६ जानेवारी २०२३ पत्रकार दिनानिमित्त नातेपुते येथे विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून पत्रकारांचा सन्मान करण्यात आला
उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर येथे बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी १८३२ रोजी “दर्पण” हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले तेव्हापासून देशभर पत्रकारिता दिन साजरा होत आहे. पत्रकार पत्रकारीतेतून अन्यायाला वाचा फोडण्याचे पवित्र काम करतो , पत्रकारिता हे सामाजिक काम आहे. पत्रकार आपल्या लेखणीतून घडणार्या विषयानुसार लेखणी करून जनतेला वाचायला देत असतात त्यामुळे नातेपुते येथील विविध संस्था , सामाजिक कार्यकर्ते यांनी पत्रकारांचा सन्मान केला. त्यामध्ये नातेपुते येथील मा.शिवसेना माळशिरस तालुका अध्यक्ष राजकुमार हिवरकर-पाटील (बाळासाहेबांची शिवसेना ), लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सोलापूर शाखा-नातेपुते , मा.अक्षय भांड (राष्ट्रवादी युवक संघटना , महाराष्ट्र राज्य सचिव , मा.संजय व्हेलेकर सामाजिक कार्यकर्ते , संस्थापक मा.डॉ.दत्तात्रय निटवे सर ग्लोबल इंटरनेशनल स्कूल , मोरोची , ता.माळशिरस , शेखर राजू खिलारे , अकलूज , महाकिड्स स्कूलचे संस्थापक मा.श्री.शिवशंकर पांढरे , नातेपुते नगरपंचायत मुख...