Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

जातिवादी यांना धडा शिकवण्यासाठी सर्व महाराष्ट्रातील दलित संघटनेने एकत्र येणे काळाची गरज तसेच माळेवाडी (बोरगाव) येथील मातंग समाजातील धनाजी साठे या मयत व्यक्तीच्या देहाची जातिवादी यांनी अवहेलना केली ही चीड आणणारी गंभीर बाब आहे त्याचा जाहीर निषेध

  संपादक           सध्याच्या काळात जातिवादी यांना माज चढला आहे. सध्या कुठे ना कुठे महाराष्ट्रात अनुसूचित जातीजमाती वरती अन्याय अत्याचार जातिवादी समाजकंटक करीत आहेत. त्यामध्ये जास्त करून ग्रामीण भागातील ज्या ग्रामपंचायत आहेत त्यामधील जे सरपंच , उपसरपंच , सदस्य आहेत तसेच इतर समाजकंटकाकडून मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती-जमाती वरती अन्याय-अत्याचार , मानहानी , अपमान , नाशवंत पाणी पिण्यास सांगणे , बेकायदेशीर जमिनी बळकावणे , भीक मागावयास लावणे , दृष्टहेतूने कारवाई करणे , चुकीची खोटी माहिती अधिकारी यांना देणे , दमदाटी करणे , विनयभंग करणे , लैंगिक छळ करणे , पाणी दूषित करणे , जबरदस्तीने घरजागा सोडावयास लावणे , गाव सोडावयास लावणे , अतिक्रमणे नियमित करण्यास ठराव न करणे , खून करणे , जाणूनबुजून घर पाडण्याबाबत नोटिसा काढणे , जाणूनबुजून अनुसूचीत जातीच्या कुटुंबाच्या घरापर्यंत रस्ता करणे व घर रस्त्यात बांधले म्हणून खोटा आरोप करणे , स्मशानात मयताचे   दहन करण्यास विरोध करणे , जातीवरून शिव्या देणे , सार्वजनिक ठिकाणी नाहक बदनामी क...

कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मा.श्री.मामासाहेब पांढरे युवकांसाठी बनले गळ्यातील ताईत

मा.श्री.मामासाहेब पांढरे  कृषि उत्पन्न बाजार समिति, उपसभापती  संपादक           नातेपुते येथील अत्यंत प्रत्यकुल परिस्थितीशी “झुंज” देत अडचण समजून नातेपुते येथील एका दुकानात कामगार म्हणून काम करीत होते. घरची वडीलोपार्जित तूटपुंजी शेती एखादे दुसरे दुबते जनावर या पासून निघणारे एक ते दोन लीटर दूध एखाद्या कुटुंबाला रतीबाने सायकल वरुन येवून पोहोचवत असत. कोणताही राजकीय वारसा नव्हता. मामांना मी अनेक वर्षापासून पाहत आलेलो आहे. मनमिळावू स्वभाव , कधी गर्व नाही , थोरमोठ्यांचा आशीर्वाद घेवून विश्वासाला कुठेही तडा न लागता कर्तव्यात कसूर न करता सर्वांना आदर भाव देवून आपले माणुसकीचे कर्तव्य जपत आहेत. मामासाहेब पांढरे लहान थोरांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून आपले कर्तव्य बजावतात. मामासाहेबांची राजकीय पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना येथून सुरुवात झाली त्यामुळे “मनसेने तारले , राष्ट्रवादीने हेरले आणि भाजपने स्वीकारले” असा मामासाहेबांचा राजकीय प्रवास सुरू झाला त्यानंतर एक एक पाऊल पुढे पडू लागले. नातेपुते ग्रामपंचायतचे सदस्य ...

शासनाच्या आदेशापुढे पोलिस बांधव हातबल, मनात वेदना होत असताना सुद्धा जनतेवरती कारवाई करण्यासाठी मन कठोर करावे लागते एक वेदनादायी बाब, केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांची भूमिका म्हणजे “भगदाड मोकळे आणि मोरीला गोळा”

संपादक           गेल्या दोन वर्षापासून कोरोना कोव्हिड-१९ या रोगाने हाहाकार माजवला आहे त्यामुळे शेतकरी , व्यापारी , कष्टकरी , छोटे भाजीपाला विक्रेते , फळे विक्रेते इ. असंख्य व्यवसायावर संकट आलेले आहे. शासनाचे आदेश जनतेच्या मुळावर उठले आहेत. जनतेला जगणे अवघड झाले आहे. देशातील जनता मरण यातना भोगत आहे. पोटभर अन्न मिळेना , बाहेर पडता येईना. नाव रोगाचे , आदेश शासनाचे जनतेवर कारवाई करण्यासाठी पोलिस बांधवाची जबाबदारी त्यामुळे पोलिस बांधवांना जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागते. पोलिस बांधव हे कोणाचेही दुश्मन नसतात शासनाच्या आदेशाला सामोरे जाऊन आपल्याच बांधवावरती कारवाई मनात नसताना करावी लागते हे पोलिस बांधवांना सुद्धा वेदना देणारे वाटते. पोलिस बांधवांचा ना इलाज असतो परंतु त्यातल्या त्यात पोलिस बांधवांनी न कळत जनतेचा विचार केला तर त्याचे त्यांना सुद्धा समाधान मिळेल. कर्तव्य जपा पण माणुसकीही जपा असे पोलिस बांधवाचे असले पाहिजे. या दोन वर्षात कोरोना कोव्हिड-१९ या रोगामुळे जनता पुर्णपणे होरपळून निघाली आहे. या काळात राज्यकर्ते जोमात आणि जनता कोमात गे...

युवकांनी शासनकर्ते, राज्यकर्ते बनले पाहिजे ही काळाची गरज आहे

संपादक           सध्या महाराष्ट्रात राजकारण हे घराणेशाही परंपरेने चालत आहे त्यामुळे शिकले , सवरलेले युवक शासनकर्ते , राज्यकर्ते बनण्यापासून वंचित राहत आहेत. परंपरेने आपल्याच घराणेशाहीची वाटचाल असली पाहिजे मग ती ग्रामपंचायत असो , नगरपंचायत असो , नगारपरिषद असो , नगरपालिका असो , अथवा आमदार , खासदार , विधान परिषद आमदार , पंचायत समिति , जिल्हा परिषद इ. वर घराणेशाहीचे वर्चस्व असावे असा हेतु असतो. घराणेशाहीने पदे भोगत राहायची आणि कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंज्या उचलत राहायचे हेच पहायला मिळत आहे. “घराणेशाही ही ढेकुणाचे वंशावळ” आहे. स्वत: चा स्वार्थ साधण्यासाठी दुसर्‍याचे शोषण करीत राहायचे. युवकांचा उपयोग फक्त मतदानासाठी करून घ्यायचा , मत आपणच टाकायची आणि गुलाल , हारतुरे घालून सत्कार आपणच करायचा हेच चाललेले आहे. घराणेशाहीला निष्ठावान कार्यकर्ते असताना सुद्धा त्यांचा विचार हा युवक शासनकर्ता , राज्यकर्ता बनला पाहिजे ही मानसिकता दिसून येत नाही. मतदारांनी सुद्धा यापुढे घराणेशाहीची चालत आलेली परंपरा मोडीत काढून अभ्यासू विचारवंत , यांनी ए...

मा.श्री.शहाजीराव मुधोजीराव तथा बाबाराजे (दादा) देशमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सोलापूर यांच्या वाढदिवसानिमित्त नातेपुते येथे बैठक संपन्न

मा.श्री.शहाजीराव मुधोजीराव तथा बाबाराजे (दादा) देशमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सोलापूर बैठकीवेळी असणारा उपस्थित युवक वर्ग  संपादक            नातेपुते येथे SND इंटरनॅशनल स्कूल येथे दि.१०/०८/२०२१ रोजी मा.आबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक होऊन मा.श्री.शहाजीराव मुधोजीराव तथा बाबाराजे (दादा) देशमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोलापूर यांचा १४ ऑगस्ट रोजी ६१ वा वाढदिवस असून त्या निमित्ताने गरजू व गरीब अशा व्यक्तींना लस मिळाली नाही अशा ५०० व्यक्तींना लस देवून हा सामाजिक उपक्रम पार पडणार आहे. एका डोस ची किंमत रु ७०० रु असून लसीचा पहिला डोस वाढदिवसानिमित्त देण्यात येणार आहे हा सामाजिक उपक्रम दाते प्रशाला , नातेपुते येथे १० ते ०३ या वेळेत होणार आहे. लसीकरणासाठी वयोमार्यादा १८ वर्षे ते ६० वर्षे अशी राहणार आहे. लस देताना पुरुष व महिला यांना स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था केलेली आहे. लसीकरणासाठी नाव देण्यासाठी मोबाइल नं. ७९७२००९०९० प्रवीण राऊत व ९३०७६८१०९६ संदीप ननवरे यांच्याकडे नाव नोंदणीसाठी संपर्क करावा असे आबासाहेब देशमुख यांनी सांगितले. ...

नातेपुते नगरपंचायत जाहीर झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण, फटाक्याची आतिषबाजी करून केला जल्लोष

संपादक           नातेपुते ता.माळशिरस येथील ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले. यासाठी नातेपुते येथील नगरपंचायत होण्यासाठी ठराव करण्यासाठी यापूर्वी प्रथम आवाज उद्योगपती मा.सुधीरजी काळे साहेब यांनी गेल्या ५ वर्षामध्ये उठविला होता त्यामध्ये प्रचंड प्रमाणात आवाज उठवला ते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह (दादा) मोहिते-पाटील व त्यांचा परिवार अकलूज , माळेवाडी , नातेपुते येथील नेते मंडळी यांनी उपविभागीय(प्रांत) कार्यालय अकलुज येथे ४३ दिवसाचे साखळी उपोषण सुरू होते अकलुज माळेवाडी नगर परिषद अ व नातेपुते नगरपंचायत स्थापन करण्यास कारण ठरले त्यामुळे अधिसूचना राज्य सरकारचे सचिव मा.सतीश मोघे साहेब यांनी राज्यापालाच्या सहीणीशी काढले. अकलुज , माळेवाडी नगरपरिषद अ व नातेपुते नातेपुते नगरपंचायत होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळी व सामाजिक संघटनेचे नेते मंडळी व कार्यकर्ते यांनी आवाज उठविला त्यामुळे आजच्या दिवसाचे स्वप्न साकार झाले. हा दिवस स्थापना दिन म्हणून यापुढे राहील. अकलुज माळेवाडी नगरपरिषद अ व नातेपुते नगरपंचायत जाहीर झाल्याचे आदेश निघाल्याच...

पोलिस खात्याची नौकरी म्हणजे पगार सोडून व्यवसायधारकाकडून जबरदस्तीने फुकटात जगणे, पुण्यातील क्लिप वरून पोलिस अधिकारी यांची फुकटेगिरीची चिंताजनकबाब उजेडात, पोलिस खात्याला काळिमा

संपादक           पुण्यातील पोलिस अधिकारी यांची “बिर्याणी” खाण्याची फुकटीगिरीची क्लिप प्रचंड प्रसिद्धी आलेली आहे. अधिकारी यांना प्रचंड पगार असताना फुकटात जबरदस्तीने व्यवसायधारकांना वेठीस धरून खाणे , पिणे , पैशाची मागणी करणे असे समजते परंतु या पुण्यातील पोलिस अधिकारी यांच्या “बिर्याणी” ते ही फुकटात ते ही चांगल्या दर्जाची , जिभेला चव देणारी , आत्मा थंड करणारी अशी बिर्याणी पोलिस अधिकारी यांनी मागितली. जे पोलिस ठाणे व त्यांच्या हद्दीतील व्यवसायधारकांना पोलिस खाते अधिकारी , कर्मचारी यांची फुकटात मिळेल ते घ्यायचे असेच पोलिस खात्याचे उद्दीष्ट आहे काय ? असे संपादक म्हणून वाटते. पोलिसांची नोकरी म्हणजे पगार सोडून व्यवसायधारकांकडून जबरदस्तीने हव्या त्या वस्तु घेवून जाणे , फुकटात जेवण मिळवणे आहे काय ? पुण्यातील अधिकारी यांचा "बिर्याणी" खाण्याचा मोह सध्या गाजत आहे. सध्या धाबेवाले , हॉटेलवाले , कोणतेही व्यवसायधारक पोलिस खात्याचे “गुलाम” झाले आहेत असे वाटते. पोलिस खात्याची जबरदस्ती यामुळे व्यवसायधारक यांना तोटा सहन करून अधिकारी , कर्मचारी यांचा ...