Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

मांडवे येथे गरोदर माता आरोग्य शिबिर सप्ताहाची मा. श्री. राजकुमार हिवरकर-पाटील (शिवसेना शिंदेगट माळशिरस तालुकाध्यक्ष) यांच्या उपस्थितीत सांगता

  उपसंपादक : वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र           मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब, संपर्क नेते संजय जी माशेलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्यावतीने आयोजित गरोदर मातांना डोहाळ जेवण तसेच आरोग्य तपासणी शिबिराची सांगता मांडवे येथे करण्यात आली. दहिगाव जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील, डॉक्टर एम.पी.मोरे, डॉक्टर रामचंद्र मोहिते यांची होती.           राजकुमार हिवरकर-पाटील यावेळी म्हणाले, आरोग्याची सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहोत. गरोदर मातांना डोहाळ जेवण व त्यांच्या आरोग्याची तपासणी शिबिर सप्ताहाचा प्रारंभ फोंडशिरस येथे करून सांगता मांडवे येथे करण्यात येत आहे. गरोदर मातांचा सन्मान, त्यांना लागणारा पोषक आहार, गर्भसंस्कार व संस्कृती रुजविण्यासाठी शिबिर सप्ताहाचे आयोजन केले असल्याचे सांगून शासनाच्या सर्व...

चांगले गर्भसंस्कार व संस्कृती रुजविण्यासाठी डोहाळ जेवणाचे आयोजन - राजकुमार हिवरकर-पाटील (शिवसेना प्रमुख शिंदे गट माळशिरस तालुका अध्यक्ष)

     उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) गरोदर मातांचा सन्मान, त्यांना गर्भावस्थेत लागणाऱ्या पोषण आहाराचे मार्गदर्शन, चांगले गर्भसंस्कार व संस्कृती रुजविण्यासाठी डोहाळ जेवण व आरोग्य तपासणीचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन माळशिरस तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मोरोची ता.माळशिरस येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरात गरोदर मातांसाठी आयोजित डोहाळ जेवण व आरोग्य तपासणी शिबिरात व्यक्त केले.      पुढे बोलताना हिवरकर-पाटील म्हणाले, आत्तापर्यंत आरोग्याबाबतची १५० शिबीरे घेण्यात आली. सरकारच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याची मोफत सुविधा पोहोचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहे. सरकारने आरोग्याच्या सेवा मोफत करून कुटुंबाला येणाऱ्या आरोग्याच्या खर्चाची चिंता दूर केली आहे. गरोदर मातांनी पोषक आहार घेऊन सुदृढ बनून सुदृढ बालकांना जन्माला घालावे. संस्कार व संस्कृतीने छत्रपती शिवाजी, जिजाऊ, सावित्री यांच्या विचारांची पिढी निर्माण...

घरी मुलगा जन्माला आला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असला पाहिजे आणि मुलगी जन्माला आली तर ती झाशीच्या राणीसारखी झाली पाहिजे- मा.राजकुमार हिवरकर-पाटील (शिवसेना शिंदे गट माळशिरस तालुकाप्रमुख)

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)      तुमच्या घरी मुलगा जन्माला आला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असला पाहिजे आणि मुलगी जन्माला आली तर ती झाशीच्या राणीसारखी झाली पाहिजे आणि हे सर्व घडविण्याचे त्या मुलामुलींच्या कर्तबगार आईच्या हातात असते असे विचार राजकुमार हिवरकर-पाटील तालुकाप्रमुख शिवसेना माळशिरस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडशिरस या ठिकाणी मांडले.      महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुकात शिवसेनेच्या वतीने आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब व जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये गरोदर मातांसाठी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम त्याचबरोबर स्तनदा माता तपासणी, रक्तगट तपासणी, बीपी तपासणी,शुगर तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासण्याचे शिबिर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहे...

मामाश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., नातेपुते या पतसंस्थेचा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ होणार संपन्न

उपसंपादक वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ०५:१५ वा. मामाश्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व आमदार विधान परिषद मा.श्री.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तसेच या कार्यक्रमप्रसंगी आमदार मा.श्री.रामभाऊ सातपुते, जिल्हा संघटन सरचिटणीस सोलापूर भाजपा मा.श्री.धर्यशीलभैय्या मोहिते-पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार विधान परिषद मा.श्री.रामहरी रुपनवर, मा.उपाध्यक्ष जि.प. सोलापूर मा.श्री.बाबाराजे देशमुख, माजी पोलीस पाटील नातेपुते समाजरत्न मा.श्री.राजेंद्रभाऊ पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत अकलूज मा.श्री.शिवतेजसिंह मोहिते-पाटील, मा.उपसभापती मा.श्री.अर्जुनसिंह मोहिते-पाटील, चेअरमन अहिल्यादेवी पतसंस्था मा.श्री.रघुनाथ (आण्णा) कवितके, नगराध्यक्ष नातेपुते नगरपंचायत मा.सौ.अनिता नंदू लांडगे, उपनगराध्यक्ष नातेपुते नगरपंचायत मा.श्री.मालोजीराजे देशमुख, नगरसे...

स.म.शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय नातेपुते येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जयंती साजरी

  स.म.शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जयंती साजरी करताना मान्यवर उपसंपादक वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषणव वृत्तपत्र स.म.शंकरराव मोहिते-पाटील यांची १०५ वी जयंती स.म. शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय, नातेपुते येथे साजरी करण्यात आली. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व लोकनेते कै.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जयंतीनिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, जयंतीनिमित्त आलेल्या पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुनिल राऊत, श्रीकांत बाविसकर, अभिमन्यु आठवले, समिर सोरटे, सुनिल ढोबळे, सुनिल गजाकस या पत्रकारांचा हार,पेन,वही व गुलाब पुष्प देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रस्ताविक नलवडे सर यांनी केले.  तसेच गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख म्हणाले की, सहकार महर्षींनी सर्वांगीनी महाराष्ट्राच स्वप्न पाहील होत. त्यादुष्टीने त्यांनी माळशिरस तालुक्याचा विकास केला. समाजातील बारिक-सारीक गोष्टी टिपण्याचे काम पत्रकार करीत असतात. विद्यार्थ्यांनी...

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा शिव विचार दहिगावात: माळशिरस तालुका प्रमुख (शिंदे गट) मा.राजकुमार हिवरकर-पाटील

          उपसंपादक वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र         राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे अवचित्य साधून माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीने दहिगाव येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर-पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचे शिवसेनेचे नेते तथा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब व राज्य सचिव संजयजी माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची सामाजिक कार्याची घोड दोड सुरू आहे. आज राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दहिगाव गावात शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले हा योगायोग आहे.  हिंदुहृदय सम्राट यांनी ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या पद्धतीची शिवसेनेची कार्यपद्धती निर्माण केली.  राष्ट्रमाता जिजाऊंनी तर आपला एक मुलगा युद्धात कटकारस्थानी मृत्यू पावला तरी सुद्धा हिंदवी स्वराज्याची स्थापन करण्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्मिती करण्यासाठी दुसरा मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्याचं काम केल. आत्ताच्या माता अस म्हणता...

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्ताने महिला वर्गासाठी शिवसेना (शिंदे गट) माळशिरस तालुका अध्यक्ष मा.श्री.राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या वतीने अनोखी खास भेट

  राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्ताने महिला वर्गासाठी शिवसेना (शिंदे गट) माळशिरस तालुका अध्यक्ष मा.श्री.राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या वतीने हरभरा डाळ व गव्हाचा आटा वाटप करताना उपसंपादक वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब, सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते तथा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब, शिवसेना सचिव संजयजी माशेलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून मकर संक्रांतीच्या सणासाठी महिलांसाठी भेट म्हणून ६० रुपये प्रति किलो हरभरा डाळ व २७ रुपये ५० पैसे प्रति किलो गव्हाचा आटा माता-भगिनींसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. दीपावलीच्या सणानिमित्त शिवसेनेच्या वतीने अशीच हरभरा डाळ उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास ९९००० माता-भगिनींना माळशिरस तालुक्यातील लाभ झाला. महाराष्ट्र सरकारच्यावतीने सुद्धा आनंदाचा शिधा मिळणार आहे. सामाजि...