ज्ञानेश्वर चंद्रकांत गुळिग सर यांच्या गाडीचे केलेले नुकसान |
संपादक
नातेपुते पालखी मैदान ता.माळशिरस येथे चोरट्यांनी
धुमाकूळ घातला असून चप्पलचे व्यापारी खंदारे यांच्या घराचे कडी कोयंडा तोडून दोन चप्पलचे
जोडे व एक चप्पल तयार करण्याचे हत्यार चोरटे घेऊन गेले तसेच चोरट्यांनी त्यांचे बूट
खंदारे यांच्या घरात सोडून नवीन चप्पलचे जोड घेऊन गेले. तसेच ज्ञानेश्वर चंद्रकांत
गुळिग सर यांची चारचाकी गाडी Nexon MH 42 AX 4394 या
गाडीच्या काचा फोडून नुकसान केले आहे. तसेच प्रकाश साळवे, ग्रामपंचायत
सदस्य यांच्या घराचे कडी कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या
जागरुतीमुळे त्या घरातील चोरट्यांनी मोबाईल चार्जर घेऊन गेले आहेत. तसेच नातेपुते येथे
काही ठिकाणी चोरांनी चोरी केल्याचे बोलले जात आहे. चोरट्यांनी पालखी तळाशेजारील कुटुंबांना
“टार्गेट” केल्याचे चित्र दिसत आहे. हे भुरटे चोर असावेत असे जनतेतून बोलले जात आहे.
या भागात नातेपुते पोलिस स्टेशनने पेट्रोलिंग करावे असे जनतेला वाटते. या भागात चोरट्यांचा
धुमाकूळ चालू असून यामुळे येथील कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व हे
चोरी करणारे भुरटे चोर किंवा सराईत गुन्हेगार असावेत असे वाटते. तसेच हे चोरी करणारे
चोर दिवसा पाहणी करून रात्री चोरी करण्याचे ठरवीत असावे असे दिसते. या चोरांच्या मुसक्या
आवळणे पोलिस खात्यासमोर आव्हानच उभे राहीले आहे असे वाटते. ह्या घटना बुधवारच्या मध्यरात्री
घडल्या असून त्या घरांना पोलिस कर्मचारी यांनी भेटी दिल्याचे समजते.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.