यांचे निधन झाले आहे. पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहेत व त्या सरपंच व्हाव्यात अशी पतीची इच्छा होती. त्यामुळे काळजावर दगड ठेवून पत्नीने पतीचे सरपंच होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. मागील दीड वर्ष कविता पोरे या सरपंच होत्या ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ०१/०९/२०२२ रोजी वाखरी ग्रामपंचायतमध्ये विशेष सदस्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये धनश्री तानाजी साळुंखे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी सरपंच पदासाठी धनश्री तानाजी साळुंखे यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची सरपंचपदी निवड झाली. यावेळी उपसरपंच सोमनाथ पोरे , मावळत्या सरपंच कविता पोरे , माजी उपसरपंच संग्राम गायकवाड , सर्व सदस्य , ग्रामविस्तार अधिकारी सुखदेव शिंदे तसेच पंतकृपा पतसंस्थेचे चेअरमन गु...