मा.मुख्यमंत्री, (महाराष्ट्र राज्य ) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला लाभलेले माळशिरस तालुका अध्यक्ष मा.राजकुमार हिवरकर-पाटील म्हणजे जनतेचे तारणहार : मा.श्री.डॉ.अभिमन्यू आठवले
मा.श्री.राजकुमार हिवरकर-पाटील माळशिरस तालुका अध्यक्ष, शिवसेना (शिंदे गट) संपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिवसेना गटाला एक समाज भिमुख नेतृत्व मा.राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या रूपाने लाभले आहे. आरोग्य मंत्री मा.तानाजी सावंत महाराष्ट्र राज्य, मा.शिवाजी सावंत शिवसेना (शिंदे गट नेते) यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न, मागणीनुसार गाव पातळीवर विकासात्मक निधी, ५० हजाराच्या वर कुटुंबाना चणा डाळ वाटप, नातेपुते गावाच्या सर्वागीन विकासासाठी रस्ते व इतर कामासाठी भरीव निधी, जनतेसाठी नातेपुते रुग्णालय येथे ऍम्ब्युलन्स, सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सतत जनतेला भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासन दरभारी पाठपुरावा करीत आहेत. तसेच नातेपुते येथे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी १०० बेडचे सुसज्ज असे जनतेच्या हितासाठी उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत व मंजुरी साठी वेळ पैसे, मानसिक त्रास सहन करून मंत्रालय मुंबई येथे जाऊन पाठपुरावा करीत आहेत. मा.मुख्यमंत्री शिंदे गट यांना माळशिरस तालुका अध्यक्ष म्हणून म...