Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

श्री गणेश प्रतिष्ठान यांच्याकडून सौ. पदमन (वाडकर) मॅडम (आरोग्य सेविका) यांना “कोव्हिड योद्धा” सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले

संपादक           नातेपुते येथील श्री गणेश प्रतिष्ठान यांच्याकडून  सौ. पदमन मॅडम (आरोग्य सेविका) यांना “कोव्हिड योद्धा” सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.   श्री गणेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर (दादा) अटक यांनी कोरोना या काळात अहोरात्र झटत असलेल्या आरोग्य सेविका यांचा सन्मान केला. यावेळी श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष मल्हारी गवळी , उपाध्यक्ष आदेश पवार , जयश्री अटक तसेच श्री गणेश प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. *बातमी* *अधिक जाहिरातीसाठी संपर्क* संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण , साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार

साप्ताहिक बहुजन मित्र व साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राचे संस्थापक संपादक मा. श्री. अभिमन्यु बी. आठवले यांना "कोरोना योद्धा" पुरस्काराने सन्मानित

मा. सौ. यशश्री प्रमोद पाटील संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलिस पत्नी संघ यांचाकडून साप्ताहिक बहुजन मित्र व साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राचे संपादक निर्भिड पत्रकार व तसेच संस्थापक बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य श्री. अभिमन्यु बी. आठवले यांना “कोरोना योद्धा” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण , साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार  

जिल्हाधिकारी सोलापूर मिलिंद शंभरकर साहेब यांच्याकडे कोरोना या रोगाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी नातेपुते येथे कोव्हिड उपचार केंद्र सुरू करावे यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. श्री. बाबाराजे (दादा) देशमुख यांची मागणी

मा. श्री. बाबाराजे (दादा) देशमुख  संपादक           कोरोना कोव्हिड -१९ या रोगाचे शहर , गाव , वाडी , वस्ती , वार्ड , गल्ली मध्ये कोरोना या रोगाची मोठ्या प्रमाणात लागण होत असून नातेपुते हे गाव बाजारपेठेचे असून या गावाला जोडून असंख्य गावे आहेत. या ग्रामीण भागातील गावात कोरोना या रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात या भागात सापडत असून या रूग्णाला बाहेर न जाता नातेपुते येथेच कोव्हिड उपचार केंद्र सुरू केले तर रुग्णाची गैरसोय होणार नाही. आता पर्यंत ग्रामस्थांच्या मदतीने दोन लाख रुपये खर्च तातडीने उभा केला आहे असे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. श्री. बाबाराजे (दादा) देशमुख यांनी सांगितले आहे. त्वरित जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनी   कोरोना कोव्हिड केंद्रास मान्यता देऊन रुग्णाचे होणारे हाल थांबवावे. तसेच नातेपुते येथे कोव्हिड सेंटर झाल्यास रूग्णाला याच ठिकाणी चांगले उपचार मिळतील. माळशिरस तालुक्यातील पूर्व भागात अकलूज , महाळूंग येथे उपचार केंद्र सुरू असून सोलापूर जिल्ह्याचे शेवटचे पश्चिम भागातील नातेपुते हे मो...

ज्या ग्रामपंचायतचा पाच वर्षाचा कालावधी संपला आहे त्यावरती सामाजिक कार्यकर्त्याची प्रशासक म्हणून नेमणूक करावी यासाठी शासनाने आदेशाचे परिपत्रक काढावे

संपादक           महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतचा पाच वर्षाचा कालावधी संपला आहे. सध्याच्या या कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या काळात ग्रामपंचायत निवडणुका घेणे योग्य नाही असे शासनाचे मत आहे त्यामुळे त्याच गावातील स्वच्छ , पारदर्शी , उच्चशिक्षण , एक आदर्श सामाजिक कार्यकर्ता असे असलेला त्याच गावातील ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून त्या सामाजिक कार्यकर्त्याची नेमणूक करण्यात यावी. यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांनाच तो अधिकार असावा. त्यामध्ये राजकीय पुढार्‍यांचा हस्तक्षेप नको. प्रशासक नेमताना तो अडाणी , कमी शिकलेला , अवैध धंदे करणारा व गुन्हेगारी वृत्तीचा नसावा. त्यागावातील जनतेच्या अडीअडचणी सोडविणारा गावाचा विकास करणारा व त्या विकासाची माहिती असणारा असावा. ज्या ग्रामपंचायतचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला आहे त्यातील कोणत्याही सरपंच , उपसरपंच , सदस्य यांना अधिकार देऊ नयेत व प्रशासक म्हणून नियुक्ती करू नये असे वाटते. सामाजिक कार्यकर्त्याला प्रशासक म्हणून नेमण्यात यावे तसेच पोलिस पाटला सारखी परीक्षा प्रशासक पदासाठी घेण्या...

वाढदिवसातून मैत्री घट्ट बनते

  संपादक           सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या जन्म तारखा समजत असून त्यामुळे आपल्या मित्राचे , नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी मित्रच मित्रासाठी एकत्र येऊन वाढदिवस साजरे करीत असतात हा अविस्मरणीय क्षण असतो. या वाढदिवसामुळे एकसंघपणा , एकीचेबळ निर्माण होताना दिसते. पूर्वी नेत्यांच्याच वाढदिवसाला युवक वर्ग जायचा सध्या तशी परिस्थिति राहिली नाही. नेत्याला मागे टाकून आपले मित्रच , आपले नेते , सामाजिक कार्यकर्ते असे समजून एकमेकांचे वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे करताना दिसतात खूप बरे वाटते. या वाढदिवसामुळे जात , पात , धर्म असा भेदभाव उरत नाही. सर्व मिळून मित्रच मित्राच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवस साजरा करतात. प्रत्येकाच्या चेहरावरती आनंद दिसून येतो. सर्व मित्र मंडळी अगदी मित्राच्या वाढदिवसामुळे खुश असताना दिसतात. सध्या मित्र आपल्या मित्राचे वाढदिवस नेत्यांच्या वाढदिवसापेक्षाही जोरात साजरे करतात. नेत्यांच्या वाढदिवसाला सध्या युवकांची पसंती दिसत नाही मात्र मित्रांच्या वाढदिवसाला मित्रांची पसंती मोठ्या प्रमाणात दिसत...

एक देश एक सिधापत्रिका (रेशनकार्ड) केंद्र सरकारच्या महत्वपूर्व निर्णयाचे स्वागत

  संपादक केंद्र सरकारने भारत देशातील जनतेसाठी एक देश एक सिधापत्रिका हा निर्णय जनतेच्या हिताच्या दृष्ठीने अत्यंत महत्वपूर्ण व योग्य आहे या निर्णयाचे मी स्वागत करतो. या निर्णयामुळे देशाचे नागरिक रहिवासी व सुपुत्र म्हणून वावरतील  व त्यांना देशातील राज्यात , जिल्ह्यात , तालुक्यात , गावात कोठेही रेशन दुकानातून त्या कुटुंबांना , त्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तु , अन्नधान्य मिळेल. त्यामुळे कोणीही वंचित व परका म्हणून त्या कुटुंबांना संभोधनार नाही त्यांचा तो हक्क व अधिकार राहणार आहे त्यासाठी त्वरित अंमलबजावणी केंद्र सरकारने अंमलबजावणीकरावी व तसे आदेश जलद गतीने सर्व राज्यातील जिल्हाधिकारी यांना द्यावेत. या निर्णयामुळे खर्‍या अर्थाने संविधानाने त्या कुटुंबाला न्याय दिला असे होईल. सध्याच्या काळात आम्ही गावचे रहिवासी हे परक्या गावचे हा जो भेदभाव मोठ्या प्रमाणात जास्त करून ग्रामीण भागात दिसतो त्यामुळे त्या कुटुंबाला अपमान सहन करावा लागतो. मान खाली घालावी लागते तसेच विविध शासनाच्या योजना त्या कुटुंबाला मिळू नयेत यासाठी ग्रामीण भागातील काही निवडक मंडळी दुजाभाव करतात. त्यामुळे केंद्र सर...

मी जे लिहतो ते माझे स्वतंत्र विचार असतात व निर्भिडपणे मांडणे हे माझे कर्तव्य समजतो

मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले  संपादक           मी उच्च शिक्षण अत्यंत गरिबीतून घेतले. जवळपास ७०० लेखकांची पुस्तके , अनेक लेखकांचे लेख वाचले असून त्यामुळे मी अवांतर वाचन केले. त्यामुळे मला माझे विचार मवाळवादी असो वा जहालवादी त्यामध्ये परिवर्तनवादी , प्रबोधनवादी सामावलेले असतात. मी जे लिहतो त्यामध्ये कोणाचा द्वेष , मत्सर , टीका टिपणी , मतभेद असे काहीच नसते. पण मला एक चीड येत आहे की , खरे बोलणे , खरे लिहणे यावरती ०५/०३/२०१५ रोजी माझ्याच समाजातील काही मोजक्या समाजकंटकाने मी लिहलेल्या लेखावर आक्षेप घेऊन समाजात चुकीची माहिती पसरवून हल्ला केला. हल्ला केल्याने मी भीत नाही किंवा माझे विचार मेले नाहीत . हल्ल्यामुळे मी जोमाने सडेतोड विचार लिहण्यासाठी उलट मला बळ मिळाले. परंतु वाईट वाटते की , मी परिवर्तनवादी विचार मांडले होते त्यामध्ये गैर काही नव्हते असे असताना माझ्यावरती माझ्याच समाजाने हल्ला करावा ही चिंताजनक बाब आहे . त्यामुळे मी कधीही त्यांना माफ करणार नाही व कधीच चांगले म्हणणार नाही ही माझी भीम प्रतिज्ञा आहे असो. कोणावर काय लिहाय...

आत्महत्या करणारे पुरुष हे नामर्द पणाचे लक्षण ठरू शकते

संपादक           सध्याच्या काळात माणसावर अनेक संकटावर संकटे येत आहे त्यासाठी कुटुंबाला जगवण्यासाठी घरातील कर्ता पुरुष त्या अडचणी सोडवण्यासाठी एखाद्याकडून कर्ज घेणे , त्या कर्जाचा ताणतणाव येणे त्यामुळे व्यसनाच्या आहारी जाणे , कामधंदा न करता सतत इतरांकडून आर्थिक देवाण घेवाण करणे. पाणी अभावी शेती मध्ये काहीच करता न येणे , मुलामुलीचे लग्ने , शिक्षणाचा खर्च अशा विविध समस्या घरातील कर्ता पुरुष या नात्याने असतात पण हे कशामुळे तर स्वत: च्या आळशी पणामुळे काम धंदा न करता सतत दुसर्‍याकडून आर्थिक मदत घ्यायची आणि घर परपंचा चालवायचा हेच काम या पुरुषाचे असते. त्यामुळे घेतलेले पैसे देता येत नसल्यामुळे कुटुंबाला वेठीस धरायचे घरात सतत भांडणतंटे यामुळे तो माणूस आत्महत्या करायचा विचार करतो. मिळालेले जीवन अर्ध्यावर सोडून पत्नीचा , आई , वडील , भाऊ , भावजय , मुले , नातेवाईक यांचा विचार न करता जीवन संपवतो व आपण सुटलो. माझ्या मागे या कुटुंबाचे काही होवो न होवो याची मला काळजी नाही असे मनात आणून अनमोल जीवन संपवतो. परंतु जीवन संपवण्यापूर्वी जर विचार केला असत...

हेलमेट याच कंपनीचे वापरले पाहिजे यासाठी सरकारने मार्केटिंग करू नये व जनतेला वेठीस धरू नये

संपादक           सध्या सरकार हे जनतेसाठी आहे की जनतेवर अन्याय करण्यासाठीच आहे ? कोरोना कोव्हिड-१९ च्या काळात देश व जनता होरपळून निघत आहे आणि सरकारचे आदेश जनतेच्या हिताचे न राहता जनतेला वेठीस धरण्यासाठी आहेत अशी परिस्थिति निर्माण झाली आहे. जो नागरिक आहे त्यानुसार आपल्या परिस्थितीनुसार शासनाच्या आदेशाचे पालन व स्वत: च्या शरीराचे पालन करीत आहे. त्यामध्ये आता सरकारने BIS प्रमाणितच हेलमेट वापरणे पाहिजे असा आदेश काढला त्यामुळे जनतेमध्ये असंतोष पसरला आहे हा जनतेवर अन्याय आहे. कारण की या हेलमेटमुळे डोक्याला मार लागला तर हे हेलमेट डोक्याचे रक्षण करते हे झाले डोक्यापुरते अपघातामुळे हात पाय व इतर अवयव मोडू नये त्यासाठी कोणते हेलमेट वापरले पाहिजे त्यासाठी जनतेला सांगावे. जनतेने निवडून राज्यकर्ते बनवले हेच राज्यकर्ते जनतेवर आदेशावर आदेश काढून जनतेचा छळ करीत आहेत त्यासाठी सरकारने हेलमेट याच कंपनीचे वापरले गेले पाहिजे यासाठी मार्केटिंग चालू केले आहे व न वापरल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असे सरकार सांगत आहे. जनतेच्या अवयवाचे रक्षण करावे असे वाटत असेल त...