उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)
गरोदर मातांचा सन्मान, त्यांना गर्भावस्थेत लागणाऱ्या पोषण आहाराचे मार्गदर्शन, चांगले गर्भसंस्कार व संस्कृती रुजविण्यासाठी डोहाळ जेवण व आरोग्य तपासणीचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन माळशिरस तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मोरोची ता.माळशिरस येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरात गरोदर मातांसाठी आयोजित डोहाळ जेवण व आरोग्य तपासणी शिबिरात व्यक्त केले.
पुढे बोलताना हिवरकर-पाटील म्हणाले, आत्तापर्यंत आरोग्याबाबतची १५० शिबीरे घेण्यात आली. सरकारच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याची मोफत सुविधा पोहोचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहे. सरकारने आरोग्याच्या सेवा मोफत करून कुटुंबाला येणाऱ्या आरोग्याच्या खर्चाची चिंता दूर केली आहे. गरोदर मातांनी पोषक आहार घेऊन सुदृढ बनून सुदृढ बालकांना जन्माला घालावे. संस्कार व संस्कृतीने छत्रपती शिवाजी, जिजाऊ, सावित्री यांच्या विचारांची पिढी निर्माण करावी. सर्वांनी आरोग्याच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करून सर्वांच्या सहकार्याने असलेल्या उणिवा दूर करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचा प्रारंभ दहिगाव जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी ऋतुजा मोरे, डॉ.एम.पी.मोरे, दहिगाव सरपंच सोनम खिलारे, डॉ.शिवानी लाड यांनी मनोगत व्यक्त केले. आरोग्य सेविका मनीषा जाधव यांनी गरोदर मातांसाठी लसीकरण, रक्तदाब, प्रसुतीपूर्व अथवा प्रसूतीनंतर, मातृत्व वंदन योजनायाबाबतची माहिती दिली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील, डॉ.एम.पी.मोरे, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ रामचंद्र मोहिते, दहिगाव जि.प.सदस्य ऋतुजा मोरे, दहिगाव सरपंच सोनम खिलारे, मोरोची सरपंच छाया झेंडे, डॉ.सोनाली परतवार, डॉ शिवानी लाड, तालुका उपप्रमुख प्रमोद चिकणे, नातेपुते शहरप्रमुख पोपटराव शिंदे, भाजपा प्रसिद्धीप्रमुख सुनील बनकर, विजय सरवदे, कामगार संघटनेचे माऊली देशमुख, आरोग्य सेविका मनीषा जाधव, दादा केंगार, मसुगडे, कोळपे, सोरटे, सुळ,महाजन, धापटे आदीसह गरोदर माता, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.