संपादक गेल्या वर्षभरापासून जगाला कोरोना कोव्हिड - १९ या रोगाने " सळो की पळो " करून सोडले आहे . कोरोना या रोगाची आपत्ती डॉक्टरांसाठी " वरदान " ठरत आहे . या रोगामुळे डॉक्टर मालामाल होत आहेत . यामध्ये जगण्यासाठी कोरोना या रुग्णाची धडपड चालू आहे तर पैसे कमवण्यासाठी डॉक्टरांची धडपड चालू आहे . मला प्रश्न पडतो की , कोरोना या रोगावरती औषध , गोळ्या , इंजेकशन इ . नाहीत . ज्या डॉक्टरांकडे कोरोना झालेल्या व्यक्ती उपचारासाठी दाखल होतात त्यांना डॉक्टर कसे काय उपचार करतात ? डॉक्टरांकडे कोरोना पेशंट बरे करण्यासाठी कोणते औषध उपलब्ध आहे जेणेकरून डॉक्टर कोरोना झालेल्या व्यक्तीवरती उपचार करतात . एकतर सरकारकडे REMDESIVIR या इंजेकशनाशिवाय दुसरे औषध नाही . मग डॉक्टर कोरोना रुग्णावर कोणत्या औषधाचा उपचार करतात . आज कोरोना झालेल्या व्यक्ती मिळालेले जीवन जगता यावे , मरण येता कामा नये म्हणून घर , जमीन , सोने , चांदी , जनावरे विकून वेळप्रसंगी सावकाराचे व्याजाने पैसे काढून डॉक्टरांची पेमेंट...
साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्तपत्र प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, अन्याय-अत्याचार आवाज उठवणारे