Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जि.परिषद सदस्य, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगरसेवक, आमदार, खासदार होण्यासाठी पात्रता परीक्षा घेण्यात यावी ही काळाची गरज: मा.श्री.डॉ.अभिमन्यु आठवले

संपादक बहुजन भूषण वृत्तपत्र  सध्या सर्वच क्षेत्रात म्हणजे पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, बी.डी.ओ., तहसिलदार, प्रांत, शिक्षक, डॉक्टर, जिल्हाधिकारी, वकील, इंजिनियर, कोर्ट इत्यादी विभागात शासकीय, निमशासकीय कर्मचारी अधिकारी होण्यासाठी परीक्षा द्याव्या लागतात.       त्याचप्रमाणे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जि.परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, आमदार, खासदार इत्यादी क्षेत्रात पदाधिकारी, पुढारी होण्यासाठी त्यांना सुद्धा ग्रामपंचायत सदस्य यांना 10 वी पास, व इतर पदाधिकारी, पुढारी होण्यासाठी किमान शिक्षण ग्रॅज्युट झालेले असायलाच पाहिजे व यांना सुद्धा पात्रता परीक्षा असायला पाहिजे.  सध्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जि.परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, आमदार, खासदार, विधान परिषद सदस्य, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांना पुढारी होण्यासाठी पात्रता परीक्षा असणे काळाची गरज आहे, परंतु यांना मात्र परीक्षा नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. हे पदाधिकारी लायक आहेत की नाही हे परीक्षा घेतल्यानंतर दिसून येतील. यांच्यासाठी परीक्षा पेपर कसा असावा? ...

नातेपुते येथे अजूनही माणुसकी टिकून आहे याच ज्वलंत उदाहरण बेवारस मृतदेह विधिवत अंत्यविधी

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फलटण - पंढरपूर रोडच्या साईट पट्टीमध्ये नातेपुते बायपास येथे एक बेवारस इसम वय अंदाजे 55 ते 60 वर्ष मयत स्थितीत पडून असले बाबतची माहिती तक्रारदार नामे अर्जुन हरिबा पिसाळ वय 43 वर्ष,  राहणार जानकरवस्ती, नातेपुते याने पोलीस ठाणे येथे दिनांक 11/10/2025 रोजी हजर होऊन माहिती दिली की, दुपारी 02.00 वाजता फलटण-पंढरपूर, नातेपुते बायपास रोड एन एच ए 995  रस्त्याच्या साईड पट्टीतील चारीमध्ये शेती गट नंबर 259 मध्ये एक 55 ते 60 वर्षे वयाचा इसम अंगात फिकट काळसर शर्ट, फिकट निळसर फुल पॅन्ट, सडपातळ, सर्व त्वचा काळी निळी पडलेले असून मयत झालेला आहे. तसेच चार ते पाच दिवसांपूर्वी तो तेथील परिसरामध्ये वेडसर स्थितीत फिरताना दिसून आलेला असलेबाबत माहिती दिल्याने तक्रारी अन्वये अकस्मात मयताची नोंद करण्यात आलेली असून अकस्मात मैताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.पाटकुलकर नातेपुते पोलीस ठाणे हे करत आहेत.      घटनेची माहिती मिळता...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...

माळशिरस तालुक्यातील रोड रोमिओबाबत तालुक्यातील मुख्याध्यापकांची तात्काळ मीटिंग आयोजित करा: राजकुमार हिवरकर-पाटील

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र       माळशिरस तालुक्यामध्ये शिक्षण संस्थांचे फार मोठ्या प्रमाणात जाळ आहे , परंतु प्रत्येक मोठ्या गावातील शाळा किंवा त्या ठिकाणाहून वावरत असताना मोठ्या शहरांमध्ये येणाऱ्या मुलींना खेड्यातून शहरांमध्ये येणाऱ्या मुलींना रोड रोमिओचा त्रास , शाळेच्या बाहेर एसटी बस स्थानकावर एसटी स्टँड ते शाळा त्याचबरोबर शाळा सुटल्यानंतर घरापर्यंत पोहोचेपर्यंत काही रोडरोमिओ मोटरसायकल वरून कर्ण कर्कश आवाज करीत मुलींच्या मागेपुढे फिरताना दिसतात.             याबाबत राजकुमार हिवरकर-पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी व तात्कालीन डी.वाय.एस.पी मॅडम यांच्यासह माळशिरस तालुक्यातील चारीही पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी , निर्भया पथक यांच्यासह बैठकीच आयोजन करावे असे सांगितले.  नवदुर्गेच्या नवरात्राच्या महोत्सवादरम्यान आयोजन केले व नारीशक्ती सशक्त होण्यासाठी जिजाऊ सावित्री लेकीसाठी प्रशासन सक्षम आहे असे सांगितले. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्या गोष्टीला पाठीशी घातल जाणार नाही याची खबरदारी म्हणून बैठकीच आयोजन राजकुमार ह...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...