मंत्रालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसील कार्यलयातील लोकशाही दिन म्हणजे “कागदी घोडे” नाचवले जातात ही चिंताजनक बाब
उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र लोकशाही दिन विभागीय आयुक्त मंत्रालय , जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात साजरा होत आहे पण यामधून जनतेने दिलेल्या अर्जाचे “ना निवारण ना न्याय” होत नाही. या लोकशाही दिनात दिलेल्या अर्जानुसार त्या अर्जदाराला न्याय दिला पाहिजे. त्याचे निवारण केले गेले पाहिजे किंवा अडचण असल्यास अधिकारी यांनी अर्जदाराला मार्गदर्शन केले पाहिजे. लोकशाही दिन हा न्याय दिन झाला पाहिजे परंतु लोकशाही दिन जनतेसाठी “शाप दिन” ठरत आहे. लोकशाही दिनातील अर्जदाराच्या अर्जाला केराची टोपली दाखवली जाते. लोकशाही दिनात ज्या अधिकारी कार्यालयात अर्जदार अर्ज देतो व न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवतो परंतु ज्या अर्जदाराचे अर्ज ज्या त्या विषयानुसार आले असतात त्यानुसार त्या त्या विभागाचे अधिकारी यांच्याकडे त्या अर्जदाराचे अर्ज पाठवून कागदी “घोडे” नाचवून बनवाबनवी केली जाते. लोकशाही दिनातून त्या अर्जदाराला न्यायच मिळाला पाहिजे हा न्यायदिन सांगतो. लोकशाही दिनातील अर्ज हा एक प्रकारचा तक्रार ( FIR) असतो. त्यानुसार त्याची दखल घेवून त्या अर्जदाराचे समाधान व न्याय मिळाला पाहिजे. लोकशाही द...