Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

प्रारूप विकास आराखडा संघर्ष समिती जनतेच्या हितासाठी उच्च न्यायालयात

उपसंपादक: वैभव आठवले (बहुजन भूषण वृत्तपत्र)       नातेपुते नगरपंचायत प्रारूप विकास आराखडा नगरपंचायतीने लागू केला त्यामुळे हजारो घरे, शेतीधारक, प्लॉटधारक, व्यापारी वर्ग, उमाजी नाईक नगर येथील औ‌द्योगिक वसाहत, कमर्शिअल प्लॉट, रिंग रोड, अंतर्गत मोठे केलेले रस्ते, पुणे-पंढरपूर रोड, दहिगाव रोड, पिरळे रोड, पालखी मैदान माऊली मंदिर रोड, विठ्ठल मंदिर रोड, दवाखाने बाधित झालेले आहेत. नातेपुते शहरात २६ ठिकाणी टाकलेली वेगवेगळी आरक्षणे या विरोधात संघर्ष समितीने २४/२/२०२५ रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको, गाव बंद आंदोलन केले होते.         नातेपुते नगरपंचायतीने टाकलेल्या आरक्षणाविरोधात आंदोलने झाली, वेळोवेळी निवेदनपण झाली परंतु नगरपंचायत नागरिकांप्रती सकारात्मक असल्याचे दिसून येत नाही म्हणून नातेपुते नगरपंचायत प्रारूप विकास आराखडा संघर्ष समितीने जनतेच्या हितासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला.      मुंबई हायकोर्टचे नामांकित विधीज्ञ, नातेपुते गावचे भूमिपुत्र अॅड. सतीशजी राऊत साहेब यांनी नातेपुते नगरपंचायत प्रारूप विकास आराखडा संघर्ष समितीच्या...

नातेपुते पोलिस ठाणेकडून रमजान सणानिमित्त मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन

      उपसंपादक : वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)      नातेपुते पोलीस ठाणे कडून शाही मज्जिद नातेपुते या ठिकाणी दिनांक 27/03/2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता मुस्लिम धर्मियांचे पवित्र रमजान सणानिमित्त नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील व परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.      सदर कार्यक्रमाकरिता नातेपुते शहर व  परिसरातील 150 ते 200 मुस्लिम बांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रमाकरिता नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे व पोकॉ, मदने बोराटे, आवळे, देशमुख व होमगार्ड गावडे, बंडलकर, काळे, रुपनवर, माने, मारकड उपस्थित होते. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी देखील उपस्थित होते.       सदर वेळी मुस्लिम धर्मियांना रमजान ईद व  गुढीपाडवा तसेच इतर सणानिमित्त हद्दीत कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. असे नातेपु...

नातेपुते पोलीस ठाणे येथे शांतता कमिटीची मिटिंग संपन्न

मा.महारुद्र परजणे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक नातेपुते पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण संपादक: अभिमन्यू आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)       आगामी येणारे श्रीराम नवमी, रमजान ईद, हनुमान जयंती, महात्मा फुले जयंती, गुढीपाडवा, संत झुलेलाल जयंती, भगवान महावीर जयंती, इत्यादी सणाच्या अनुषंगाने दि.२५/०३/२०२५ रोजी सायं ०५:३० ते ०६:३० वा.पर्यंत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत सर्व पोलीस पाटील व सर्व समाज बांधव यांच्या सण व उत्सवाच्या अनुषंगाने शांतता समितीची मीटिंग घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या.       सदर मिटींगमध्ये २२ पोलीस पाटील व ६० ते ७० पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. सदर मीटिंगमध्ये सर्व जयंती व उत्सव शांततेत पार पाडण्याबाबत आवाहन करण्यात आले तसेच सोशल मीडियावरून कोणी आक्षेपार वक्तव्य व फोटो प्रसारित करू नयेत याबाबतही मा.महारुद्र परजणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नातेपुते पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण यांच्यावतीने सूचना देण्यात आल्या. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री...

नातेपुते पोलीस स्टेशनने राबविलेले ना भविष्य ना भूतो असे विक्रमी रक्तदान शिबिर संपन्न

उपसंपादक वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र            नातेपुते पोलीस ठाणे येथे मा. पोलीस अधिक्षक सो अतुल कुलकर्णी सोलापुर ग्रामीण यांचे संकल्पनेतुन तसेच मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो प्रीतम यावलकर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे येथे दिनांक १८/०३/२०२५ रोजी सकाळी ०९ ते सायंकाळी ०७ वा चे दरम्यान महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीराकरीता ज्ञानदीप ब्लड बैंक नातेपुते यांचे वतीन पोलीस ठाणे येथे ५० कॉट व ५५ प्रशिक्षीत सुसज्य स्टाफ, डॉक्टर यांचे वतीने रक्तदान घेण्याबाबत नियोजन करण्यात आले होते.       सदर शिबीराकरीता प्रभारी अधिकारी सो महारूद्र परजने, पीएसआय डिगे साहेब व पीएसआय ओमासे साहेब, नातेपुते पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ, होमगार्ड व सर्व पोलीस पाटील यांनी अथक परिश्रम घेतल्याने सदर रक्तदान शिबीरात एकुन ९०३ रक्तदात्यांनी रक्तदान करत मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला आहे.      यामध्ये प्रमुख्याने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो अकलुज यांनी शिबीरास भेट दे...

रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संचलित रत्नत्रय प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन

     रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संचलित रत्नत्रय प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोरे हॉस्पिटल शेजारी घनवट बिल्डींग येथे सोमवार १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजून ३० मि. आयोजित करण्यात आल्याची माहिती स्कूलचे सभापती व व्यवस्थापक वैभव शहा यांनी माहिती दिली.      या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम डॉ.एम.पी.मोरे यांचे प्रमुख उपस्थित कर सल्लागार मयूर शहा व नातेपुते पोलीस स्टेशन सह. पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या शुभहस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. स्कूलचे चेअरमन प्रमोद दोशी, उपसभापती प्रितम दोशी, सदस्य विनय दोभाडा, अमित शहा, मुख्यध्यापिका माधवी रणदिवे व समस्त प्रशाला समिती यांनी पालक, शिक्षणप्रेमी नागरिका यांनी या बाल कलाकरांच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संस्थेचे वतीने २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष विविध उपक्रम राबवीत अनंत अमृत महोत्सव म्हणून साजरे करण्यात येत असून या वर्षात विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम संस्था साजरे करणार आहे. या वार्षिक स्नेह संमे...

नातेपुतेमध्ये प्रारूप विकास आराखड्याच्या विरोधात आंदोलन संपन्न

उपसंपादक: वैभव आठवले (बहुजन भूषण वृत्तपत्र) दि.२४-०२-२०२५ रोजी नातेपुते, ता.माळशिरस, जि. सोलापूर या ठिकाणी प्रारूप विकास आराखड्याविरोधात जनआंदोलन झाले. जनतेवर नातेपुते नगरपंचायतने लादलेला प्रारूप विकास आराखडया विरोधात जनतेतून तीव्र प्रक्रिया उमटल्या. नागरिकांच्या समस्या या आंदोलनातून स्पष्ट झाल्या. नातेपुते ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाल्यानंतर नातेपुते गावचा प्रारूप विकास आराखडा नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी, नगरसेवक यांनी तयार केला. जनतेला विश्वासात न घेता तयार केला असा जनतेने प्रश्न उपस्थित केला. यावेळी नातेपुते गावातील अनेक नागरिकांनी, तसेच महिलांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया मनोगतातुन व्यक्त केल्या.  यावेळी मा.आ.राम सातपुते यांनी उपस्थित राहून सांगितले की,, जनतेच्या घरावरून जे आरक्षण टाकलेले आहे ते होऊ देणार नाही, जनतेवर अन्याय होणार नाही असे सांगितले, मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगितले.   तसेच राजकुमार हिवरकर-पाटील यांनी पुढाकार घेऊन प्रारूप विकास आराखड्याच्या विरोधात आवाज...