संपादक गेल्या वर्षभरापासून देशात कोरोना कोव्हिड - १९ या रोगामुळे देशात लॉकडाऊन केले गेले . संचारबंदी , जमावबंदी केली गेली परंतु याकडे जनतेने दुर्लक्ष केले . बेफिकीरपणा , अहंपणा जनतेचा दिसून आला . शासन वेळोवेळी नियमाचे पालन करा अशा सूचना देऊन सुद्धा जनता त्याचा विचार करत नाही . मास्क वापरणे , सॅनिटायझर चा वापर करणे , अंतर ठेवणे हे जनतेच्या हातातील उपाय आहेत त्या उपायाला जनता बगल देत आहे मग सरकारने काय करावे ? जनता जाणून बुजून शासनाच्या नियमाचे भंग करीत आहे त्यामुळे सरकारला लॉकडाऊन करणे भाग पडत आहे . लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे . प्रत्येक व्यक्तीने या कोरोना कोव्हिड - १९ या रोगाच्या अपत्य काळात स्वतःचे , कुटुंबाचे व इतरांचे संरक्षण केले पाहिजे . जनतेच्या वागण्यामुळे शासनाला लॉकडाऊन हा पर्याय निवडावा लागत आहे . देश २०१४ पासून बरबादीकडे गेला आहे . शेतकरी उध्वस्त झाला आहे , शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही , कंपन्या बंद पडल्या आहेत , युवकांच्या हाताला काम नाही , शिक्षणाच्या बारा वा...
साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्तपत्र प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, अन्याय-अत्याचार आवाज उठवणारे