Skip to main content

Posts

Showing posts from February, 2025

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

नातेपुतेमध्ये प्रारूप विकास आराखड्याच्या विरोधात आंदोलन संपन्न

उपसंपादक: वैभव आठवले (बहुजन भूषण वृत्तपत्र) दि.२४-०२-२०२५ रोजी नातेपुते, ता.माळशिरस, जि. सोलापूर या ठिकाणी प्रारूप विकास आराखड्याविरोधात जनआंदोलन झाले. जनतेवर नातेपुते नगरपंचायतने लादलेला प्रारूप विकास आराखडया विरोधात जनतेतून तीव्र प्रक्रिया उमटल्या. नागरिकांच्या समस्या या आंदोलनातून स्पष्ट झाल्या. नातेपुते ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाल्यानंतर नातेपुते गावचा प्रारूप विकास आराखडा नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी, नगरसेवक यांनी तयार केला. जनतेला विश्वासात न घेता तयार केला असा जनतेने प्रश्न उपस्थित केला. यावेळी नातेपुते गावातील अनेक नागरिकांनी, तसेच महिलांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया मनोगतातुन व्यक्त केल्या.  यावेळी मा.आ.राम सातपुते यांनी उपस्थित राहून सांगितले की,, जनतेच्या घरावरून जे आरक्षण टाकलेले आहे ते होऊ देणार नाही, जनतेवर अन्याय होणार नाही असे सांगितले, मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगितले.   तसेच राजकुमार हिवरकर-पाटील यांनी पुढाकार घेऊन प्रारूप विकास आराखड्याच्या विरोधात आवाज...

नातेपुते नगरपंचायत प्रारूप विकास आराखडा संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन एक विश्लेषण

उपसंपादक : वैभव आठवले (बहुजन भूषण वृत्तपत्र)  सध्या नातेपुते गाव हे  मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जात असून महादेवाची नगरी आहे. या ठिकाणी महादेवाचे रेखीव दगडी हेमाड पणती बांधकाम केलेले मंदिर आहे. नातेपुते हे गाव सोलापूर-सातारा-पुणे या जिल्ह्याला जोडणारे असून सर्वधर्म-समभाव जपणारे गाव अशी ओळख आहे. नातेपुते हे गाव पहिले ग्रामपंचायत म्हणून ओळखले जात होते त्याचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले.  निवडणूका झाल्या, नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष झाले,   नगरपंचायतला मुख्याधिकारी मिळाले. त्यामुळे नातेपुते हे विकासाचे मॉडेल बनेल, दर्जेदार विकास होईल ही अपेक्षा शेती धारक, प्लॉट धारक, व्यापारी, ग्रामस्थ यांना होती परंतु या गावाला कोणाची दृष्ट लागली काय माहित. शासनाचे परिपत्रक प्रारूप विकास आराखडा करणेबाबत आले असता नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन प्रारूप विकास आराखडा बाबत चर्चा करून निर्णय घेणे योग्य होते परंतु तसे केले नाही.  नातेपुते गावाला रिंग रोडची गरज काय?, अनेक शेतकरी यांची शेती या प्...

नातेपुते नगरपंचायतीकडून नागरिकांचा विश्वास घात का? : राजकुमार हिवरकर-पाटील

  मा. श्री. राजकुमार हिवरकर-पाटील नातेपुते नगरपंचायतीने लागू केलेला शहर विकास आराखडा वादाच्या भोवऱ्यात असताना नगरपंचायतीकडून प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या अतिशय तीव्र स्वरूपात मांडल्या. मुख्याधिकारी खांडेकर साहेब यांनी प्रशासकीय भूमिका सांगितली असता त्यामध्ये त्यांनी सांगितल की, रस्त्यासाठी जे आरक्षण पडले त्यासाठी कोणतीही आर्थिक भरपाई मिळणार नाही. त्याचबरोबर जे भूखंड आरक्षित केलेले आहेत ते नगरपंचायतीने स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी करावयाचे आहेत.  नगरपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का? नागरिकांच्या हरकतीच्या अनुषंगाने नगरपंचायतीमध्ये ०३ जानेवारी २०२५ रोजी विषय क्रमांक ५ अन्वये आरक्षण रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. त्या ठरावामध्ये मुख्याधिकारी खांडेकर साहेब हे सांगतात की, हा ठराव बेकायदेशीर आहे, हा ठराव महाराष्ट्र न. प. अधिनियम १९६५ चे कलम ३०८ अन्वये रद्द होऊ शकतो तशी कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही.  हा ठराव करून प्रशासनाला काय सिद्ध करायच आहे? म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल की, घटनेत एखादे  कलम वाईट आहे, पण ते ज...

महिलेची फसवणूक करणाऱ्या चोरट्यास नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत दिनांक -11/02/2025 रोजी फिर्यादी नामे रेखा संतोष मोहिते वय 40 वर्ष, रा.नातेपुते यांनी पोलीस ठाणे येथे हजर राहून फिर्याद दिली की, फिर्यादी ह्या दुपारी 12.46 वाजता बँक ऑफ इंडिया शाखा नातेपुते मध्ये त्यांचे बचत खाते अकाउंट वरून 40,000/- रुपये काढून खुर्चीवर बसून मोजत असताना अनोळखी इसम वय अंदाजे 45 वर्ष हा फिर्यादीच्या जवळ येऊन माझ्याकडे फाटक्या नोटाचे बंडल आहेत असे म्हणून हातचलाकी करून  त्यांच्याकडील 40,000/- रुपये स्वतःच्या हातात घेऊन त्यामधील 13,500/- काढून घेऊन फसवणूक करून निघून गेला बाबत माहिती पोलीस स्टेशनला कळताच नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे, psi विक्रम दिघे, pn राकेश लोहार, यांनी बँकेतील सीसीटीव्ही प्राप्त फोटोचे व आरोपी MOB चे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी बाबत माहिती घेतली असता सदर आरोपी दहिवडीच्या सातारा दिशेने जात असल्याची माहिती मिळाली.       सदर बाबत तात्काळ दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे, पोलीस हवालदार महेंद्र खाडे, गणेश खाडे, सहद...

राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबीर संपन्न

उपसंपादक: वैभव आठवले (बहुजन भूषण वृत्तपत्र)      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रम संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत  'युथ फॉर माय भारत व डिजिटल साक्षरतेसाठी युवक' या उद्दिष्ट्य पूर्तीसाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट व मॅनेजमेंट कौन्सिलच्या सदस्या मा.पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील, मार्गदर्शक संचालक मा. डॅा. धवलसिंह मोहिते-पाटील साहेब, माजी प्राचार्य डॉ.सी. बी .कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोजे मोरोची येथे दि. ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी  या  सात दिवसीय शिबिर संपन्न झाले.        कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सुळ म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना हा महाविद्यालयातील उत्कृष्ठ उपक्रम आहे. गावाला स्वच्छतेची गरज हो...

परम भाग्यने परम पूज्य आचार्य अध्यात्म योगी राष्ट्रसंत १०८ श्री विशुद्ध सागरजी महाराज ससंघ २५ महाराज यांचे जाहीर प्रवचन

  उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)      आपल्या नातेपुते नगरीच्या परम भाग्यने परम पूज्य आचार्य अध्यात्म योगी राष्ट्रसंत १०८ श्री विशुद्ध सागरजी महाराज ससंघ २५ महाराज यांचे शनिवारी दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ सकाळी ८ वाजता मंगल प्रवेश नातेपुते नगरीमध्ये आगमण होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी आगमनात सहभागी व्हावे.      तसेच आपणा सर्वांच्या कल्याणासाठी जनकल्याण वाणी (रामकथा )जाहीर प्रवचन  दुपारी ठीक २ वाजता नातेपुते येथील  राजवैभव सांस्कृतीक भवन, डुडू कॉम्प्लेक्स नातेपुते  येथे होणार आहे. तरी ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात हजर राहण्याचे आवाहन केले आहे.      श्री १००८ चंद्रप्रभू जैन मंदिर ट्रस्ट व महावीर सेना नातेपुते यांनी माहिती दिली आहे, सर्वांनी याचा धर्मलाभ घ्यावा. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य टीप : जे द...

कै.समाजरत्न राजेंद्र (भाऊ) हणमंतराव पाटील म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व: मा.श्री.अभिमन्यू आठवले

  कै.समाजरत्न राजेंद्र (भाऊ) हणमंतराव पाटील उपसंपादक: वैभव आठवले बहुजन भूषण वृत्तपत्र      कै.समाजरत्न राजेंद्र (भाऊ) हणमंतराव पाटील, नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील नामवंत, गुणवंत, कीर्तिवंत, चारित्र्य संपन्न, आदरयुक्त, सामाजिक कार्यात सहभागी असणारे, मनमिळाऊ जिव्हाळा, आपुलकीचा झरा असे होते.      कुशल बागायत, जनावरे जपण्याचा छंद असे होते. त्यांनी नातेपुते गावचे पोलीस पाटील म्हणून सामाजिक सेवा समजून जबाबदारी घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली. भाऊ हे माणुसकीचे दर्शन होते. आदर्श नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. कधी अहंकार, गर्व, मीपणा बाळगला नाही, सर्व बहुजन समाजाचे दैवत होते.      मला भाऊंच्या सावलीत मनसोक्त विचार विनिमय करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन सुपुत्र मा.अतुल (बापु) राजेंद्र पाटील सध्या नातेपुते नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष म्हणून विराजमान आहेत.      भाऊ म्हणजे दिलेला शब्द पाळणारे होते त्यांना मी  जवळून पाहिले आहे. त्यांच्या विचारात प्रचंड गोडवा होता. भाऊंनी जीवनात...