संपादक केंद्र सरकारने भारत देशातील जनतेसाठी एक देश एक सिधापत्रिका हा निर्णय जनतेच्या हिताच्या दृष्ठीने अत्यंत महत्वपूर्ण व योग्य आहे या निर्णयाचे मी स्वागत करतो. या निर्णयामुळे देशाचे नागरिक रहिवासी व सुपुत्र म्हणून वावरतील व त्यांना देशातील राज्यात , जिल्ह्यात , तालुक्यात , गावात कोठेही रेशन दुकानातून त्या कुटुंबांना , त्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तु , अन्नधान्य मिळेल. त्यामुळे कोणीही वंचित व परका म्हणून त्या कुटुंबांना संभोधनार नाही त्यांचा तो हक्क व अधिकार राहणार आहे त्यासाठी त्वरित अंमलबजावणी केंद्र सरकारने अंमलबजावणीकरावी व तसे आदेश जलद गतीने सर्व राज्यातील जिल्हाधिकारी यांना द्यावेत. या निर्णयामुळे खर्या अर्थाने संविधानाने त्या कुटुंबाला न्याय दिला असे होईल. सध्याच्या काळात आम्ही गावचे रहिवासी हे परक्या गावचे हा जो भेदभाव मोठ्या प्रमाणात जास्त करून ग्रामीण भागात दिसतो त्यामुळे त्या कुटुंबाला अपमान सहन करावा लागतो. मान खाली घालावी लागते तसेच विविध शासनाच्या योजना त्या कुटुंबाला मिळू नयेत यासाठी ग्रामीण भागातील काही निवडक मंडळी दुजाभाव करतात. त्यामुळे केंद्र सर...
साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्तपत्र प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, अन्याय-अत्याचार आवाज उठवणारे