Skip to main content

Posts

Showing posts from January, 2021

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

महाराष्ट्रातील मोजक्याच जातीतील व्यक्तींना पुढार्‍याकडून लोकसेवक बनण्याची संधी इतर जातींना कधी न्याय मिळणार?

संपादक        आजच्या घडीला महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत , पंचायत समिति , जिल्हा परिषद , आमदार , खासदार , विधान परिषद इ. मध्ये केवळ मोजक्याच जातीतील व्यक्तींना लोकसेवक बनविण्याची पुढार्‍याची भूमिका असते. त्यामध्ये गाव पातळीवर मराठा , महार , मातंग , मुसलमान , घोंगडी धनगर , मेंडकी धनगर इ. समावेश असतो. तर वेळ पडल्यास इतर एखाद्या दुसर्‍या जातीचा विचार केला जातो तो म्हणजे ब्राह्मण , वाणी , जैन , बागवान या पलीकडे इतर जातीचा विचार गाव पातळीवर पुढारी करीत नाहीत हे मी संपादक म्हणून पाहत आहे. त्यामध्ये कोल्हाटी , वडर , लोहार , साळी , गडसी , परीट , कोळी इ. या समाजातील व्यक्तींना न्याय दिलेला दिसत नाही. तसेच अनुसूचीतील ५९ जाती , अनुसूचीत जमाती ४७ जाती , इतर मागासवर्ग , ओबीसी ३४६ जाती , विशेष मागास वर्ग एसबीसी ७ जाती , विभक्त जाती (अ) व्हीजे (ए) १४ जाती , भटक्या जाती (ब) ३७ जाती , भटक्या जाती (क) एनटी (सी) , भटक्या जाती (ड) एनटी (डी) , तसेच सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एसईबीसी अशा प्रवर्गातील मोजक्या जातींना पुढार्‍यांची पसं...

वाखरी ग्रामपंचायत वार्ड क्र. ५ मधून मा. श्री. संग्राम ज्ञानेश्वर गायकवाड यांचा दणदणीत विजय

प्रतिनिधी (पंढरपूर)        वाखरी ता.पंढरपूर , जि.सोलापूर या गावची निवडणूक होऊन वाखरी गावचे आदर्श सामाजिक कार्यकर्ते जनतेला मान सन्मान देणारे , आदर देणारे , जनतेच्या हाकेला धावून येणारे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मा.संग्राम ज्ञानेश्वर गायकवाड यांना जनतेने मत देवून पुन्हा ग्रामपंचायतमध्ये पाठविले आहे. मागील पंचवार्षिकमध्येही ते ग्रामपंचायतमध्ये सदस्य होते. जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी , गावाचा विकास करण्यासाठी , त्यांची कामगिरी जनतेला पसंद पडल्यामुळे व त्यांच्यावरती विश्वाश असल्यामुळे वाखरीतील वार्ड क्र.५   मधील मतदारांनी आपले पवित्र मत देवून मतदारांनी निवडून आणले आहे. संग्राम ज्ञानेश्वर गायकवाड म्हणजे गोरगरीब जनतेसाठी झटणारे आदर्श कार्यकर्ते आहेत. संग्राम गायकवाड यांना अनेकांनी विरोध दर्शिवला होता. ते कसे पराभूत होतात हेच लक्ष होते परंतु जनतेसाठी जो झटतो त्याला जनता कधीच विसरू शकत नसते. सर्व गुण संपन्न लोकप्रिय असलेले संग्रामजी गायकवाड यांची ग्रामपंचायतमध्ये पुन्हा प्रवेश झाल्यामुळे विरोधकांची झोप उडाली आहे. संग्राम गायकवाड यांनी ज्ञानेश्वर फा...

साप्ताहिक बहुजन भूषणचा अंदाज खरा ठरला

संपादक           दिनांक ३१/१२/२०२० च्या पूर्व संधेला   व नूतन वर्षाच्या सुरूवातीला काढलेल्या   साप्ताहिक बहुजन भूषण अंकामधून ‘ देशमुख-पाटील युतीमुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण ’ अशी बातमी प्रसिद्धी केली होती व त्या बातमीमध्ये देशमुख-पाटील युतीचे वर्चस्व होणार हा संपादकाच्या दूरदृष्टीतिल अंदाज खरा ठरला असून नातेपुते ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्या निवडणुकीत युतीचे ७ सदस्य बिनविरोधी झाले व १० जागेसाठी निवडणूक लागली त्यामध्ये “जनशक्ती विकास आघाडीचे” सर्व उमेदवार निवडून आले. विरोधकांना मतदारांनी जोर का झटका दिला व सर्व सुशिक्षित उमेदवार नातेपुते ग्रामपंचायतमध्ये गेल्यामुळे जनतेचा व गावाचा सर्वांगिनी विकास होईल असे जनतेतून बोलले जात आहे. नातेपुते ग्रामपंचायतमध्ये निवडून गेलेल्या सर्व वार्डातील नूतन सदस्याचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा...!   जनहितार्थ अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक  :  मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्...

कै.सुरेश (दादा) ठोंबरे युवा मंचाचे संस्थापक नूतन नातेपुते ग्रामपंचायतचे सदस्य मा.श्री.संदिप (दादा) ठोंबरे जनतेसाठी आशेचे किरण

मा.श्री.संदिप (दादा) ठोंबरे नूतन ग्रामपंचायत सदस्य, नातेपुते   संपादक  संदिप (दादा) ठोंबरे हे लहान थोरांचे आशास्थान झाले आहेत . प्रत्येक व्यक्ति तो लहान असेल मोठा असेल त्यांना आदर देणे , मान सन्मान देणे ही संदिपदादांची भूमिका असते. दादांना माणसांची “पारख” आहे. दादासाहेब आपल्याकडे आलेल्या व्यक्तीची गरीबी की श्रीमंती पाहत नाहीत. तो गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला तेवढाच मान देतात. वडील चंद्रकांत (तात्या) ठोंबरे , कै.सुरेश (दादा) ठोंबरे यांच्याकडून सामाजिक व राजकीय धडे मिळाले आहेत त्यामुळे सर्व समाजातील लहान , महान व्यक्ति दादांकडे एक चांगला आदर्श कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. दादांचा स्वभाव अतिशय मनमिळावू असून कधीही कोणावरती रागावले असे पाहिले नाही. सर्वांच्या सुखा-दु:खात सामील असतात. सध्या नातेपुते ग्रामपंचायत मध्ये नूतन सदस्य म्हणून प्रवेश झाला आहे त्यामुळे खूप मोठी जबाबदारी आली आहे. केवळ आपल्या वार्डापुरता विचार न करता नातेपुते गावातील भेडसावणार्‍या अडी-अडचणी , गावाचा , गावातील जनतेचा रखडलेला विकास याकडे दादासाहेब लक्ष देवून विकास करतील. वंचितांना न्य...

बिनविरोधी निवडणुका म्हणजे जनतेच्या पवित्र मतावर "आघात"

संपादक सध्या ग्रामपंचायतच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागल्या असून असंख्य गाव पातळीवर बिनविरोधी सदस्य निवडले आहेत. तर काही ग्रामपंचायती बिनविरोधी झाल्या आहेत पण हे लोकशाहीसाठी “घातक” आहे , हा लोकशाहीचा “खून” आहे , लोकशाहीसाठी “शाप” आहे. जनतेला संविधानाने दिलेले मत न टाकता बिनविरोधी सदस्य निवडले ते योग्य नाही केवळ मतलबी पुढार्‍यांनी एकत्र येऊन आपआपल्या सोयीनुसार उमेदवार द्यायचा आणि बिनविरोधी पुढार्‍यांनी ना वार्डातील जनतेने , ना गावातील जनतेने हजर रहायचे , फक्त पुढार्‍यांनी संघमताने गावाची ना वार्डाची मीटिंग न घेता उमेदवार बिनविरोधी करतात ही पद्धत लोकशाहीसाठी घातक व चीड आणणारी , चिंता करणारी अशी आहे. बिनविरोधी सदस्य निवडताना त्या सदस्याची सामाजिक कामगिरी काय ? तो वार्डात किंवा गावात सर्वधर्म समभाव वागतो का ? मिसळतो का ? तो अवैद्य धंदे करणारा आहे का ? त्याची पात्रता काय ? वार्डातील जनता तसेच गावातील जनतेला तो मान्य आहे का ? तो वार्डातील व   जनतेची व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झटेल का ? स्वच्छ प्रतिमेचा आहे का ? तो घमेंडीत वागतो का ? इ. प्रश्नासाठी तो यश...

०६ जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती “पत्रकार दिन” म्हणून साजरी होत आहे.

  मराठी वृत्तपत्रसृष्ठीचे जनक 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर  संपादक           ०६ जानेवारी “पत्रकार दिन”. बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरा होत असतो. त्यानिमित्ताने सर्व न्यूज चॅनेलचे , दैनिकाचे , साप्ताहिक , मासिक , पाक्षिक , वार्षिक चे सर्व वृत्तपत्राचे सर्व संपादक , पत्रकार , वार्ताहार , छायाचित्रकार व सर्व भारतीय बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...! शुभेच्छुक   संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण , साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार    

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच ०३ जानेवारी “महिला शिक्षण” दिनानिमित्त श्री गणेश प्रतिष्ठान यांच्या वतीने महिला शिक्षिकांचा सन्मान

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना मान्यवर  संपादक           महाराष्ट्रात माता-भगिनींना शिक्षणाची दारे मोकळी करून देणार्‍या भारतातील पहिल्या शिक्षिका , मुख्याध्यापिका , स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या , विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणार्‍या “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले” यांच्या जयंतीनिमित्त तसेच यावर्षीपासून ०३ जानेवारी हा दिवस “महिला शिक्षण दिन” म्हणून साजरा होत आहे यानिमित्ताने श्री गणेश प्रतिष्ठान यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून महिला शिक्षिका यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ.बा.ज.दाते प्रशाला नातेपुते , अक्षय शिक्षण संस्था , चंद्रप्रभू इंग्लिश मिडियम स्कूल , श्रीमती रत्नाप्रभादेवी कन्या प्रशाला , अंगणवाडी (ग्रामपंचायत जवळ) इ. विविध शाळेत जाऊन महिला शिक्षिकांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी श्री गणेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर अटक , राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रियाज शेख , किरण घ...