मा. श्री.मालोजीराजे देशमुख |
संपादक
दिनांक ०५/०९/२०२१ रोजी
नातेपुते ता. माळशिरस या गावामध्ये कोरोनाचा कहर चालू असतानाच डेंगू व चिकनगुनीया
या साथीच्या रोगाने गावामध्ये थैमान घातले आहे अशा परिस्थितीत मा.श्री.मालोजीराजे
देशमुख मित्र परिवाराच्या वतीने नातेपुते गावात गल्लो-गल्ली जाऊन डेंगू व
चिकनगुनिया प्रतिबंधात्मक औषधाची फवारणी करण्यात आली. याचे उद्घाटन माजी वैद्यकीय
अधिकारी डॉ.एम. पी. मोरे साहेब यांच्या हस्ते मार्केट कमिटी नातेपुते येथून या
उपक्रमाचा शुभारंभ झाला. या गावामध्ये डेंगू व चिकनगुनियाची साथ सुरू असून या
आजाराने अनेक व्यक्ति बाधित झाल्या आहेत त्यामुळे हा आजार कोणत्याही व्यक्तिला होऊ
नये यासाठी औषधाची फवारणी केली गेली व गावामधील घरोघरी जाऊन डेंगू व चिकनगुनिया
होण्याची कारणे व त्यासाठी घ्यावी लागणारी खबरदारी व उपाययोजना याबाबत माहिती
पत्रक वाटप करण्यात आले. तसेच प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सोलापूर उपाध्यक्ष बाबाराजे (दादा) देशमुख, कृषि उ.
बा.स. उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समिति सदस्य माऊली पाटील, नातेपुते ग्रा.प.चे उपसरपंच अतुल (बापू) पाटील, डॉ.नरेंद्र
कवितके, अतुल बावकर, महेश शेटे, राजाभाऊ देशमुख, अॅड. रावसाहेब पांढरे व असंख्य मान्यवर
व मालोजीराजे देशमुख व त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.