उपसंपादक : वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब, संपर्क नेते संजय जी माशेलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्यावतीने आयोजित गरोदर मातांना डोहाळ जेवण तसेच आरोग्य तपासणी शिबिराची सांगता मांडवे येथे करण्यात आली. दहिगाव जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील, डॉक्टर एम.पी.मोरे, डॉक्टर रामचंद्र मोहिते यांची होती.
राजकुमार हिवरकर-पाटील यावेळी म्हणाले, आरोग्याची सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहोत. गरोदर मातांना डोहाळ जेवण व त्यांच्या आरोग्याची तपासणी शिबिर सप्ताहाचा प्रारंभ फोंडशिरस येथे करून सांगता मांडवे येथे करण्यात येत आहे. गरोदर मातांचा सन्मान, त्यांना लागणारा पोषक आहार, गर्भसंस्कार व संस्कृती रुजविण्यासाठी शिबिर सप्ताहाचे आयोजन केले असल्याचे सांगून शासनाच्या सर्व मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
ऋतुजा मोरे यावेळी म्हणाल्या, गरोदर मातांना सरकारकडून सर्व काही आरोग्याची सेवा मोफत दिली जात आहे. स्वतःसाठी गरोदर मातांनी योग्य आहार घ्या म्हणजे सुदृढ बाळाला जन्माला घालाल. प्रसूती देखील आयुष्यमान आरोग्य मंदिरातच करून शासनाच्या सेवेचा लाभ घेण्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.पी.वरपे यांनी केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील, डॉ.एम.पी.मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते, दहिगाव जि.प.सदस्य ऋतुजा मोरे, डॉ.सुचिता सावंत, डॉ.किशोरी गायकवाड, तालुका उपप्रमुख प्रमोद चिकणे, नातेपुते शहरप्रमुख पोपटराव शिंदे, डॉ.सोनम दोशी, आरोग्य सहा.धाईंजे, आरोग्य सहायिका पाटील, खाडे आदीसह गरोदर माता, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.